• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home Uncategorized

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
December 13, 2025
in Uncategorized
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

*चिमुकल्यांच्या कलाविष्कारातून भारतीय संस्कृतीचे अप्रतिम दर्शन*

*अनुभूती बालनिकेतन, अनुभूती विद्यानिकेतनचा ‘फाउंडर्स डे-2025’ उत्साहात*

*जळगाव, दि. ११ (प्रतिनिधी)* : अनुभूती बाल निकेतन आणि अनुभूती विद्या निकेतन स्कूल चा ‘फाउंडर्स डे–2025’ उत्साहात झाला. स्कूलचे संस्थापक श्रद्धेय भवरलालजी जैन यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बाल निकेतन आणि विद्या निकेतनच्या चिमुकल्यांनी सादर केलेल्या कलाविष्कारातून भारतीय संस्कृतीचे अप्रतिम दर्शन घडविले. यावेळी उपस्थित पालक मंत्रमुग्ध झाले.

जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, ज्योती जैन, शोभना जैन, अनुभूती स्कूलचे अध्यक्ष अतुल जैन, फरहाद गिमी, गांधी रिसर्च फाउंडेशनच्या अंबिका जैन, अनुभूती बालनिकेतन आणि विद्या निकेतनचे प्राचार्य मनोज परमार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती. उपस्थितीतांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलनाने करण्यात आले.

सुरुवातीला विद्यार्थ्यांनी सरस्वती वंदना सादर केली. ‘तेरा मंगल मेरा मंगल…’ या गीतावर अनुभूती स्कूलचे संस्थापक भवरलाल जैन म्हणजेच दादाजी यांची भूमिका करणाऱ्या निवेदकाचे आगमन झाले. हा क्षण सोहळ्याचे आकर्षण ठरला. कीर्ती पगारिया, स्मिता काटकर यांनी भवरलालजी जैन यांची जीवनदर्शन आपल्या प्रास्ताविकातून मांडले. विद्यार्थ्यांनी सादर केलेले ‘भारत प्यारा’ हे समूहगीते प्रेक्षकांची विशेष दाद मिळवून गेला. तसेच संस्कृत वर्णमाला गीत, कृष्ण, राम कथा सादरीकरण आणि ‘रामराज्य’ नाटिका यामुळे पौराणिक कथांचा उलगडा नाटिकांतून चिमुकल्यांनी केला. जीवनातील अध्यात्म, साधेपणा, भक्तीभाव आणि मानवी मूल्यांचे विद्यार्थ्यांनी अभिनयातून दर्शन घडवले. महाराष्ट्रातील सणांवर आधारित नृत्याने राज्याच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाची झलक उपस्थितांसमोर चिमुकल्यांनी उभी केली. कलेसह आरोग्याची जाण जपणारे सादरीकरण सुद्धा झाले. उपस्थितांनी भरभरून दाद दिली. योगा, झुम्बा आणि ॲरोबिक्सच्या सादरीकरणातून विद्यार्थ्यांनी सुदृढ शरीराचे महत्त्व प्रभावीपणे मांडले. यावेळी अंबिका जैन यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, माळी रोपांची निगा राखतो, त्याप्रमाणे शाळेतील शिक्षक मुलांची निगा राखून त्यांना सुज्ञ नागरिक बनवतात. मुलांनी देखील नेहमी हसत खेळत राहावे, जिज्ञासू रहावे, प्रश्न विचारावे, असे आवाहन त्यांनी केले. प्राचार्य मनोज परमार यांनीही मनोगत व्यक्त केले. ‘वंदे मातरम’ ने कार्यक्रमाचा समारोप झाला.

*फोटो ओळी-*
(_DSC2404) दीपप्रज्ज्वलन करून कार्यक्रमाचे शुभारंभ करताना अशोक जैन, फरहाद गिमी, अतुल जैन आणि अंबिका जैन
(_DSC2548) सांस्कृतिक कार्यक्रम सादर करताना अनुभूती बाल निकेतन आणि अनुभूती विद्या निकेतन स्कूलचे विद्यार्थी

बातमी शेअर करा !
Previous Post

स्व.प्रतीक्षा पाटील यांच्या स्मृतिपित्यर्थ विविध स्पर्धांचेआयोजन

Next Post

उडानच्या दिव्यांग मुलांसाठी सूत कताईचे प्रशिक्षण…

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
उडानच्या दिव्यांग मुलांसाठी सूत कताईचे प्रशिक्षण…

उडानच्या दिव्यांग मुलांसाठी सूत कताईचे प्रशिक्षण...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

July 22, 2026
४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

July 21, 2026
जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

July 21, 2026

केंद्रीय राज्य क्रीडा मंत्र्यांच्या जिल्ह्यात खेळाडूंवर अन्याय 15 ऑगस्ट रोजी आत्मदहनाचा इशारा

July 20, 2026
हातात माती… मनात निसर्ग!            सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

July 20, 2026
ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे  अरविंद लाठी कालवश!

ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे अरविंद लाठी कालवश!

July 19, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif