• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

योग विषयात डॉ. गीतांजली भंगाळे यांना पीएच.डी.

मनोविकार व मनोचिकित्सेचा अभ्यासक्रम; शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातून कौतुक.

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
October 22, 2025
in जळगाव, गौरव, जिल्हा
योग विषयात डॉ. गीतांजली भंगाळे यांना पीएच.डी.
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

 

 

जळगाव : टेलिफोन नगर येथील रहिवासी व मेकमास्त्र इंजिनिअरिंग प्रा. लि., एमआयडीसी जळगावचे संचालक श्री. किरण भंगाळे यांच्या पत्नी तसेच कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या योगशास्त्र विभागातील सहायक प्राध्यापिका डॉ. गीतांजली भंगाळे यांनी निर्वाण विश्वविद्यालय, जयपूर (राजस्थान) येथून योग विषयात पीएच.डी. पदवी संपादन केली आहे.

 

त्यांनी “विभिन्न योग ग्रंथों में वर्णित मन, मनोविकार और मनोचिकित्सा का एक सैद्धांतिक अध्ययन” या विषयावर संशोधन केले असून हे संशोधनकार्य डॉ. नितीन कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण झाले. या प्रबंधात मानवी मनाचे चंचल स्वरूप, त्यातून उद्भवणारे तणाव, नैराश्य, चिंता यांसारखे मानसिक विकार आणि त्यावरील योगग्रंथांतील उपाययोजना यांचा सखोल अभ्यास करण्यात आला आहे.

 

श्रीमद् भगवद्गीतेतील अभ्यास-वैराग्य संकल्पना आणि पतंजल योगसूत्रांतील क्रियायोग व चित्तप्रसादनासाठी सुचविलेली साधने (मैत्री, करुणा, मुदिता) यांचे मनोचिकित्सात्मक महत्त्व स्पष्ट करण्यात आले आहे. योगाच्या माध्यमातून मानसिक आरोग्य सुदृढ ठेवण्याचे प्रभावी मार्ग या प्रबंधातून उलगडले आहेत.

 

या संशोधनासाठी निर्वाण विश्वविद्यालय, जयपूरचे कुलपती प्रा. एस. एल. गोदरा, रिसर्च डायरेक्टर डॉ. राजेश कुमार कासवान, डॉ. सपना नेहरा व डॉ. पियुष कुमार यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या या शैक्षणिक यशाबद्दल कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांनी अभिनंदन केले असून योगशास्त्र विभाग प्रमुख इंजि. राजेश पाटील आणि सहायक प्राध्यापिका डॉ. लीना चौधरी यांचे सहकार्य लाभले.

 

डॉ. भंगाळे यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल शैक्षणिक आणि सामाजिक वर्तुळातून त्यांचे अभिनंदन व कौतुकाचा वर्षाव होत आहे.

बातमी शेअर करा !
Previous Post

मा.आ. राजीव दादा देशमुख यांचे हृदयविकाराच्या झटक्क्याने निधन

Next Post

पाडवा पहाट कार्यक्रमास रसिकांची उत्स्फूर्त दाद

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
पाडवा पहाट कार्यक्रमास रसिकांची उत्स्फूर्त दाद

पाडवा पहाट कार्यक्रमास रसिकांची उत्स्फूर्त दाद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

July 22, 2026
४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

July 21, 2026
जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

July 21, 2026

केंद्रीय राज्य क्रीडा मंत्र्यांच्या जिल्ह्यात खेळाडूंवर अन्याय 15 ऑगस्ट रोजी आत्मदहनाचा इशारा

July 20, 2026
हातात माती… मनात निसर्ग!            सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

July 20, 2026
ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे  अरविंद लाठी कालवश!

ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे अरविंद लाठी कालवश!

July 19, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif