• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home Uncategorized

टीईटी ‘लय…टप गेली रावं’…….

परीक्षा केंद्रांवर तीन लाखाची चर्चा जोरात ; तर शिक्षकांमध्ये धक धक..

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
November 24, 2025
in Uncategorized, परीक्षा
टीईटी ‘लय…टप गेली रावं’…….
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

 

नवराज्य live न्यूज नेटवर्क 

जळगाव  (योगेश सुने) – राज्यात आज झालेल्या महाटेट (टीईटी) परीक्षेदरम्यान अनेक केंद्रांवर उमेदवारांमध्ये “लय टप गेली रावं टीईटी…” अशी थेट भावना व्यक्त होत असल्याचे चित्र दिसले.

कठीण पेपर, एआय कॅमेऱ्यांची कडक नजर आणि परीक्षा केंद्राच्या बाहेर फिरणाऱ्या “तीन लाखांच्या चर्चा” यामुळे परीक्षार्थी तणावात दिसले.

 

जळगाव शहरातील २१ परीक्षा केंद्रांवर पहिल्या पेपरसाठी ५७०६ तर दुसऱ्या पेपरसाठी ७४९४ उमेदवार होते. मात्र त्यातून किती गैरहजर होते. ही आकडेवारीची नोंदणीचे काम उशिरापर्यंत सुरू होते. उशिरापर्यंत सकाळी व दुपारी दोन टप्प्यात परीक्षा घेण्यात आली.

प्रत्येक वर्गात बसवलेल्या एआय कॅमेऱ्यांमुळे उमेदवारांच्या हालचालीवर सतत लक्ष ठेवले जात होते. यामुळे कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार होऊ नये, यासाठी कडक बंदोबस्त करण्यात आला.

परंतु या सगळ्यात मात्र परीक्षार्थी शिक्षक हा, परीक्षा देण्यापूर्वी आपल्या शाळेतील पोर्शन,निवडणुकीचे काम, पोषण आहार, निकाल,  वारंवार होणाऱ्या मीटिंगा, शिक्षकांना दिले जाणारे ट्रेनिंग, विद्यार्थ्यांना शिकवण्यासंदर्भात येणारे व बदलणारे विविध जीआर या सगळ्या व्यापातून शिक्षक हा परीक्षा केंद्रावर गेलेला होता. टीईटी परीक्षेचे भूत शिक्षकाच्या मांगूटीवर बसले असल्याने परीक्षा देण्यापूर्वीच शिक्षक तणावाखाली गेला असल्याचे चित्र दिसत होते.

 

काही केंद्रांबाहेर “ पेपर कठीण गेला तर सोडवायला तीन लाखांची मागणी होत आहे ”अशा चर्चा उमेदवारांत घुमत असल्याचेही समोर आले. त्यामुळे परीक्षार्थींमध्ये धकधक वाढलेली पाहायला मिळाली.

 

टीईटी उत्तीर्ण होणे अनिवार्य झाल्याने हजारो शिक्षक व उमेदवारांनी या परीक्षेत सहभागी होत मोठी गर्दी केली. कडक देखरेखीत परीक्षा शांततेत पार पडली असली तरी, एआय नजर आणि बाहेरील अफवांमुळे आजची टीईटी परीक्षा उमेदवारांसाठी चांगलीच ‘टप गेलेली’ ठरली.

 

शहरातील परीक्षा केंद्र

 

ला.ना. सार्वजनिक विद्यालय • अँग्लो उर्दू हायस्कूल • या.दे. पाटील शाळा • झांबरे विद्यालय • भगीरथी हायस्कूल • सेंट टेरेसा स्कूल • लुंकड कन्या शाळा • स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय • नंदिनीबाई स्कूल (कंट्रोल रूम) • बाहेती महाविद्यालय • काशीबाई कोल्हे विद्यालय • आर.आर. हायस्कूल • प्रगती हायस्कूल • महाराणा प्रताप हायस्कूल • मिल्लत हायस्कूल • श्रीराम शाळा • नूतन मराठा महाविद्यालय • शारदा स्कूल • इकरा उर्दू हायस्कूल • खुबचंद सागरमल विद्यालय • सिद्धिविनायक कनिष्ठ महाविद्यालय

बातमी शेअर करा !
Previous Post

देवदर्शनापूर्वीच दोघं भावांचा अपघाती मृत्यू

Next Post

वंदे मातरम् हे भारताच्या आत्म्याचं प्रतिबिंब – आ.सुरेश भोळे

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
वंदे मातरम् हे भारताच्या आत्म्याचं प्रतिबिंब – आ.सुरेश भोळे

वंदे मातरम् हे भारताच्या आत्म्याचं प्रतिबिंब - आ.सुरेश भोळे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

July 22, 2026
४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

July 21, 2026
जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

July 21, 2026

केंद्रीय राज्य क्रीडा मंत्र्यांच्या जिल्ह्यात खेळाडूंवर अन्याय 15 ऑगस्ट रोजी आत्मदहनाचा इशारा

July 20, 2026
हातात माती… मनात निसर्ग!            सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

July 20, 2026
ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे  अरविंद लाठी कालवश!

ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे अरविंद लाठी कालवश!

July 19, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif