• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

केसीइतॲक्युप्रेशर क्रॅश कोर्स यशस्वीपणे संपन्न

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
August 13, 2025
in जळगाव, आरोग्य, ब्रेकिंग
केसीइतॲक्युप्रेशर  क्रॅश कोर्स यशस्वीपणे संपन्न
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

एक्यूप्रेशर क्रॅश कोर्स यशस्वीपणे संपन्न

एम.जे. कॉलेजचे सोहम योग आणि पराग कुलकर्णी ॲक्युप्रेशर ट्रीटमेंट सेंटर नागपूर यांचा संयुक्त उपक्रम

 

जळगाव-मू.जे. महाविद्यालयाचे सोहम् डिपार्टमेंट ऑफ योग अँड नॅचरोपॅथी आणि  श्री साई समर्थ एज्युकेशनल मेडिकल अँड रिसर्च सेंटरचे पराग  कुलकर्णी एक्यूप्रेशर ट्रीटमेंट सेंटर नागपूर  व यांच्या संयुक्त विद्यमाने  सात दिवसीय एक्यूप्रेशर क्रॅश कोर्सचे आयोजन सोहम योग विभागामध्ये दि. ४ ते १० ऑगस्ट दरम्यान करण्यात आले होते. या कोर्सचा समारोपीय कार्यक्रम १० ऑगस्ट २०२५ रोजी उत्साहात संपन्न झाला.

समारोप प्रसंगी प्रमुख अतिथी के. सी. ई

सोसायटीच्या शैक्षणिक संचालक डॉ. मृणालिनी फडणवीस, एक्यूप्रेशर तज्ञ डॉ. पराग कुळकर्णी, योग विभागाचे प्रमुख डॉ. देवानंद सोनार व भवतीक जोशी व्यासपीठावर उपस्थित होते. मान्यवरांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, “एक्यूप्रेशर ही प्राचीन उपचारपद्धती केवळ शारीरिक वेदना कमी करण्यासाठीच नव्हे, तर मानसिक संतुलनासाठीही उपयुक्त आहे.”

सात दिवसांच्या कालावधीत सहभागी विद्यार्थ्यांना या  कोर्समध्ये एक्यूप्रेशरचे मूलतत्त्व, शरीरातील ऊर्जा बिंदू, रोगनिवारणासाठी विविध दाबपद्धती तसेच स्व-उपचार तंत्र यांचा सखोल अभ्यास व प्रात्यक्षिक प्रशिक्षण देण्यात आले. प्रत्यक्ष सरावातून विविध उपचारपद्धती आत्मसात केल्या. कोर्स यशस्वी करण्यासाठी नागपूरचे ॲक्युप्रेशर तज्ञ डॉ. पराग कुळकर्णी व भवतीक जोशी यांचे मोलाचे योगदान राहिले. या कोर्समध्ये एकूण ४० महिला पुरुषांनी सहभाग नोंदविला.

समारोप सोहळ्यात सर्व सहभागींना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. उपस्थितांनी प्रतिक्रिया देताना ॲक्युप्रेशर च्या माध्यमातून अनेक विकारापासून मुक्ती मिळाल्याची भावन व्यक्त केली. प्रशिक्षणाचा उपयोग समाजाच्या आरोग्यवर्धनासाठी करण्याचा संकल्प यावेळी  व्यक्त केला आणि  भविष्यात दीर्घ कालावधीचे एक्युप्रेशर चे कोर्स सुरू करावेत अशी अपेक्षा व्यक्त केली.

आयोजनमध्ये प्राचार्य संजय ना. भारंबे, प्रा. मृणालिनी फडणविस यांचे मार्गदर्शन व योगदान लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. ज्योती वाघ यांनी केले. यशस्वीतेसाठी प्रा. पंकज खाजबागे, प्रा. श्रध्दा व्यास, स्वप्नाली महाले, राहुल खरात, आयुष तोतला आणि एम. ए. योगशास्त्र अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करा !
Previous Post

शिवसेना पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मांडला पत्त्याचा डाव !

Next Post

सागर पार्कवर होणार युवतींची भव्य दहीहंडी

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
सागर पार्कवर होणार युवतींची भव्य दहीहंडी

सागर पार्कवर होणार युवतींची भव्य दहीहंडी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

देवदत्त गोखले यांना पीएच.डी. प्रदान; संशोधनातून स्वप्नपूर्तीचा आनंद!

देवदत्त गोखले यांना पीएच.डी. प्रदान; संशोधनातून स्वप्नपूर्तीचा आनंद!

June 5, 2026
जळगावात गिरीश महाजनांची शिष्टाई फेल शिंदेसेनेची बंडखोरी ; चौरंगी लढत!

जळगावात गिरीश महाजनांची शिष्टाई फेल शिंदेसेनेची बंडखोरी ; चौरंगी लढत!

June 4, 2026
जैन इरिगेशनकडून जगातील सर्वात मोठ्या बायोचार रिअ‍ॅक्टर्सचे उद्घाटन

जैन इरिगेशनकडून जगातील सर्वात मोठ्या बायोचार रिअ‍ॅक्टर्सचे उद्घाटन

June 5, 2026
एआयच्या प्रभावी वापराने कृषी क्षेत्रात परिवर्तन – अनिल जैन

एआयच्या प्रभावी वापराने कृषी क्षेत्रात परिवर्तन – अनिल जैन

June 2, 2026
व्हेंटीलेटरवर असलेल्या तीन महिन्यांच्या शिशुचे वाचले प्राण!

व्हेंटीलेटरवर असलेल्या तीन महिन्यांच्या शिशुचे वाचले प्राण!

June 2, 2026
“माणसातला देव माणूस म्हणजे गुलाबराव पाटील; समाजसेवेचा वारसा जपणे हीच खरी संतसेवा” – साध्वी सोनाली दीदी करपे 

“माणसातला देव माणूस म्हणजे गुलाबराव पाटील; समाजसेवेचा वारसा जपणे हीच खरी संतसेवा” – साध्वी सोनाली दीदी करपे 

June 2, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif