मुख्यमंत्री सहायता निधीस अरविंद देशमुख लाखोंची मदत!
ना.गिरीश महाजन यांच्या प्रेरणेतून अरविंद देशमुख यांची मुख्यमंत्री सहायता निधीस लाखोंची मदत! जनसेवेचा आदर्श ठरले गिरीशभाऊंचे कार्यकर्ते!
नवराज्य डिजिटल न्यूज नेटवर्क
जळगाव –राजकारणात सेवा आणि संवेदनशीलता या दोन गोष्टींचे अद्वितीय मिश्रण म्हणजे नामदार गिरीशभाऊ महाजन! त्यांनी नुकतंच आपल्या संपूर्ण वर्षाचे मानधन मुख्यमंत्री सहायता निधीला दान करून महाराष्ट्रात समाजसेवेचा नवा आदर्श निर्माण केला. त्यांच्या या दानशूर आणि समाजाभिमुख भूमिकेचे संपूर्ण राज्यभर कौतुक झाले.
याच प्रेरणेतून गिरीशभाऊंचे कट्टर समर्थक निष्ठावंत कार्यकर्ते अरविंद देशमुख यांनीही मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी जळगाव जिल्हा दूध संघातील मागील तीन वर्षांचे संपूर्ण मानधन मुख्यमंत्री सहायता निधीस अर्पण केले आहे.
राज्यातील अनेक भागात अतिवृष्टीमुळे शेतकरी संकटात सापडलेले आहेत. शेतकऱ्यांच्या या दु:खद परिस्थितीला ओळखून देशमुख यांनी मुख्यमंत्री सहायता निधीस ही मदत केली असून हा निर्णय गिरीशभाऊ महाजन यांच्या आदर्शातूनच प्रेरित झालेला आहे.
देशमुख यांच्या या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे. सहकार क्षेत्र, राजकीय व सामाजिक वर्तुळांमधून गिरीशभाऊ महाजन यांच्या प्रेरणेने घेतलेल्या या उपक्रमाचे कौतुक केले जात आहे.
स्वतः नामदार गिरीशभाऊ महाजन यांनीही आपल्या कार्यकर्त्याने घेतलेल्या या निर्णयाचे विशेष अभिनंदन केले.
> “समाजातील अडचणीत असलेल्या घटकांना मदत करणे ही खरी सेवा आहे. माझा कार्यकर्ता अरविंद देशमुख याने ती सेवा कृतीतून दाखवली आहे, याचा मला अभिमान आहे.”
गिरीशभाऊ महाजन यांनी निर्माण केलेल्या समाजाभिमुख राजकारणाचा हा एक जिवंत पुरावा आहे. त्यांचा प्रत्येक कार्यकर्ता आज समाजासाठी काहीतरी देण्याच्या भावनेने कार्य करतो.
अरविंद देशमुख यांनी घेतलेला निर्णय ही गिरीशभाऊंच्या विचारसरणीची प्रत्यक्ष झलक आहे.
आज संपूर्ण जिल्ह्यात आणि राज्यभरात या निर्णयाची चर्चा असून, लोक गिरीशभाऊंच्या नेतृत्वाखालील या कार्यकर्तृत्वशाली संघटनेचं कौतुक करत आहेत.







