• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home Uncategorized सामाजिक

स्व. कांताई जैन यांच्या स्मृतिदिनी ४४५ सहकाऱ्यांचे रक्तदान

कंपनीच्या देशभरातील चित्तुर बडोदा, हैद्राबाद, उदमलपेठ प्रमुख आस्थापनांमध्ये रक्तदान शिबीर

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
September 8, 2025
in सामाजिक, जळगाव
स्व. कांताई जैन यांच्या स्मृतिदिनी ४४५ सहकाऱ्यांचे रक्तदान
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य डिजिटल न्यूज नेटवर्क

जळगाव, –  दि. ८   जैन इरिगेशनचे संस्थापक अध्यक्ष भवरलालजी जैन यांच्या पत्नी स्व. सौ. कांताबाई जैन यांच्या स्मृतिदिनानिमित्त यावर्षी ४४५ सहकाऱ्यांनी रक्तदान केले. तसेच जळगाव शहरातील सेवाभावी संस्थांमध्ये स्नेहाच्या शिदोरी या उपक्रमांतर्गत सुमारे ५५० जणांना मिष्टान्न पाकिटांचे वाटप करण्यात आले.
स्व. सौ. कांताबाई जैन यांच्या स्मृतिदिनानिमित्त ८ सप्टेंबर रोजी कंपनीच्या देशभरातील प्रमुख आस्थापनांमध्ये रक्तदान शिबीर घेण्यात आले होते. यात जैन प्लास्टिक पार्क येथे २१७, फूड पार्क ११७ , अलवर ४, बडोदा 9, चित्तूर २५, हैदराबाद ८, उदमलपेट येथील ६ सहकाऱ्यांनी रक्तदान केले. जळगावमध्ये जैन प्लास्टिक पार्क-बांभोरी, जैन फूडपार्क आणि भारतातील चित्तुर, बडोदा, हैद्राबाद, उदमलपेठ या ठिकाणी देखील जैन इरिगेशनच्या सहकाऱ्यांनी रक्तदान केले.
प्लास्टिक पार्क, टी.सी.पार्क आणि जैन फूड मॉल येथील सहकाऱ्यांसाठी प्लास्टिक पार्क येथील डेमो हॉलमध्ये तर जैन अँग्री पार्क, फूड पार्क, एनर्जी पार्क आणि डिव्हाईन पार्क येथील सहकाऱ्यांसाठी फूड पार्क येथील प्रशासकीय इमारतीजवळ रक्तदान शिबीर घेण्यात आले. सकाळी ८ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत हे शिबीर घेण्यात आले.

सामाजिक, राष्ट्रीय आणि जागतिक स्तरावर जैन इरिगेशन कंपनीचे नाव जेव्हा जेव्हा समोर येते, तेव्हा तेव्हा लौकीकार्थाने केलेल्या सामाजिक कार्याची नोंद ठळकपणे घेतली जाते. कंपनीचे संस्थापक श्रद्धेय भवरलालजी जैन यांनी सुरु झालेल्या सामाजिक कार्याला आजही तितक्याच जोमाने प्रवाहित ठेवले आहे. स्व. कांताबाई जैन यांच्या स्मृतीनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर हे त्याचेच एक प्रतीक होय.

प्लास्टिक पार्क येथील शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी रेडक्रॉस बल्ड बँकेच्या चेअरमन मंगला ठोंबरे, डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी, रेडक्रॉसच्या पीआरओ उज्ज्वला वर्मा, डॉ.राजकुमार वाणी, जिल्हा रुग्णालयाचे डॉक्टर राहुल पाटील, डॉ.विद्या शिरसाठ, डॉ.कपिल पाटील, जैन इरिगेशनचे सीनिअर व्हाईस प्रेसिडेंट (पर्सेनल) सी.एस.नाईक, राजश्री पाटील, किशोर बोरसे, डॉ.अश्विनी पाटील, अश्विनी खैरनार के.बी.सोनार, गोरख म्हेत्रे, डॉ.अनिल पाटील, डॉ ज्ञानेश्वर  पाटील, के.एल.नेमाडे आणि मानव संसाधन आणि कार्मिक विभागातील सर्व सहकाऱ्यांनी प्रयत्न केले.

फूड पार्क येथील रक्तदान शिबिराचे उद्घाटन विजय मुथा यांनी केले. यावेळी व्ही.पी.पाटील, सुनील गुप्ता, संजय पारख, किशोर बाविस्कर, जी. आर. चौधरी, जी.आर.पाटील आणि इतर सहकारी उपस्थित होते. फूड पार्क येथे एकूण ११७ सहकाऱ्यांनी रक्तदान केले. गोळवलकर ब्लड बँक, गोदावरी ब्लड बँकेने रक्तसंकलन केले.

जैन इरिगेशन बांभोरी येथील आस्थापनेत रक्तदान शिबिराप्रसंगी रेडक्रॉसच्या चेअरमन मंगला ठोंबरे, ब्लड बँकेचे चेअरमन डॉ.प्रसन्नकुमार रेदासनी, रेडक्रॉसच्या पीआरओ उज्ज्वला वर्मा, जैन इरिगेशनचे वरिष्ठ व्हाईस प्रसिडेंट (पर्सेनल) सी.एस.नाईक व इतर सहकारी.

 

बातमी शेअर करा !
Previous Post

शिक्षक दिनी इम्पिरियल इंटरनॅशनल स्कूल, पाळधी येथे शिक्षकांचा गौरव

Next Post

शिरीष मधुकरराव चौधरी महाविद्यालयात सात दिवसीय संगणक कार्यशाळेचे आयोजन

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
शिरीष मधुकरराव चौधरी महाविद्यालयात सात दिवसीय संगणक कार्यशाळेचे आयोजन

शिरीष मधुकरराव चौधरी महाविद्यालयात सात दिवसीय संगणक कार्यशाळेचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

July 22, 2026
४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

July 21, 2026
जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

July 21, 2026

केंद्रीय राज्य क्रीडा मंत्र्यांच्या जिल्ह्यात खेळाडूंवर अन्याय 15 ऑगस्ट रोजी आत्मदहनाचा इशारा

July 20, 2026
हातात माती… मनात निसर्ग!            सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

July 20, 2026
ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे  अरविंद लाठी कालवश!

ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे अरविंद लाठी कालवश!

July 19, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif