• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home अपघात

वाळूचे ट्रॅक्टर उलटून एक जागीच ठार; एक गंभीर

मुक्ताईनगर तालुक्यातील पिंपरीनांदू येथील घटना: नागरिकांची घटनास्थळी धाव.

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
October 27, 2025
in अपघात, जिल्हा
वाळूचे ट्रॅक्टर उलटून एक जागीच ठार; एक गंभीर
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

मुक्ताईनगर : तालुक्यातील पिंपरीनांदू शिवारात सोमवारी दुपारी तापी नदीकाठी वाळूचे ट्रॅक्टर कलंडल्याने ट्रॉलीखाली दबून २१ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर त्याच्यासोबत असलेला दुसरा तरुण गंभीर जखमी झाला आहे.

 

ही दुर्घटना  २० ऑक्टोबर) रोजी सव्वाबारा वाजेच्या सुमारास घडली. मृत तरुणाचे नाव तोहीत शाह इस्माईल शाह (वय २१, रा. पिंपरीनांदू) असे आहे. तर गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव अनिकेत संदीप इंगळे (वय २०, रा. पिंपरीनांदू) असे पोलिसांनी सांगितले.

 

फिर्यादी सलीम शाह करीम शाह (वय ३९, रा. पिंपरीनांदू) यांनी मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात घटनेची माहिती दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार, तोहीत शाह आणि त्याचा परिवार मजुरीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतो. सोमवारी सकाळी सुमारे ११ वाजता तोहीत शाह हा मजुरीसाठी ट्रॅक्टर घेऊन तापी नदीकाठावर गेला होता. तेथे ट्रॅक्टरमध्ये वाळू भरल्यानंतर तो ट्रॉलीवर बसून गावाकडे परतत असताना, दुपारी १२.१५ वाजता ट्रॅक्टरचा ताबा सुटल्याने वाहन कलंडले.

 

या दुर्घटनेत ट्रॉलीखाली दाबून तोहीत शाहचा जागीच मृत्यू झाला, तर अनिकेत इंगळे हा गंभीर जखमी झाला. हा अपघात मोहन कुंभार यांच्या विटभट्ट्याच्या बाजूला, नदीकाठावर झाला. घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले व जखमींना ट्रॉलीखालून बाहेर काढले. दोघांनाही तात्काळ मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तोहीत शाह याला मृत घोषित केले, तर अनिकेत इंगळे याच्यावर उपचार सुरू आहेत.

 

घटनेची नोंद मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात करण्यात आली असून, पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

बातमी शेअर करा !
Previous Post

पालवी जैनच्या “स्वदेशी खरेदी करा”आर्ट वर्कला प्रथम पुरस्कार!

Next Post

कबुतरांपासून होणाऱ्या फुफुसाच्याआजाराच्या रुग्णाचे वाचविले प्राण

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
कबुतरांपासून होणाऱ्या फुफुसाच्याआजाराच्या रुग्णाचे वाचविले प्राण

कबुतरांपासून होणाऱ्या फुफुसाच्याआजाराच्या रुग्णाचे वाचविले प्राण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

July 22, 2026
४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

July 21, 2026
जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

July 21, 2026

केंद्रीय राज्य क्रीडा मंत्र्यांच्या जिल्ह्यात खेळाडूंवर अन्याय 15 ऑगस्ट रोजी आत्मदहनाचा इशारा

July 20, 2026
हातात माती… मनात निसर्ग!            सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

July 20, 2026
ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे  अरविंद लाठी कालवश!

ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे अरविंद लाठी कालवश!

July 19, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif