• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जिल्हा

जिल्हा कारागृहात क्षमतेच्या पटीत बंदिवान

न्यायाधीन बंद्यांना धुळे–नंदुरबारला हलविण्याचा निर्णय; कैद्याच्या परिवाराची फरपट

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
November 9, 2025
in जिल्हा, समस्या
जिल्हा कारागृहात क्षमतेच्या पटीत बंदिवान
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

 

 

 

 

जळगाव (प्रतिनिधी) — जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढणाऱ्या गुन्हेगारी घटनांमुळे आणि न्यायालयीन विलंबामुळे जिल्हा कारागृहात बंदिवानांची संख्या झपाट्याने वाढत आहे. केवळ १८४ पुरुष आणि १६ महिला बंदिवानांची क्षमता असलेल्या या कारागृहात सध्या दुप्पट कैदी ठेवले जात आहेत, परिणामी कारागृहात अक्षरशः कोंडवाड्याची स्थिती निर्माण झाली आहे.

 

या पार्श्वभूमीवर न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय घेत, जळगाव कारागृहातील न्यायाधीन बंदिवानांना टप्प्याटप्प्याने इतर जिल्ह्यांत हलविण्याची परवानगी दिली आहे. त्यानुसार ३ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत बंद्यांना नंदुरबार कारागृहात, तर १ ते ३१ जानेवारी २०२६ दरम्यान धुळे कारागृहात हलविण्यात येणार आहे.

 

🔹 सुरक्षा यंत्रणेवर वाढता ताण

गर्दीमुळे कारागृहात बंद्यांमधील तणाव, गटबाजी आणि अंतर्गत संघर्ष वाढले आहेत. काही कुख्यात आरोपींनी कारागृहातूनच व्यवहार, वसूली आणि धमक्या देणे सुरू ठेवल्याच्या तक्रारीही पुढे येत आहेत.

कर्मचारीसंख्या अपुरी असल्याने २४ तास पहारा ठेवणे अवघड ठरत असून, अधिकाऱ्यांवर कामाचा ताण प्रचंड वाढला आहे.

 

🔹 कुटुंबीय आणि वकिलांवर आर्थिक भार

बंदीधारकांच्या स्थानांतरामुळे त्यांच्या कुटुंबीयांना भेटीसाठी धुळे किंवा नंदुरबारपर्यंत प्रवास करावा लागणार आहे. त्यामुळे प्रवासखर्च, वेळ आणि निवासाचा भार वाढणार आहे. वकिलांना देखील आपल्या क्लायंट्सशी संपर्क साधणे कठीण होणार असल्याने खटल्यांच्या सुनावणीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

 

🔹 नवीन कारागृहाची मागणी तीव्र

जळगावसारख्या मोठ्या जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर विद्यमान कारागृह अपुरे ठरत असल्याची बाब स्पष्ट झाली आहे. नवीन कारागृह बांधकामाचा प्रस्ताव अनेक वर्षांपासून प्रलंबित असून, या निर्णयानंतर स्थानिक नागरिक, समाजसेवक आणि वकिल संघटनांनी शासनाकडे तातडीने जळगावात नवीन कारागृह उभारण्याची मागणी केली आहे.

 

“कैद्यांना दुसऱ्या जिल्ह्यात हलवून प्रश्न सुटणार नाही, जळगावला स्वतंत्र आणि सुसज्ज कारागृहाची गरज आहे,”

असे स्थानिक कायदेतज्ज्ञांनी मत व्यक्त केले आहे.

 

बातमी शेअर करा !
Tags: #JalgaonJail #MaharashtraNews #NavarajyaLive
Previous Post

कलात्मक तेजाने उजळले ‘इंद्रधनुष्य–२०२५’

Next Post

जामनेरच्या कावडीया यांच्या आत्महत्येने खळबळ

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
जामनेरच्या कावडीया यांच्या आत्महत्येने खळबळ

जामनेरच्या कावडीया यांच्या आत्महत्येने खळबळ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

July 22, 2026
४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

July 21, 2026
जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

July 21, 2026

केंद्रीय राज्य क्रीडा मंत्र्यांच्या जिल्ह्यात खेळाडूंवर अन्याय 15 ऑगस्ट रोजी आत्मदहनाचा इशारा

July 20, 2026
हातात माती… मनात निसर्ग!            सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

July 20, 2026
ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे  अरविंद लाठी कालवश!

ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे अरविंद लाठी कालवश!

July 19, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif