• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

चक्क भाजपाच्याच महिला नेत्याला ईडीची धमकी देत मागितली ३० लाखाची खंडणी

भ्रमणध्वनीवरून दिली धमकी; अज्ञात व्यक्ती विरुद्ध पाचोरा पोस्टेला गुन्हा दाखल

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
October 13, 2025
in जळगाव, क्राईम, महाराष्ट्र
चक्क भाजपाच्याच महिला नेत्याला ईडीची धमकी देत मागितली ३० लाखाची खंडणी
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

 

नवराज्य डिजिटल न्यूज नेटवर्क

पाचोरा :  जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नुकतेच ठाकरे गटाच्या शिवसेनेतून भाजपात प्रवेश केलेल्या पाचोरा येथील दिगवंत माजी आ. आर ओ तात्या पाटील यांची कन्या वैशाली सूर्यवंशी यांना अज्ञात व्यक्तीने भ्रमणध्वनीद्वारे धमकी देत चक्क ३० लाख रुपयांची खंडणी मागीतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यानंतर वैशाली सूर्यवंशी यांनी पोलिस ठाण्यात धाव घेत अज्ञात व्यक्तीविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

 

सविस्तर वृत्त असे कि, सन २०२४ मध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत वैशाली सूर्यवंशी यांनी उमेदवारी केली होती. त्या वेळी वैशाली सूर्यवंशी यांना अज्ञात क्रमांकावरुन फोन आला होता. त्यावेळी अज्ञात व्यक्तीने वैशाली सूर्यवंशी यांना कुटनितीने तुम्हाला जिंकुन देतो, असे सांगितले होते. मात्र, वैशाली सूर्यवंशी यांनी त्याकडे दुर्लक्ष केले होते. दरम्यान, सप्टेंबर २०२५ मध्ये पुन्हा त्या अज्ञात व्यक्तीने वेगवेगळ्या मोबाइलवरुन वैशाली सूर्यवंशी यांना फोन करुन धमकावण्याची भाषा केली. तुम्ही विधानसभेच्या निवडणुकीत पैसे वाटल्याची आक्षेपार्ह बनावट क्लिप तयार करुन सोशल मीडियावर टाकेल, तसेच इन्कमटॅक्स, सीबीआय, इडी यांच्याकडे तक्रार करेल, अशी धमकी देवून ३० लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली.

 

तसेच पैसे न दिल्यास समाजामध्ये तुमची, कुटुबांची बदनामी करेल, तुमच्या गाडीत ड्रग्स ठेवुन बदनामी करेल, अशीही धमकी दिली. दरम्यान, वैशाली सूर्यवंशी यांनी पोलिस ठाणे गाठत अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. या घटनेचा तपास पो.नि. राहुलकुमार पवार करत आहेत.

आतातर भाजपाच्याच नेत्यांना ईडी च्या नावाने धमकी देईन खंडणी मागितली जात असेल तर सामान्य माणसांचे काय असा प्रश्न जान सामान्यांनाना पडत आहे.

बातमी शेअर करा !
Previous Post

अनुभूती निवासी स्कूलमधील सीआयएससीई- राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा

Next Post

केतन पाटील याचा टपाल विभागाच्या आंतरराष्ट्रीय पत्र लेखन स्पर्धेत द्वितीय

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
केतन पाटील याचा टपाल विभागाच्या आंतरराष्ट्रीय पत्र लेखन स्पर्धेत द्वितीय

केतन पाटील याचा टपाल विभागाच्या आंतरराष्ट्रीय पत्र लेखन स्पर्धेत द्वितीय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव क्रिकेट लिगचा उद्या रोमहर्षक संग्राम

जळगाव क्रिकेट लिगचा उद्या रोमहर्षक संग्राम

April 17, 2026
ना कजरे की धार..गिताव्दारे माजी खा.डॉ.उल्हास व डॉ वर्षा पाटील यांच्यातील गायकाचे घडले दर्शन

ना कजरे की धार..गिताव्दारे माजी खा.डॉ.उल्हास व डॉ वर्षा पाटील यांच्यातील गायकाचे घडले दर्शन

April 17, 2026
डिजिटल युगात महिलांनी सुरक्षित रहावे –महापौर दीपमाला काळे

डिजिटल युगात महिलांनी सुरक्षित रहावे –महापौर दीपमाला काळे

April 17, 2026
डिजिटल युगात महिलांनी सुरक्षित रहावे –महापौर दीपमाला काळे

डिजिटल युगात महिलांनी सुरक्षित रहावे –महापौर दीपमाला काळे

April 17, 2026
डिजिटल युगात महिलांनी सुरक्षित रहावे –महापौर दीपमाला काळे

डिजिटल युगात महिलांनी सुरक्षित रहावे –महापौर दीपमाला काळे

April 17, 2026
इम्पिरियल इंटरनॅशनल स्कूल CBSE दहावीचा 100% निकाल; शौर्य काबरा 95.5% गुणांसह प्रथम

इम्पिरियल इंटरनॅशनल स्कूल CBSE दहावीचा 100% निकाल; शौर्य काबरा 95.5% गुणांसह प्रथम

April 17, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif