• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home Uncategorized

मतदार यादीतील घोळामुळे जळगावात खळबळ

भाजप आक्रमक, त्वरित दुरुस्ती मोहिमेची मागणी “त्रुटी दूर न झाल्यास हजारो मतदार वंचित राहतील” — भाजपचे महापालिकेला निवेदन

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
November 26, 2025
in Uncategorized, जळगाव, महापालिका रणसंग्राम
मतदार यादीतील घोळामुळे जळगावात खळबळ
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

 

नवराज्य LIve डिजिटल न्यूज नेटवर्क by योगेश सुने

जळगाव  : जळगाव महानगरपालिका निवडणूक २०२५-२६ साठी प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदारयादीत मोठ्या प्रमाणावर त्रुटी उघड झाल्याचा गंभीर आरोप भाजपने करत, त्या तातडीने सुधारण्यासाठी विशेष दुरुस्ती मोहीम राबवावी, तसेच हरकती नोंदवण्याची मुदत वाढवावी, अशी मागणी महापालिकेकडे निवेदनाद्वारे केली. सहाय्यक आयुक्त धनश्री शिंदे यांना आज भाजप शिष्टमंडळाने निवेदन सादर केले.

 

भाजपच्या म्हणण्यानुसार, २० नोव्हेंबर २०२५ रोजी जाहीर करण्यात आलेल्या प्रारूप मतदारयादीत अनेक मूलभूत चुका आढळतात. नागरिकांची नावे चुकीच्या प्रभागात, एकाच व्यक्तीची नावे दोन ते तीन ठिकाणी, काही मतदारांचे छायाचित्र चुकीचे, तर संपूर्ण कुटुंबच वेगळ्या प्रभागात स्थलांतरित दाखविणे—अशा गंभीर तृटींमुळे मतदारांची गैरसोय वाढली आहे.

 

इतकेच नव्हे तर मृत व्यक्तींची नावे अद्यापही मतदारयादीत दिसत असल्याचा धक्कादायक मुद्दा भाजपने मांडला. या सर्व त्रुटींमुळे नागरिकांत संभ्रम आणि नाराजी पसरत असल्याचे भाजपने स्पष्ट केले.

 

महापालिकेने दुरुस्ती फॉर्म दिले असले तरी प्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची असल्याचे भाजपचे म्हणणे आहे. प्रत्येकाने स्वतंत्रपणे संपूर्ण माहिती भरणे कठीण असून, अनेक प्रभागांमध्ये २ ते ३ हजार त्रुटी असल्याने सर्व दुरुस्ती वेळेत होणे जवळजवळ अशक्य असल्याचे पक्षाने निदर्शनास आणले.

भाजप पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित

निवेदन सादरीकरणावेळी जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, सरचिटणीस नितीन इंगळे व राहुल वाघ, पितांबर भावसार, मिलिंद चौधरी, भूषण लाडवंजारी, रेखा वर्मा, गोपाळ पोपटानी, शक्ती महाजन, नितू परदेशी, आनंद सपकाळे, दीपमाला काळे, विनोद मराठे, अजित राणे, अतुल बारी, सुचिता हाडा, अमित काळे, महेश चौधरी, जितेंद्र मराठे, कैलास सैंदाणे, तिलोत्तमा पाटील, निलेश तायडे, धनंजय पाटील, सुनील भारंबे, दिनेश अत्तरडे, अमोल धांडे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

————————————

 

बातमी शेअर करा !
Tags: #JalgaonNews #JalgaonMunicipalElection #VoterListErrors #BJPJalgaon #VotingListCorrection #Election2025 #MunicipalCorporation #PoliticalNews
Previous Post

आता टेलिफोनची ‘ट्रिंग-ट्रिंग’ बंद होणार

Next Post

विद्यार्थिनींनी साकारले मानवी साखळीतून संविधान 

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
विद्यार्थिनींनी साकारले मानवी साखळीतून संविधान 

विद्यार्थिनींनी साकारले मानवी साखळीतून संविधान 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावात गिरीश महाजनांची शिष्टाई फेल शिंदेसेनेची बंडखोरी ; चौरंगी लढत!

जळगावात गिरीश महाजनांची शिष्टाई फेल शिंदेसेनेची बंडखोरी ; चौरंगी लढत!

June 4, 2026
जैन इरिगेशनकडून जगातील सर्वात मोठ्या बायोचार रिअ‍ॅक्टर्सचे उद्घाटन

जैन इरिगेशनकडून जगातील सर्वात मोठ्या बायोचार रिअ‍ॅक्टर्सचे उद्घाटन

June 5, 2026
एआयच्या प्रभावी वापराने कृषी क्षेत्रात परिवर्तन – अनिल जैन

एआयच्या प्रभावी वापराने कृषी क्षेत्रात परिवर्तन – अनिल जैन

June 2, 2026
व्हेंटीलेटरवर असलेल्या तीन महिन्यांच्या शिशुचे वाचले प्राण!

व्हेंटीलेटरवर असलेल्या तीन महिन्यांच्या शिशुचे वाचले प्राण!

June 2, 2026
“माणसातला देव माणूस म्हणजे गुलाबराव पाटील; समाजसेवेचा वारसा जपणे हीच खरी संतसेवा” – साध्वी सोनाली दीदी करपे 

“माणसातला देव माणूस म्हणजे गुलाबराव पाटील; समाजसेवेचा वारसा जपणे हीच खरी संतसेवा” – साध्वी सोनाली दीदी करपे 

June 2, 2026
विधान परिषदेसाठी भाजपकडून नंदू महाजन यांना उमेदवारी निश्चित!

विधान परिषदेसाठी भाजपकडून नंदू महाजन यांना उमेदवारी निश्चित!

May 31, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif