• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

पाडळसरे धरण प्रकल्पासाठी ८५९ कोटींचा निधी

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
August 8, 2025
in जळगाव, राजकारण
पाडळसरे धरण प्रकल्पासाठी ८५९ कोटींचा निधी
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

 

पाडळसरे धरण प्रकल्पासाठी ८५९ कोटींचा निधी

 

खासदार स्मिता वाघ यांच्या पाठपुराव्याला यश; जळगाव जिल्ह्यातील सिंचन क्षेत्र विस्ताराला चालना

 

जळगाव  जिल्ह्याच्या सिंचन क्षमतेला बळकटी देणाऱ्या पाडळसरे धरण प्रकल्पास (निम्न तापी प्रकल्प) केंद्र सरकारकडून मोठा दिलासा मिळाला आहे. हा प्रकल्प प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत (PMKSY) अखेर समाविष्ट झाला असून, केंद्र शासनाने ८५९ कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याचे आज अधिकृत अधिसूचनेद्वारे स्पष्ट झाले. या निर्णयामुळे प्रकल्पाच्या अमलबजावणीला गती मिळून हजारो हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. या महत्त्वाच्या प्रकल्पाला यापूर्वीच PIB मान्यता प्राप्त झाली होती. मात्र, PMKSY योजनेतील समावेशामुळे निधी वितरण, प्रशासकीय मंजुरी आणि काम सुरू करण्याच्या प्रक्रियेस आता अधिकृत वेग मिळणार आहे.

 

या ऐतिहासिक निर्णयामागे खासदार स्मिता वाघ यांचा सातत्यपूर्ण व प्रभावी पाठपुरावा निर्णायक ठरला आहे. खासदार झाल्यापासून त्यांनी प्रकल्पासाठी केंद्र व राज्य शासनाच्या विविध पातळ्यांवर पाठपुरावा करताना, लोकसभेतही यासंदर्भात आवाज उठवला. केंद्रीय जलशक्ती मंत्री सी.आर. पाटील साहेब, अर्थमंत्री निर्मलाजी सीतारामन यांच्यासह संबंधित सर्व यंत्रणांशी त्यांनी थेट संपर्क साधला. या निधी मंजुरीबद्दल प्रतिक्रिया देताना खासदार वाघ म्हणाल्या, “पाडळसरे प्रकल्पाच्या PMKSY योजनेतील समावेशामुळे केवळ निधी मंजूर झाला नाही, तर जळगाव जिल्ह्यातील शेती व शेतकऱ्यांसाठी ही एक नवी दिशा व नवसंजीवनी ठरणार आहे.”

 

पाडळसरे प्रकल्पामुळे तापी नदीच्या पाण्याचा शाश्वत व कार्यक्षम वापर करता येणार असून, हजारो शेतकऱ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडणार आहे. सिंचन सुविधा उपलब्ध झाल्याने शेती उत्पादनात वाढ, पीक विविधीकरण, व आर्थिक स्थैर्य साधण्यास मोठा आधार मिळेल. यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या विकासालाही गती मिळेल. त्यांनी यासाठी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी,केंद्रीय जलशक्ती मंत्री सी.आर.पाटील साहेब, अर्थमंत्री निर्मलाजी सीतारामन, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार,जलसंपदा मंत्री गिरीशजी महाजन,जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबरावजी पाटील,आमदार अनिल पाटील यांचे विशेष आभार मानले आहेत

बातमी शेअर करा !
Previous Post

श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयात “एक राखी सुरक्षतेची एक राखी सन्मानाची”

Next Post

प्रा.संजय मोरे यांचा राष्ट्ररत्न राष्ट्रीय पुरस्काराने होणार सन्मान

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
प्रा.संजय मोरे यांचा राष्ट्ररत्न राष्ट्रीय पुरस्काराने होणार सन्मान

प्रा.संजय मोरे यांचा राष्ट्ररत्न राष्ट्रीय पुरस्काराने होणार सन्मान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

फुकटच्या सवयींमुळे समाज पंगू होत आहे – पद्मश्री पोपटराव पवार

फुकटच्या सवयींमुळे समाज पंगू होत आहे – पद्मश्री पोपटराव पवार

March 3, 2026
जंक फूड मुक्त होळीचा विद्यार्थ्यांचा अनोखा संदेश!

जंक फूड मुक्त होळीचा विद्यार्थ्यांचा अनोखा संदेश!

March 2, 2026
चिमुकल्यांना भरवले आईस्क्रीम, ज्येष्ठांची विचारली खुशाली; खान्देश महोत्सवात महापौरांनी जपली ‘नात्यांची’ वीण

चिमुकल्यांना भरवले आईस्क्रीम, ज्येष्ठांची विचारली खुशाली; खान्देश महोत्सवात महापौरांनी जपली ‘नात्यांची’ वीण

March 2, 2026
खान्देश महोत्सवाच्या रंगमांच्यावर अभिनेता ओम यादव समवेत जळगावकर थिरकले !

खान्देश महोत्सवाच्या रंगमांच्यावर अभिनेता ओम यादव समवेत जळगावकर थिरकले !

March 1, 2026
जगाला कथा सांगणारा देश म्हणजे भारत – जेष्ठ अभिनेते मनोज जोशी

जगाला कथा सांगणारा देश म्हणजे भारत – जेष्ठ अभिनेते मनोज जोशी

March 1, 2026
खान्देश महोत्सवात आज “होम मिनिस्टर”व रंगणार पैठणीचा खेळ!

खान्देश महोत्सवात आज “होम मिनिस्टर”व रंगणार पैठणीचा खेळ!

February 28, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif