• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home Uncategorized

श्री स्वामीसमर्थ स्कूल,कुसुंबा येथे आदर्श शिक्षक पुरस्कार संपन्न

स्व. सौ. प्रतीक्षा समाधान पाटील यांच्या स्मृतिप्रित्यर्थ पुरस्कार वितरण हा कार्यक्रम पार पडला.

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
December 8, 2025
in Uncategorized, गौरव सोहळा, जळगाव, जिल्हा
श्री स्वामीसमर्थ स्कूल,कुसुंबा येथे आदर्श शिक्षक पुरस्कार संपन्न
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

 

नवराज्य Live डिजिटल न्यूज नेटवर्क

जळगाव – दि ६ डिसेंबर रोजी श्री स्वामी समर्थ इंग्लिश मीडियम स्कूल, कुसुंबा खुर्द, जळगाव येथे स्व.. प्रतीक्षा ताई समाधान पाटील यांच्या पावन स्मृतिप्रित्यर्थ इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त भगवद्गीतेचा अकरावा अध्याय तसेच गणपती स्तोत्रांचे पठण करून त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहिली.

याच दिवशी आपल्या देशातील महान व्यक्तिमत्त्व, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यात आली.दुपारच्या सत्रात स्त्री सबलीकरण या विषयावर युवा पिढीला मार्गदर्शन करणारे प्रख्यात वक्ते डॉ. वसंत हंकारे सर यांचे प्रेरणादायी व्याख्यान आयोजित करण्यात आले. स्व. सौ. प्रतीक्षा ताई यांच्या स्मरणार्थ घेण्यात आलेल्या या कार्यक्रमात श्री स्वामी समर्थ ग्रुपतर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण हा कार्यक्रम पार पडला.

 

याप्रसंगी इंग्लिश मीडियम शिक्षक श्री. गणेश केलास घुगे सर यांना “आदर्श शिक्षक पुरस्कार” देऊन सन्मानित करण्यात आले.शाळेतील सर्व विद्यार्थी आणि पालकवर्ग यांनी मोठ्या उत्साहाने उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.हंकारे सरांच्या प्रभावी व्याख्यानाने पालक व विद्यार्थ्यांच्या डोळ्यात अश्रू दाटले.“आई-वडिलांना कधीही त्रास न देणे आणि राष्ट्रीय रक्षणासाठी सदैव तत्पर राहणे” असा प्रेरणादायी संदेश या व्याख्यानातून व्यक्त झाला. कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक व अध्यक्षस्थानी संस्थेचे मनोजकुमार पाटील सर,संस्थेच्या सचिव ज्योती माई  पाटील,संचालक रामराजे पाटील तसेच विविध शाखांचे मुख्याध्यापक/मुख्याध्यापिका उपस्थित होते.

 

🔴  यांचा झाला सन्मान 🔵

इंग्लिश मीडियम मुख्याध्यापिका . तनुजा मोती,माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापिका दिपाली भदाणे,प्राथमिक विभाग मुख्याध्यापिका कामिनी पाटील,रायपूर स्वामी समर्थ विद्यालय मुख्याध्यापिका वैशाली धांडे,सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापिका दिपाली पाटील,आव्हाने माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापिका वैशाली शिंदे,आव्हाने प्राथमिक विभाग मुख्याध्यापिका हर्षाली पाटील,आव्हाने येथील मनोजकुमार इंटरनॅशनल स्कूल मुख्याध्यापिका मंजुषा सोनवणे,करंज येथील गंगाई इंग्लिश मीडियम मुख्याध्यापिका छाया पाटील तसेच सर्व शाखांतील विद्यार्थी, शिक्षकेतर कर्मचारी आणि कुसुंबा येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शीतल अहिरे यांनी केले. स्वागतगीत योगेंद्र धनराळे व निकिता जोशी यांनी सादर केले. आभार हेमंत सोनार यांनी केले.

बातमी शेअर करा !
Tags: #SwamiSamarthSchool #IdealTeacherAward #AdarshTeacher #TeacherRespect #PratikshaTaiSmruti #JalgaonNews #SchoolEvent #StudentsActivity #MotivationalLecture #StriSabalikaran
Previous Post

महापालिका निवडणुकीत शिंपी समाजाला संधी कधी?

Next Post

संताजी जगनाडे महाराज जयंतीनिमित्त रॅलीने वेधले लक्ष्य

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
संताजी जगनाडे महाराज जयंतीनिमित्त रॅलीने वेधले लक्ष्य

संताजी जगनाडे महाराज जयंतीनिमित्त रॅलीने वेधले लक्ष्य

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोविंदाच्या थरांनी सागर पार्क दणाणणार !

गोविंदाच्या थरांनी सागर पार्क दणाणणार !

September 5, 2026
युवतींच्या दहीहंडीचा आज शिवतीर्थावर थरार

युवतींच्या दहीहंडीचा आज शिवतीर्थावर थरार

September 5, 2026
प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

September 3, 2026
जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

September 3, 2026
भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

September 3, 2026

राखीचा धागा मायेचा; ‘विशेष’ भगिनींना GPS परिवाराने दिला आपुलकीचा आधार

September 2, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif