नवराज्य Live न्यूज नेटवर्क.
जळगाव – येथील काशीबाई उखाजी कोल्हे विद्यालय, जळगाव येथे खान्देंश कन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांची पुण्यतिथी तसेच विश्वलेवा गणबोली दिवस साजरी करण्यात आला कार्यक्रमांच्या सुरुवातीला कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या प्रतिमेला प्रमुख पाहुणे लेखिका संध्या भोळे यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले या प्रसंगी विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणांमध्ये कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या जन्म, बालपण, त्यांच्या विविध कविता या विषयी माहिती सांगितली तसेच प्रमुख पाहुण्या लेखिका संध्या भोळे यांनी आपल्या भाषणात कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या जीवनकार्या विषयी तसेच त्यांच्या काव्या विषयी व लेवा गणबोली विषयी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले तसेच विद्यालयाला त्यांनी त्यांचे “जावे गुफिंत अक्षरे” हे पुस्तक भेट दिले
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थांनी विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. डी. खडके होते कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सी. व्ही. पाटील यांनी केले आभार बी. बी. देवरे यांनी मानले परीक्षक म्हणून व्ही.एस. निंभोरे व एम. बी. काळे यांनी काम केले.
या प्रसंगी विद्यालयाचे उपमुख्याध्यापक व्ही. आर. कोल्हे, जेष्ठ शिक्षक सी.व्ही. येवले, एम.ए. कोल्हे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते.







