• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home आंतरराष्ट्रीय

आज रात्री लागणार चंद्राला ग्रहण  

 ५ तास२७ मिनिटे चालणारी दुर्मीळ खगोलीय घटना ;सोमवारी सकाळी सुटणार ग्रहण  

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
September 7, 2025
in आंतरराष्ट्रीय, प्राकृतिक, ब्रेकिंग
आज रात्री लागणार चंद्राला ग्रहण  
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

 

नवराज्य डिजिटल न्यूज नेटवर्क by योगेश सुने

जळगाव -आकाशातील दुर्मीळ व थरारक खगोलीय घटना अनुभवण्याची संधी ७ सप्टेंबर २०२५ रोजी रात्रीपासून मिळणार आहे. या दिवशी रात्री सुरू होणारे खग्रास चंद्रग्रहण थेट ८ सप्टेंबरच्या पहाटेपर्यंत चालणार असून तब्बल ५ तास २७ मिनिटे हा अद्भुत देखावा आकाशात झळकणार आहे. चंद्र हळूहळू पृथ्वीच्या विरळ सावलीतून (Penumbral) प्रवेश करून गडद सावलीत (Umbra) जाताना पूर्णपणे आच्छादित होईल व पुन्हा सावलीतून बाहेर येईल. जवळपास १ तास २३ मिनिटे चंद्र पृथ्वीच्या गडद छायेत राहणार असल्याने हे ग्रहण विशेष ठरणार आहे.

 

या घटनेचा आनंद घेण्यासाठी नागरिकांनी कोणतेही गैरसमज मनात न ठेवता आकाशाकडे पाहावे, असे खगोल अभ्यासकांचे आवाहन आहे.

 

अशी असणार ग्रहणाची वेळ

🌑    ८:५८ रात्री – चंद्र पृथ्वीच्या विरळ सावलीला (Penumbral) स्पर्श करेल.

🌑 ९:५७ रात्री – गडद सावलीला (Umbra) स्पर्श करून खग्रास ग्रहणाची सुरुवात.

🌑 ११:०० रात्री – चंद्र पूर्ण गडद सावलीत.

🌑 ११:४२ रात्री – चंद्र सावलीच्या मध्यभागी.

🌑 १२:२३ पहाटे – चंद्र पुन्हा विरळ सावलीत.

🌑 १:२६ पहाटे – चंद्र पूर्णपणे विरळ सावलीत.

🌑 २:२५ पहाटे – ग्रहणाची समाप्ती.

एकूण ग्रहणाचा कालावधी ५ तास २७ मिनिटे असून, त्यापैकी १ तास २३ मिनिटे चंद्र गडद छायेत (Umbra) राहणार आहे.

चंद्रग्रहण कसे होते?

अवकाशात पृथ्वीच्या दोन सावल्या पडतात – गडद सावली (Umbra) व विरळ सावली (Penumbra).पृथ्वी सूर्याभोवती आणि चंद्र पृथ्वीभोवती फिरत असल्याने, विशिष्ट स्थितीत चंद्र पृथ्वीच्या सावलीत शिरतो.

पूर्ण सावलीत गेल्यास → खग्रास चंद्रग्रहण.

अंशतः गडद सावलीत गेल्यास → खंडग्रास चंद्रग्रहण.

फक्त विरळ सावलीतून गेल्यास → छायाकल्प चंद्रग्रहण.

 

  समज,गैरसमज  बाजूला ठेवण्याचे आवाहन

सध्या पावसाळा सुरू असल्याने ढगाळ वातावरण असण्याची शक्यता आहे. तरीही हवामान अनुकूल असेल तर नागरिकांनी कोणतेही समज-गैरसमज बाजूला ठेवून या दुर्मीळ खगोलीय घटनेचा आनंद घ्यावा, असे आवाहन खगोल अभ्यासक अमोघ जोशी (जळगाव) यांनी केले आहे.

 

बातमी शेअर करा !
Previous Post

जळगाव, धुळे, नंदुरबार व नाशिक जिल्ह्यात पुढील ३ तास जोरदार पावसाची शक्यता

Next Post

मू.जे महाविद्यालयात MOU कार्यक्रमाचे आयोजन

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
मू.जे महाविद्यालयात MOU कार्यक्रमाचे आयोजन

मू.जे महाविद्यालयात MOU कार्यक्रमाचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव क्रिकेट लिगचा उद्या रोमहर्षक संग्राम

जळगाव क्रिकेट लिगचा उद्या रोमहर्षक संग्राम

April 17, 2026
ना कजरे की धार..गिताव्दारे माजी खा.डॉ.उल्हास व डॉ वर्षा पाटील यांच्यातील गायकाचे घडले दर्शन

ना कजरे की धार..गिताव्दारे माजी खा.डॉ.उल्हास व डॉ वर्षा पाटील यांच्यातील गायकाचे घडले दर्शन

April 17, 2026
डिजिटल युगात महिलांनी सुरक्षित रहावे –महापौर दीपमाला काळे

डिजिटल युगात महिलांनी सुरक्षित रहावे –महापौर दीपमाला काळे

April 17, 2026
डिजिटल युगात महिलांनी सुरक्षित रहावे –महापौर दीपमाला काळे

डिजिटल युगात महिलांनी सुरक्षित रहावे –महापौर दीपमाला काळे

April 17, 2026
डिजिटल युगात महिलांनी सुरक्षित रहावे –महापौर दीपमाला काळे

डिजिटल युगात महिलांनी सुरक्षित रहावे –महापौर दीपमाला काळे

April 17, 2026
इम्पिरियल इंटरनॅशनल स्कूल CBSE दहावीचा 100% निकाल; शौर्य काबरा 95.5% गुणांसह प्रथम

इम्पिरियल इंटरनॅशनल स्कूल CBSE दहावीचा 100% निकाल; शौर्य काबरा 95.5% गुणांसह प्रथम

April 17, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif