• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

पाडवा पहाट कार्यक्रमास रसिकांची उत्स्फूर्त दाद

स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानचे आयोजन ; राष्ट्रीय कीर्तनकार डॉ.चारुदत्त आफळे यांचे अभंग गायन

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
October 22, 2025
in जळगाव, शास्त्रीय संगीत, सामाजिक
पाडवा पहाट कार्यक्रमास रसिकांची उत्स्फूर्त दाद
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

 

नवराज्य डिजिटल न्यूज नेटवर्क 

जळगाव – स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान आयोजित २४ व्या “पाडवा पहाट” या प्रातःकालीन मैफलीचे आयोजन महात्मा गांधी उद्यानात पहाटे ६ वाजता करण्यात आले होते. यामध्ये प्रख्यात राष्ट्रीय कीर्तनकार, शास्त्रीय तसेच नाट्यसंगीत गायक व नट डॉ. चारुदत्त आफळे यांच्या नाट्यसंगीत व अभंग वाणी या मैफिलीचे आयोजन करण्यात आले होते. प्रतिष्ठानच्या परंपरेनुसार गुरुवंदना जळगावचे गायक वरुण नेवे यांनी सादर केली. त्यानंतर दीप प्रज्वलन डॉ. रणजीत चव्हाण प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. विवेकानंद कुलकर्णी कार्यकारी विश्वस्त दीपक चांदोरकर व सचिव अरविंद देशपांडे तसेच आजच्या कार्यक्रमाचे उत्सव मूर्ती डॉ. चारुदत्त आफळे यांनी केले. कलाकारांचा सत्कार मेजर नानासाहेब वाणी, विवेकानंद कुलकर्णी अरविंद देशपांडे व शरदचंद्र छापेकर यांनी केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनघा नाईक गोडबोले हिने केले. आणि सुरू झाला १८८२ सालापासूनचा संगीत नाटकातील नाट्यपदांचा प्रवास.

कार्यक्रमाची सुरुवात “पंचतुंड नर रुंड माल धर” या नांदीने झाली. संगीत मानापमान नाटकातील अत्यंत गाजलेले पद “चंद्रिका ही जणू”, हे नाट्यपद अत्यंत उत्तम रित्या सादर झाले ते त्यामधील बारकाव्यां सकट. संत कान्होपात्रा नाटकातील “पतीत तू पावना” हे पद सादर केले. रणदुंदुभी नाटकातील “दिव्य स्वातंत्र्य रवी” हे पद सादर केले. देव दिना घरी धावला नाटकातील “ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी भेटीत तुष्टता मोठी” हे पद त्याच्या भावार्थासह सादर केले. सं. मत्स्यगंधा नाटकातील जितेंद्र अभिषेक यांनी संगीतबद्ध केलेले “गुंतता हृदय हे” या नाट्यपदाने रसिकांना अक्षरशः खिळविले. त्यानंतर सं. कट्यार काळजात घुसली नाटकातील “तेजोनिधी लोह गोल ! भास्कर हे गनन राज” व “सुरत पिया की छिन् बिसुराये” ह्या पदाने तर रसिकांना मंत्रमुग्ध केले. “सर्वात्मका सर्वेश्वरा” या भैरवीने कार्यक्रमाची सांगता झाली. सुमारे दोन तास सुरू असलेली ही सुरेल मैफल केव्हा संपली हे रसिकांच्या लक्षातही आले नाही. जळगाव शहराचे आमदार माननीय श्री राजू मामा भोळे यांनीही या मैफलीचा आस्वाद घेतला. अनेक मान्यवरांसह जळगाव शहरातील तमाम रसिक वर्ग या मैफिलीने मंत्रमुग्ध झाला. या मैफिलिस कै. नथ्थुशेट चांदसरकर चॅरिटेबल ट्रस्ट व भवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशनचे सहकार्य लाभले. पाडवा पहाट कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्निग्धा कुलकर्णी, प्रसन्न भुरे, अथर्व मुंडले, वरूण नेवे, वरूण देशपांडे, अनघा नाईक गोडबोले, इ. नी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करा !
Previous Post

योग विषयात डॉ. गीतांजली भंगाळे यांना पीएच.डी.

Next Post

मुंबईतील जोगेश्वरीतील इमारतीला भीषण आग

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
मुंबईतील जोगेश्वरीतील इमारतीला भीषण आग

मुंबईतील जोगेश्वरीतील इमारतीला भीषण आग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोविंदाच्या थरांनी सागर पार्क दणाणणार !

गोविंदाच्या थरांनी सागर पार्क दणाणणार !

September 5, 2026
युवतींच्या दहीहंडीचा आज शिवतीर्थावर थरार

युवतींच्या दहीहंडीचा आज शिवतीर्थावर थरार

September 5, 2026
प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

September 3, 2026
जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

September 3, 2026
भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

September 3, 2026

राखीचा धागा मायेचा; ‘विशेष’ भगिनींना GPS परिवाराने दिला आपुलकीचा आधार

September 2, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif