• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जिल्हा

मनोबल येथे नवीन अ‍ॅक्सेसीबल बसचे उद्घाटन

दीपस्तंभ मनोबल येथे ‘प्रकाशपूजन:  सशक्ततेचा दिला संदेश

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
October 20, 2025
in जिल्हा, सामाजिक
मनोबल येथे नवीन अ‍ॅक्सेसीबल बसचे उद्घाटन
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

 

जळगाव, –  दि. १५ ऑक्टोबर दीपस्तंभ मनोबलतर्फे दिवाळीच्या मंगलप्रसंगी दरवर्षीप्रमाणे ‘प्रकाशपूजन’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

 

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मा. सतीश जी मराठे (स्वतंत्र संचालक, भारतीय रिझर्व्ह बँक व अध्यक्ष, नाबार्ड), मा. मीनल करणवाल (मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव), मा. अनिकेत व समीक्षा आमटे (सामाजिक कार्यकर्ते)उपस्थित होते.

 

संस्थेत निवासी शिक्षण घेणाऱ्या दिव्यांग, अनाथ, ट्रान्सजेन्डर तसेच आर्थिक दृष्ट्या वंचित विद्यार्थ्यांना या दिवशी ओवाळून ‘ज्ञानरूपी प्रकाशाचे पूजन’ करण्यात आले.

विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी सर्व उपस्थितांची मने जिंकली.

 

कार्यक्रमात डॉ. राजेश डाबी व पुखराज पगारिया परिवार यांच्यातर्फे विद्यार्थ्यांना भेटवस्तू व स्नेहभोजन देखील दिले गेले. तसेच संस्थेचे सर्व संचालक शहरातील तसेच पुणे, मुंबई आणि नाशिक येथून आलेले देणगीदार उपस्थित होते.

 

या प्रसंगी दीपस्तंभ मनोबलच्या अ‍ॅक्सेसीबल बसचे लोकार्पण सतीश मराठे, मीनल करणवाल, अनिकेत आणि समीक्षा आमटे यांच्या हस्ते करण्यात आले. ही बस सुविधा दिव्यांग विद्यार्थ्यांच्या स्वावलंबनाकडे संस्थेने टाकलेले एक अर्थपूर्ण पाऊल ठरेल, असे मत मान्यवरांनी व्यक्त केले.

 

या वेळी मा. सतीश मराठे म्हणाले, “दीपस्तंभ मनोबलने शिक्षण, संस्कार आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर संगम घडवला आहे. संस्थेचे या कार्यातील सातत्य म्हणजे समाजातील सकारात्मक परिवर्तनाचे प्रतीक आहे.”अनिकेत आमटे यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक करत, “या मुलांच्या कलाकृतीतून आशा आणि आत्मविश्वासाचा खरा प्रकाश झळकतो,” असे मत व्यक्त केले. संस्थेचे संस्थापक यजुर्वेन्द्र महाजन यांनी या उपक्रमाचा हेतू सांगताना म्हटले, “प्रकाशपूजन हा केवळ सण नव्हे, तर अंधारातून प्रकाशाकडे, निराशेतून आशेकडे आणि एकाकीपणातून एकात्मतेकडे नेणारा सामाजिक संदेश आहे.”

 

या उपक्रमाद्वारे दीपस्तंभ मनोबलने पुन्हा एकदा आपल्या कार्यातून ‘समावेशक समाज’ घडवण्याची भूमिका अधोरेखित केली आहे.

बातमी शेअर करा !
Previous Post

जैन इरिगेशनला “राज्य निर्यात उत्कृष्टता” सुवर्ण पुरस्कार

Next Post

मुस्लिम समाजाने मुख्य प्रवाहात सामील व्हावे

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
मुस्लिम समाजाने मुख्य प्रवाहात सामील व्हावे

मुस्लिम समाजाने मुख्य प्रवाहात सामील व्हावे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

देवदत्त गोखले यांना पीएच.डी. प्रदान; संशोधनातून स्वप्नपूर्तीचा आनंद!

देवदत्त गोखले यांना पीएच.डी. प्रदान; संशोधनातून स्वप्नपूर्तीचा आनंद!

June 5, 2026
जळगावात गिरीश महाजनांची शिष्टाई फेल शिंदेसेनेची बंडखोरी ; चौरंगी लढत!

जळगावात गिरीश महाजनांची शिष्टाई फेल शिंदेसेनेची बंडखोरी ; चौरंगी लढत!

June 4, 2026
जैन इरिगेशनकडून जगातील सर्वात मोठ्या बायोचार रिअ‍ॅक्टर्सचे उद्घाटन

जैन इरिगेशनकडून जगातील सर्वात मोठ्या बायोचार रिअ‍ॅक्टर्सचे उद्घाटन

June 5, 2026
एआयच्या प्रभावी वापराने कृषी क्षेत्रात परिवर्तन – अनिल जैन

एआयच्या प्रभावी वापराने कृषी क्षेत्रात परिवर्तन – अनिल जैन

June 2, 2026
व्हेंटीलेटरवर असलेल्या तीन महिन्यांच्या शिशुचे वाचले प्राण!

व्हेंटीलेटरवर असलेल्या तीन महिन्यांच्या शिशुचे वाचले प्राण!

June 2, 2026
“माणसातला देव माणूस म्हणजे गुलाबराव पाटील; समाजसेवेचा वारसा जपणे हीच खरी संतसेवा” – साध्वी सोनाली दीदी करपे 

“माणसातला देव माणूस म्हणजे गुलाबराव पाटील; समाजसेवेचा वारसा जपणे हीच खरी संतसेवा” – साध्वी सोनाली दीदी करपे 

June 2, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif