• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home Uncategorized

उच्चदाबाच्या वीज तारांना स्पर्श झाल्याने दोघांचा मृत्यू  

मास्टर कॉलनीतील घटना ; पाईपातील चोकप काढताना आसारी वीजतारांना लागल्याने झाली दुर्घटना. 

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
December 6, 2025
in Uncategorized, अपघात, जळगाव
उच्चदाबाच्या वीज तारांना स्पर्श झाल्याने दोघांचा मृत्यू  
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

 

नवराज्य Live  डिजिटल न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरातील मास्टर कॉलनी येथे दि. शुक्रवार, 5 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास इलेक्ट्रिक शॉक लागल्याने बाप-लेकीचा जागीच मृत्यू झाला तर 16 वर्षाची भाची गंभीर जखमी झाली. यावेळी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांनी मोठी गर्दी केली.

सविस्तर वृत्त असे कि, जळगाव शहरातील मास्टर कॉलनीत मौलाना साबीर खान नवाझ खान (35) हे आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला होते. शुक्रवार, 5 डिसेंबर रोजी सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास मौलाना साबीर यांची भाची मारिया फतेमाबी ही कपडे टाकण्यासाठी गच्चीवर गेली होती. त्यावेळी कपडे टाकत असताना जवळच असलेल्या उच्च दाबाची हाय व्होल्टेज इलेक्ट्रिक तारचा तिला धक्का बसला व तिला वाचवण्यासाठी आलिया ही गेली असता तिला पण जोरदार धक्का बसला मुलगी आणि भाची यांना इलेक्ट्रिक शॉक लागल्याचे पाहून मौलाना शाबीर हे त्यांना वाचण्यासाठी गेले असता त्यांना देखील विजेचा जबरदस्त धक्का बसला. या घटनेत मौलाना साबीर खान (38) व त्यांची मोठी मुलगी आलिया (12) यांचा यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेत भाची मारिया फतेमाबी ही गंभीर जखमी झाली. तिला नजीकच्या सारा हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले आहे.

 

या घटनेत मौलाना साबीर खान यांचा लहान मुलगा मात्र थोडक्यात बचावला. गेल्या काही महिन्यांपासून उच्च दाबाची विद्युत वाहिनी ही घराजवळून गेल्याने या परिसरातून हे विद्युत वाहिनी हटवावी, अशी मागणी करण्यात आली परंतु महावितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे या मागणीकडे दुर्लक्ष झाल्याने ही घटना घडल्याचे बोलले जात आहे.

बातमी शेअर करा !
Previous Post

“धरतीआबा”योजनेत 34आदिवासी गावांचा समावेश करा

Next Post

अयोध्येहुन परततांना भीषण अपघातात पिंप्राळा येथील महिला ठार,३०जखमी

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
अयोध्येहुन परततांना भीषण अपघातात पिंप्राळा येथील महिला ठार,३०जखमी

अयोध्येहुन परततांना भीषण अपघातात पिंप्राळा येथील महिला ठार,३०जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जंक फूड मुक्त होळीचा विद्यार्थ्यांचा अनोखा संदेश!

जंक फूड मुक्त होळीचा विद्यार्थ्यांचा अनोखा संदेश!

March 2, 2026
चिमुकल्यांना भरवले आईस्क्रीम, ज्येष्ठांची विचारली खुशाली; खान्देश महोत्सवात महापौरांनी जपली ‘नात्यांची’ वीण

चिमुकल्यांना भरवले आईस्क्रीम, ज्येष्ठांची विचारली खुशाली; खान्देश महोत्सवात महापौरांनी जपली ‘नात्यांची’ वीण

March 2, 2026
खान्देश महोत्सवाच्या रंगमांच्यावर अभिनेता ओम यादव समवेत जळगावकर थिरकले !

खान्देश महोत्सवाच्या रंगमांच्यावर अभिनेता ओम यादव समवेत जळगावकर थिरकले !

March 1, 2026
जगाला कथा सांगणारा देश म्हणजे भारत – जेष्ठ अभिनेते मनोज जोशी

जगाला कथा सांगणारा देश म्हणजे भारत – जेष्ठ अभिनेते मनोज जोशी

March 1, 2026
खान्देश महोत्सवात आज “होम मिनिस्टर”व रंगणार पैठणीचा खेळ!

खान्देश महोत्सवात आज “होम मिनिस्टर”व रंगणार पैठणीचा खेळ!

February 28, 2026
स्थायी सभापतीपदी डॉ. चंद्रशेखर पाटील, महिला व बालकल्याण सभापतीपदी सिंधुताई कोल्हे बिनविरोध निवड!

स्थायी सभापतीपदी डॉ. चंद्रशेखर पाटील, महिला व बालकल्याण सभापतीपदी सिंधुताई कोल्हे बिनविरोध निवड!

February 27, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif