नवराज्य Live न्यूज नेटवर्क
जळगाव – महानगरपालिका निवडणुका जाहीर झाल्यानंतर महानगरपालिका प्रशासन कामाला लागले असून निवडणूक निर्णय अधिकारी आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांचे सुधारित आदेश जारी केले आहेत. येत्या 23 पासून उमेदवार नामनिर्देशन अर्ज भरणार आहे. त्यानुसार पाच अधिकाऱ्यांकडे प्रत्येकी तीन प्रभाग तर एकाकडे चार प्रभाग दिले आहे. आदेशानुसार कोणत्या प्रभागाचे कामकाज कोणत्या अधिकाऱ्याच्या नियंत्रणाखाली असेल, हे आता निश्चित झाले आहे. त्यामुळे या अधिकाऱ्यांच्या कक्षातच अर्ज दाखलसह छाननी होईल. आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी या आदेशाद्वारे सर्व नियुक्त अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कामकाजासाठी
मनपा इमारतीमध्ये तयार केलेले निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे कक्ष.
कोणता अधिकाऱ्याकडे कोणता प्रभाग….
निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पाटील (प्रभाग १, २, ३), निवृत्ती गायकवाड (प्रभाग ४, ५, ६), जितेंद्र कुवर (प्रभाग ७, ११, १२), महेश चौधरी (प्रभाग १३, १४, १८, १९), मंजुषा घाटगे (प्रभाग १५, १६, १७), विनय गोसावी (प्रभाग ८, ९, १०), जयश्री माळी यांच्याकडे आचारसंहिता कक्ष. मनपाच्या दुसऱ्या आणि अकराव्या मजल्यावर स्वतंत्र कक्ष तयार केले आहे. या कक्षांमधूनच उमेदवारी
अर्ज घेणे, दाखल करण्यासह अर्जाची छाननी, पडताळणी आणि निवडणुकीचे नियोजन केले जाईल.







