• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

मुस्लिम समाजाने मुख्य प्रवाहात सामील व्हावे

भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्धीकी यांचा पत्रकारांशी संवाद

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
October 18, 2025
in जळगाव, जिल्हा, राजकारण
मुस्लिम समाजाने मुख्य प्रवाहात सामील व्हावे
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य डिजिटल न्यूज नेटवर्क

जळगांव – भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्धीकी यांनी उत्तर महाराष्ट्र दौऱ्याप्रसंगी नुकतीच जळगांव जिल्हा भाजपा कार्यालयात भेट दिली. यावेळी त्यांच्या सोबत महाराष्ट्र राज्य हज कमिटी संचालक सलीम बागवान, सुफी संवाद राष्ट्रीय प्रभारी डॉ. अस्लम खान, महाराष्ट्र प्रभारी आबेद अली चौधरी हे उपस्थित होते.

 

यावेळी भाजपा पश्चिम जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी, महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष ॲड शहेबाज शेख, प्रदेश कार्यकारणी सदस्य जहांगिर खान, शब्बीरअली सय्यद यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

 

याप्रसंगी त्यांनी कार्यकर्त्यांशी व पत्रकार बांधवांशी संवाद साधला. आज केंद्र व राज्य सरकारने कोणताही भेदभाव न करता अनेक योजनांच्या माध्यमातून मुस्लिम अल्पसंख्यांक समाजाला मदतीचा हात दिला आहे. मुस्लिम समाजाने आज पर्यंत अनेक वर्षे पारंपरिक पद्धतीने काँग्रेस पक्षाला साथ दिली, परंतु त्यातून या समाजाला काहीही साध्य झालेले नाही. त्यामुळे मुस्लिम समाजाचा फक्त वोट बँक म्हणुन उपयोग करणाऱ्या काँग्रेस सारख्या संधी साधू पक्षाची साथ सोडून, मुस्लिम समाजाने भारतीय जनता पक्षासोबत मुख्य प्रवाहात सामील व्हावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. मुस्लिम समाजाचा खरा विकास हा भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातूनच शक्य असून काँग्रेस व त्यासारखे इतर पक्ष धर्मनिरपेक्षतेचा आव आणून मुस्लिम समाजाला अनेक वर्षांपासून भाजपची भीती दाखवून स्वतःचा स्वार्थ साधत आहे. त्यामुळे मुस्लिमांनी आता अश्या पक्षांची साथ पूर्णपणे सोडावी असे हि यावेळी बोलताना ते म्हणाले.

 

यावेळी धीरज वर्मा, प्रकाश पंडित, आसिफ शेख, अ.राउफ शेख, रज्जाक खान, याकूब खान, अफसर शेख, जमील शेख, ईद्रीस शेख, वसीम शेख, अनीस शेख, अकबर काकर, वसीम पटेल, रहीम शेख,नासिर शेख यांच्या सह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

बातमी शेअर करा !
Previous Post

मनोबल येथे नवीन अ‍ॅक्सेसीबल बसचे उद्घाटन

Next Post

मुख्यमंत्री सहायता निधीसअरविंद देशमुखांची लाखोंची मदत!

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
मुख्यमंत्री सहायता निधीसअरविंद देशमुखांची लाखोंची मदत!

मुख्यमंत्री सहायता निधीसअरविंद देशमुखांची लाखोंची मदत!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोविंदाच्या थरांनी सागर पार्क दणाणणार !

गोविंदाच्या थरांनी सागर पार्क दणाणणार !

September 5, 2026
युवतींच्या दहीहंडीचा आज शिवतीर्थावर थरार

युवतींच्या दहीहंडीचा आज शिवतीर्थावर थरार

September 5, 2026
प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

September 3, 2026
जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

September 3, 2026
भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

September 3, 2026

राखीचा धागा मायेचा; ‘विशेष’ भगिनींना GPS परिवाराने दिला आपुलकीचा आधार

September 2, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif