• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

केतन पाटील याचा टपाल विभागाच्या आंतरराष्ट्रीय पत्र लेखन स्पर्धेत द्वितीय

ए.टी. झांबरे विद्यालयाचा विद्यार्थी ठरला दहा हजार रुपयांच्या बक्षिसाचा मानकरी

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
October 13, 2025
in महाराष्ट्र, जिल्हा, स्पर्धा
केतन पाटील याचा टपाल विभागाच्या आंतरराष्ट्रीय पत्र लेखन स्पर्धेत द्वितीय
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

 

नवराज्य डिजिटल न्यूज नेटवर्क

जळगाव : ए.टी. झांबरे माध्यमिक विद्यालयाचा इयत्ता आठवीतील विद्यार्थी केतन गिरीश पाटील याने टपाल विभागातर्फे आयोजित आंतरराष्ट्रीय पत्र लेखन स्पर्धेत राज्यस्तरावर द्वितीय क्रमांक मिळवत विद्यालयाचा आणि जळगावचा मान उंचावला आहे. त्याला या यशाबद्दल टपाल विभागाकडून रुपये दहा हजारांचे रोख बक्षीस, प्रमाणपत्र आणि भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.

 

आंतरराष्ट्रीय टपाल दिनानिमित्त ए.टी. झांबरे विद्यालयात आयोजित विशेष कार्यक्रमात केतनचा टपाल विभागाच्या अधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मा. मोहम्मद खदीर (डाक अधीक्षक, जळगाव), मा. टी. एफ. तडवी (सहाय्यक डाक अधीक्षक मुख्यालय), एस. एस. म्हस्के (सहाय्यक डाक अधीक्षक उपविभाग), एस. एस. पाटील (विकास अधिकारी), एस. व्ही. मुंडे (विपणन अधिकारी), डॉ. अशोक राणे (प्राचार्य के.सी.ई. बी.एड. कॉलेज व संचालक, के.सी.ई. सोसायटी), तसेच  प्रणिता झांबरे आणि पर्यवेक्षक नरेंद्र पालवे आदी मान्यवर उपस्थित होते.

 

कार्यक्रमात केतनला दहा हजार रुपयांचा धनादेश व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले, तसेच त्याचे पालक यांचाही विशेष सत्कार करण्यात आला. केतनने “महासागराचे मनोगत” या विषयावर प्रभावी पत्र लिहून महासागरातील प्रदूषण, त्याचे परिणाम आणि पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती केली होती.

 

यापूर्वीही केतनला टपाल विभागाच्या फिलाटेली स्पर्धेत सहा हजार रुपयांची दिनदयाळ शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे. त्याच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष प्रा. नंदकुमार बेंडाळे, संचालक मंडळ, मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

 

या कार्यक्रमासाठी चेतन सोनार, संदेश करलकर, अनिल शिंदे आणि तुषार सोनवणे यांनी सहकार्य केले, तर सूत्रसंचालन श्  चंद्रकांत कोळी यांनी केले.

 

टपाल सेवेमुळे जग एकमेकांशी जोडले गेले आहे — हीच आंतरराष्ट्रीय टपाल दिनाची खरी भावना आहे.”

 

 

बातमी शेअर करा !
Previous Post

चक्क भाजपाच्याच महिला नेत्याला ईडीची धमकी देत मागितली ३० लाखाची खंडणी

Next Post

१०वी व १२वी बोर्ड परीक्षेच्या तारखा जाहीर

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
१०वी व १२वी बोर्ड परीक्षेच्या तारखा जाहीर

१०वी व १२वी बोर्ड परीक्षेच्या तारखा जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

July 22, 2026
४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

July 21, 2026
जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

July 21, 2026

केंद्रीय राज्य क्रीडा मंत्र्यांच्या जिल्ह्यात खेळाडूंवर अन्याय 15 ऑगस्ट रोजी आत्मदहनाचा इशारा

July 20, 2026
हातात माती… मनात निसर्ग!            सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

July 20, 2026
ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे  अरविंद लाठी कालवश!

ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे अरविंद लाठी कालवश!

July 19, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif