• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home Uncategorized

मुक्ताई बंगल्यातून कागदपत्रासह, ७ सीडी, पेनड्राईव्ह चोरी

आ. एकनाथराव खडसे यांचा पत्र परिषदेत गौप्यस्फोट ; पोलिसांवर केले प्रश्न उपस्थित.

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
October 30, 2025
in Uncategorized, क्राईम, जळगाव
मुक्ताई बंगल्यातून कागदपत्रासह, ७ सीडी, पेनड्राईव्ह चोरी
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

जळगाव – राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार  गटाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्रीआ. एकनाथ खडसे यांच्या जळगावमधील शिवराम नगरातील मुक्ताई बंगल्यातून सोने चांदीसह रोख असा एकूण ६ लाख ७० हजाराची चोरी झाल्याची घटना उघडकीस आली.

दरम्यान, चोरट्यांनी सोने-चांदीसोबत खडसेंच्या ४५० महत्वाच्या कागदपत्रांसह ७ सीडी व पेन ड्राईव्ह चोरीला गेल्याचा गौप्यस्फोट आ. खडसे यांनी पत्रकार परिषदेत केला.

माझ्या बेडरूममध्ये महत्त्वाची कागदपत्रे आहेत हे कोणालातरी माहित होते. तीच कागदपत्रे चोरीला गेली आहेत. काही पेन ड्राईव्हमध्ये गाणी होती. सीडी मात्र महत्त्वाच्या होत्या. कोणाच्या बाबतीत तरी वैयक्तिक स्वरूपाच्या त्या होत्या. त्यामुळे त्याबाबत मी अधिक बोलू शकत नाही. मी मुंबईला असताना ही बातमी मला समजली. मी घरी आल्यानंतर पाहणी केली. भेटवस्तू चोरी गेल्या असं लक्षात आले.
रात्री १२ वाजून ३७ मिनिटांनी लाईट बंद झाले, त्यानंतर चोरी झाली. वॉचमन दिवाळीनिमित्त सुटीवर होता. तो इथे पूर्णवेळ राहतो, तेव्हा सी सी टीव्ही कार्यरत होते.असे त्यांनी सांगितले.

 

सिडी मिळवण्यासाठी प्रफुल लोढावर कारवाई.

काही महिन्यापूर्वी हनी ट्रॅप प्रकरणातील सशयित प्रफुल्ल लोढा यास अटक झाल्यानंतर एक कथित सीडी चांगलीच चर्चेत आली होती. लोढाकडे असलेली ती सीडी शोधण्यासाठीच त्याच्यावर कारवाई केल्याचा आरोप आ. एकनाथ खडसे यानी त्यावेळी केला होता. ना?. महाजन याच्च्याशी सबंधित माहिती असलेली सीडी अजूनही लोढा याच्याकडेच आहे. त्यासाठीच पोलीस लोढाच्या विरोधात वारंवार कारवाई करत असल्याचा आरोप केला होता. या पार्श्वभूमीवर, खडसेंच्या बंगल्यावरील सीडी चोरीला गेल्यानतर अनेकाच्या भुवया उंचावल्या. चोरीला गेलेल्या सीडी नेमक्या कोणत्या होत्या, असाही प्रश्न उपस्थित झाला. मात्र, खडरोंनी चोरीला गेलेल्या सीडी त्या नव्हत्या, असे सांगितले.

चोरी नियोजन बद्ध हेतूने केलेली आहे.

चोरटे चोरीच्या हेतूने आले होते, तर चोरी झाली पाहिजे होती. इथून पेन ड्राइव्ह, सीडी, कागदपत्रे चोरीला गेले आहेत. पेन ड्राइव्हमधे तर गाणी होते, पण तेदेखील ते घेऊन गेले आहेत. मला गाणी ऐकायला आवडतात. पेन ड्राइव्हमध्ये गाणी होती. चोरी होण्याआधी पथदिवे बंद कसे झाले, यापूर्वी नाझ्या घरची रेकी झाली होती का? चोरट्यांना नेमके काय हवे होते, गैरव्यवहाराचे कागदपत्रे त्यांनी चोरी केले आहेत. सीसीटीव्ही मध्ये चोरट्यांकडे तीन बॅग असल्याचे दिसत आहे. नियोजनबद्ध चोरी झाली आहे, याबाबत कुणाचा काय हेतू असेल हे पोलीस तपासात उघड होईल.

 

पोलीस मात्र हफ्ते खाण्यात व्यस्त

चोरीच्या घटनेवरून जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था खराब झाली आहे. दोन नंबरचे धंदे फोपावले आहेत. मंत्री रक्षा खडसे यांच्या पेट्रोल पंपावर तसेच माजी आ. साहेबराव पाटील यांच्या बंगल्यात देखील दरोडा पडला. पोलिस फक्त हफ्ते खाण्यात व्यस्त आहेत. वाळू तस्करी वाढली आहे, पोलिसांचा वचक संपलेला आहे. खुनाच्च्या घटनांमध्ये वाढ तसेच जिल्ह्यात खुलेआम पिस्तूल मिळत आहेत. इतर घटनांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून पोलीस व गुन्हेगारांमध्ये संगमत असल्याचा आरोप आ. खडसे यांनी यावेळी केला. अनेक वेळा पोलिसांकडे तक्रार करून देखील उपायोजना होत नाही.

 

बातमी शेअर करा !
Previous Post

उदयनगर येथे माजी विद्यार्थी स्नेहसंमेलन संपन्न

Next Post

भडगाव अवधूत मठीत ६ हजार दीवे लावून दीपोत्सव साजरा  

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
भडगाव अवधूत मठीत ६ हजार दीवे लावून दीपोत्सव साजरा  

भडगाव अवधूत मठीत ६ हजार दीवे लावून दीपोत्सव साजरा  

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जंक फूड मुक्त होळीचा विद्यार्थ्यांचा अनोखा संदेश!

जंक फूड मुक्त होळीचा विद्यार्थ्यांचा अनोखा संदेश!

March 2, 2026
चिमुकल्यांना भरवले आईस्क्रीम, ज्येष्ठांची विचारली खुशाली; खान्देश महोत्सवात महापौरांनी जपली ‘नात्यांची’ वीण

चिमुकल्यांना भरवले आईस्क्रीम, ज्येष्ठांची विचारली खुशाली; खान्देश महोत्सवात महापौरांनी जपली ‘नात्यांची’ वीण

March 2, 2026
खान्देश महोत्सवाच्या रंगमांच्यावर अभिनेता ओम यादव समवेत जळगावकर थिरकले !

खान्देश महोत्सवाच्या रंगमांच्यावर अभिनेता ओम यादव समवेत जळगावकर थिरकले !

March 1, 2026
जगाला कथा सांगणारा देश म्हणजे भारत – जेष्ठ अभिनेते मनोज जोशी

जगाला कथा सांगणारा देश म्हणजे भारत – जेष्ठ अभिनेते मनोज जोशी

March 1, 2026
खान्देश महोत्सवात आज “होम मिनिस्टर”व रंगणार पैठणीचा खेळ!

खान्देश महोत्सवात आज “होम मिनिस्टर”व रंगणार पैठणीचा खेळ!

February 28, 2026
स्थायी सभापतीपदी डॉ. चंद्रशेखर पाटील, महिला व बालकल्याण सभापतीपदी सिंधुताई कोल्हे बिनविरोध निवड!

स्थायी सभापतीपदी डॉ. चंद्रशेखर पाटील, महिला व बालकल्याण सभापतीपदी सिंधुताई कोल्हे बिनविरोध निवड!

February 27, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif