• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home विद्यार्थी मेळावा

उदयनगर येथे माजी विद्यार्थी स्नेहसंमेलन संपन्न

लोकसहभागातून शाळेच्या विकासाचा ठराव:

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
October 29, 2025
in विद्यार्थी मेळावा
उदयनगर येथे माजी विद्यार्थी स्नेहसंमेलन संपन्न
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

 

उदयनगर (ता. अमळनेर) -येथे समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत आजी-माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन सोमवार, दिनांक 27 ऑक्टोबर 2025 रोजी उत्साहात पार पडले.या स्नेहसंमेलनात सर्व माजी विद्यार्थ्यांनी लोकसहभागातून आर्थिक, श्रमदान, कौशल्या धारित मार्गदर्शन, अशा विविध स्वरूपात शाळेला मदत करण्याचा ठराव एकमुखाने केला.

 

याप्रसंगी लोकनियुक्त सरपंच प्रकाश वाघ यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की,

 

> “हीच ती शाळा जिथे आपण अक्षर ओळखली, शिस्त शिकलो आणि जीवनात लढत पुढे जाण्याची प्रेरणा मिळवली. या शाळेनेच आपल्याला जगण्याचे आणि आनंदाने जगवण्याचे बळ दिले.”

अशा या माय माऊलीच्या उपकारातून उतराई होण्याचा प्रयत्न करूया..

ज्या शाळेने आपल्यावर ‘ज्ञानाचे कर्ज’ केले, ते किमान काही अंशी तरी परत फेडण्याची ही संधी आहे,” असे त्यांनी आवाहन केले. त्यांच्या या आवाहनास माजी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सुमारे रु. 1 लाख 26 हजार रक्कम जमा केली.

या निधीतून जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेसाठी लोकसहभागातून रंगमंच, किचन शेडसाठी नवीन पत्रे, एलईडी टीव्ही व आरओ खरेदी करण्यात येणार आहे.

सदर प्रसंगी शाळेचे माजी विद्यार्थी जे सध्या शिरपूर येथे माध्यमिक विद्यालयात मुख्याध्यापक आहेत असे आ. शांताराम सोनवणे सरांनी मनोगत व्यक्त करताना शाळेच्या जुन्या आठवणींना उजाळा देत सद्यस्थितीत शाळेला जास्तीत जास्त पुढे नेण्यासाठी करावयाच्या गोष्टींची सविस्तर अशी माहिती दिली व शाळेला भरभराटी मिळवून देण्याचा चंग बांधत ; त्यांच्या मित्रमंडळींना आवाहन केले. तसेच माजी विद्यार्थी राजकिरण पाटील यांनीही शाळेसाठी विविध स्तरावर मदत करण्याचे ठरवले.

कार्यक्रमास माजी सरपंच धुडकू अभिमान पाटील, विकास सोसायटी चेअरमन शांताराम पाटील, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष महेश पाटील, उपसरपंच राकेश पाटील, ग्रामपंचायत सदस्य विश्वास पाटील, राजेंद्र पाटील, सुदाम सोनवणे, ग्रामपंचायत अधिकारी सोनी पाटील, तसेच माजी विद्यार्थी किशोर वाघ, वासुदेव कापडणे, शांताराम सोनवणे सर, पोलीस पाटील खैरनार, मा. उपसरपंच सतीलाल पाटील, सुनील पाटील, कृष्णा पाटील, किरण पाटील, मुख्याध्यापक मासुळे सर व शिक्षक संजय पाटील शिंदे सर अंगणवाडी सेविका-मदतनीस, आशा वर्कर, सुभाष पाटील (रोजगार सेवक), सागर सोनवणे (ग्रामपंचायत शिपाई) तसेच माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री नितीन शिंदे सरांनी केले व श्री संजय पाटील सरांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक श्री मासुळे सरांनी केले.

स्नेहसंमेलनानंतर “स्वच्छतेचा वार – सोमवार” या उपक्रमांतर्गत स्वच्छता मोहीम राबवण्यात आली..

बातमी शेअर करा !
Previous Post

जळगावात १ व २ नोव्हेंबर रोजी संगीत महोत्सव.

Next Post

मुक्ताई बंगल्यातून कागदपत्रासह, ७ सीडी, पेनड्राईव्ह चोरी

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
मुक्ताई बंगल्यातून कागदपत्रासह, ७ सीडी, पेनड्राईव्ह चोरी

मुक्ताई बंगल्यातून कागदपत्रासह, ७ सीडी, पेनड्राईव्ह चोरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोविंदाच्या थरांनी सागर पार्क दणाणणार !

गोविंदाच्या थरांनी सागर पार्क दणाणणार !

September 5, 2026
युवतींच्या दहीहंडीचा आज शिवतीर्थावर थरार

युवतींच्या दहीहंडीचा आज शिवतीर्थावर थरार

September 5, 2026
प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

September 3, 2026
जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

September 3, 2026
भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

September 3, 2026

राखीचा धागा मायेचा; ‘विशेष’ भगिनींना GPS परिवाराने दिला आपुलकीचा आधार

September 2, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif