• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home Uncategorized

आमदार एकनाथराव खडसे यांच्या बंगल्यात चोरट्यांचा डल्ला.

आठ ते नऊ तोडे सोने गेल्याचा अंदाज ; घटनास्थळी श्वान पथकाला पाचरण.

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
October 28, 2025
in Uncategorized, क्राईम, जळगाव
आमदार एकनाथराव खडसे यांच्या बंगल्यात चोरट्यांचा डल्ला.
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

 

 

जळगाव प्रतिनिधी –  शहरातील चोरट्यांची हिम्मत वाढली चोरट्यांनी आताथेट राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या ‘मुक्ताई’ बंगल्यात चोरी केली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील शिवराम नगर येथील माजी मंत्री आ.एकनाथ खडसे यांच्या निवासस्थानी चोरी असून यात 8 ते 9 तोळे सोने चोरी गेल्याचा अंदाज आहे.

मात्र याघटनेतून संबंध राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. एका महाराष्ट्राच्या मोठ्या नेत्याच्या घरी जर अशा प्रकारे चोरी होत असेल. तर सामान्य माणसाने काय करावे. सविस्तर वृत्त असे की, आ. एकनाथ खडसे हे बहुतांशी मुक्ताई नगर येथे वास्तव्यास असल्याने जळगावमधील शिवराम नगर येथील ‘मुक्ताई’ बंगल्याला कुलूप लावलेले होते. आज सकाळी खडसे यांच्याकडील कर्मचारी नेहमीप्रमाणे बंगल्यावर आले असता, त्यांना घराच्या दाराचे कुलूप तुटलेले दिसले. त्यांनी घरात प्रवेश करून पाहणी केली असता, घरातील सामान अस्ताव्यस्त फेकलेले आढळले, ज्यामुळे घरात चोरी झाल्याचे स्पष्ट झाले.

 

 

घडलेल्या प्रकाराची माहिती तात्काळ एकनाथ खडसे यांना देण्यात आली, त्यानंतर त्यांनी पोलिसांना संपर्क साधून घटनेची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने मुक्ताई बंगल्याकडे धाव घेतली असून, पंचनामा करण्याची आणि तपास करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

 

श्वान पथकाला पाचरण

 

या घटनेचा लवकरात लवकर तपास लागावा तसेच चोरांना गजाआड करण्यासाठी पोलिसांनी तर्फे श्वान पथकाला पाचरण करण्यात आले. एका बड्या राजकीय नेत्याच्या निवासस्थानी चोरी झाल्याने जळगाव शहराच्या कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या चोरीत या व्यतिरिक्त नेमके किती नुकसान झाले आहे किंवा कोणकोणत्या वस्तू चोरीला गेल्या आहेत, याची नेमकी माहिती पोलिसांच्या तपासानंतरच समोर येईल. पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून असून त्यांना चोरांना शोधण्यासाठी मदत होऊ शकते. मात्र चोरांना शोधण्याचे पोलिसांपुढे मोठे आव्हान असल्याचे दिसत आहे.

बातमी शेअर करा !
Previous Post

कबुतरांपासून होणाऱ्या फुफुसाच्याआजाराच्या रुग्णाचे वाचविले प्राण

Next Post

प्रज्ञाचुक्ष व दिव्यांग बांधवांना दिवाळी फराळ भेट वस्तू वाटप 

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
प्रज्ञाचुक्ष व दिव्यांग बांधवांना दिवाळी फराळ भेट वस्तू वाटप 

प्रज्ञाचुक्ष व दिव्यांग बांधवांना दिवाळी फराळ भेट वस्तू वाटप 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जंक फूड मुक्त होळीचा विद्यार्थ्यांचा अनोखा संदेश!

जंक फूड मुक्त होळीचा विद्यार्थ्यांचा अनोखा संदेश!

March 2, 2026
चिमुकल्यांना भरवले आईस्क्रीम, ज्येष्ठांची विचारली खुशाली; खान्देश महोत्सवात महापौरांनी जपली ‘नात्यांची’ वीण

चिमुकल्यांना भरवले आईस्क्रीम, ज्येष्ठांची विचारली खुशाली; खान्देश महोत्सवात महापौरांनी जपली ‘नात्यांची’ वीण

March 2, 2026
खान्देश महोत्सवाच्या रंगमांच्यावर अभिनेता ओम यादव समवेत जळगावकर थिरकले !

खान्देश महोत्सवाच्या रंगमांच्यावर अभिनेता ओम यादव समवेत जळगावकर थिरकले !

March 1, 2026
जगाला कथा सांगणारा देश म्हणजे भारत – जेष्ठ अभिनेते मनोज जोशी

जगाला कथा सांगणारा देश म्हणजे भारत – जेष्ठ अभिनेते मनोज जोशी

March 1, 2026
खान्देश महोत्सवात आज “होम मिनिस्टर”व रंगणार पैठणीचा खेळ!

खान्देश महोत्सवात आज “होम मिनिस्टर”व रंगणार पैठणीचा खेळ!

February 28, 2026
स्थायी सभापतीपदी डॉ. चंद्रशेखर पाटील, महिला व बालकल्याण सभापतीपदी सिंधुताई कोल्हे बिनविरोध निवड!

स्थायी सभापतीपदी डॉ. चंद्रशेखर पाटील, महिला व बालकल्याण सभापतीपदी सिंधुताई कोल्हे बिनविरोध निवड!

February 27, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif