• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home आरोग्य

कबुतरांपासून होणाऱ्या फुफुसाच्याआजाराच्या रुग्णाचे वाचविले प्राण

डॉ उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातील सी. डी. सारंग यांच्या मार्गदर्शनाखाली तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमने केले यशस्वी उपचार. 

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
October 28, 2025
in आरोग्य, महाराष्ट्र
कबुतरांपासून होणाऱ्या फुफुसाच्याआजाराच्या रुग्णाचे वाचविले प्राण
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य डिजिटल न्यूज नेटवर्क

जळगाव दि.२७ – कबुतरांच्या संपर्कामुळे हायपरसेन्सिटिव्हिटी न्युमोनायटिस गंभीर फुफ्फुसांचा आजाराने अत्यावस्थ झालेल्या ३० वर्षीय युवकावर डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातील मेडीसिन तज्ञांनी अचूक आणि सातत्यपूर्ण उपचारांमुळे प्राण वाचवले.

एक ३० वर्षीय युवक अत्यावस्थ अवस्थेत रूग्णालयात दाखल झाला. रूग्णालयात आल्यानंतर तज्ज्ञ डॉक्टरांनी त्याची सविस्तर तपासणी केली. युवकाला सतत खोकला, श्वास घेण्यात त्रास, ताप, थकवा, अंगदुखी, छातीत दुखणे व दडपण यासारखी लक्षणे होती. त्याच्या छातीचा एक्स-रे, सीटी स्कॅन, पल्मोनरी फंक्शन टेस्ट, रक्त चाचणी, अ‍ॅन्टीबॉडी टेस्ट, ब्रोन्कोस्कोपी आणि लंग बायोप्सी करण्यात आली. यानंतरकबुतरांच्या संपर्कामुळे हायपरसेन्सिटिव्हिटी न्युमोनायटिस गंभीर फुफ्फुसांचा आजाराचे निदान निश्चित केले गेले.याच्यानंतर युवकाला स्वतंत्र बेडवर ठेवून २४ तास रक्तदाब आणि हृदयाचे ठोके यावर लक्ष ठेवत विविध औषधोपचार सुरू करण्यात आले. तब्बल २५ दिवसांच्या काळजीपूर्वक उपचारानंतर युवक पूर्णपणे धोक्याच्या बाहेर आला.यशस्वी उपचारासाठी डॉ. सी. डी. सारंग यांच्या मार्गदर्शनाखाली तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमने अत्यंत दक्षतेने काम केले.

हायपरसेन्सिटिव्हिटी न्यूमोनायटिस म्हणजे काय?

हा एक अ‍ॅलर्जिक फुफ्फुसांचा आजार आहे. पक्ष्यांचे पिसे, विष्ठा किंवा सुकलेल्या पिसांमधून उडणारे सूक्ष्म प्रथिनकण श्वासातून शरीरात जाऊन श्वसनमार्गात अ‍ॅलर्जी निर्माण करतात. यामुळे फुफ्फुसांमध्ये सूज येते आणि श्वास घेणे कठीण होते. हा आजार पिजन ब्रीडर्स लंग किंवा बर्ड फॅन्स लंग म्हणूनही ओळखला जातो.

सावधानता आणि प्रतिबंध:

पक्ष्यांशी संपर्क शक्यतो कमी करा.घरात किंवा छतावर पक्ष्यांचे घरटे तयार होऊ देऊ नका.पिसे किंवा विष्ठा साफ करताना मास्क व हातमोजे वापरा.पक्ष्यांची जागा स्वच्छ, हवेशीर आणि कोरडी ठेवा.लक्षणे दिसल्यास ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या.डॉ. सी. डी. सारंग यांनी सांगितले की, हा आजार संसर्गजन्य नाही, पण योग्य खबरदारी घेतल्यास टाळता येतो. पक्ष्यांवर प्रेम ठेवताना फुफ्फुसांचे आरोग्य जपणे अत्यंत महत्वाचे आहे.

बातमी शेअर करा !
Previous Post

वाळूचे ट्रॅक्टर उलटून एक जागीच ठार; एक गंभीर

Next Post

आमदार एकनाथराव खडसे यांच्या बंगल्यात चोरट्यांचा डल्ला.

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
आमदार एकनाथराव खडसे यांच्या बंगल्यात चोरट्यांचा डल्ला.

आमदार एकनाथराव खडसे यांच्या बंगल्यात चोरट्यांचा डल्ला.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

क्रिकेट फिव्हर ऑन.. जळगाव क्रिकेट लिगचा रोमहर्षक संग्राम

April 17, 2026
ना कजरे की धार..गिताव्दारे माजी खा.डॉ.उल्हास व डॉ वर्षा पाटील यांच्यातील गायकाचे घडले दर्शन

ना कजरे की धार..गिताव्दारे माजी खा.डॉ.उल्हास व डॉ वर्षा पाटील यांच्यातील गायकाचे घडले दर्शन

April 17, 2026
डिजिटल युगात महिलांनी सुरक्षित रहावे –महापौर दीपमाला काळे

डिजिटल युगात महिलांनी सुरक्षित रहावे –महापौर दीपमाला काळे

April 17, 2026
डिजिटल युगात महिलांनी सुरक्षित रहावे –महापौर दीपमाला काळे

डिजिटल युगात महिलांनी सुरक्षित रहावे –महापौर दीपमाला काळे

April 17, 2026
डिजिटल युगात महिलांनी सुरक्षित रहावे –महापौर दीपमाला काळे

डिजिटल युगात महिलांनी सुरक्षित रहावे –महापौर दीपमाला काळे

April 17, 2026
इम्पिरियल इंटरनॅशनल स्कूल CBSE दहावीचा 100% निकाल; शौर्य काबरा 95.5% गुणांसह प्रथम

इम्पिरियल इंटरनॅशनल स्कूल CBSE दहावीचा 100% निकाल; शौर्य काबरा 95.5% गुणांसह प्रथम

April 17, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif