• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

जळगावात महापौर दीपमाला काळेंची अचानक पाहणी; स्वच्छता, अतिक्रमणावर कडक कारवाईचे आदेश

शाहूनगर, ट्रॅफिक गार्डन आणि उर्दू शाळा परिसराची पाहणी; कचरा टाकणाऱ्यांवर दंड, पाणीगळती रोखण्याचे निर्देश, शाळा प्रशासनाकडून लेखी खुलासा मागवला

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
October 23, 2026
in जळगाव, Uncategorized
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

जळगाव : महानगरपालिकेच्या महापौर दीपमाला मनोज काळे यांनी महापौर स्वच्छता संकल्प अभियान अंतर्गत गुरुवारी (२२ ऑक्टोबर) वार्ड क्रमांक ६ मधील शाहूनगर, ट्रॅफिक गार्डन आणि उर्दू शाळा परिसराची अचानक पाहणी करून प्रशासकीय यंत्रणेची झाडाझडती घेतली आणि कडक कारवाईचे निर्देश दिले.

कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचे आदेश

ट्रॅफिक गार्डन परिसरात उघड्यावर टाकण्यात येणारा कचरा उचलण्याचे काम सुरू असताना, यापुढे परिसरातील नागरिकांनी उघड्यावर कचरा टाकल्यास प्रथम नोटीस आणि त्यानंतर दंडात्मक कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश महापौरांनी दिले.

पाणीपुरवठा विभागाची तपासणी व ताकीद

शाहूनगर येथील पाणीपुरवठा विभागास भेट दिली असता एकच कर्मचारी उपस्थित आढळला व इतर कर्मचारी इतर कामावर असल्याचे दिसून आले. यावर महापौरांनी हालचाल रजिस्टर तपासून शाहूनगर भागातील सर्व पाण्याचे कनेक्शन आणि तोट्या तात्काळ दुरुस्त करून पाणी वाया जाणार नाही याची दक्षता घेण्याचे आदेश दिले.

उर्दू शाळेतील अनागोंदीवर संताप

उर्दू शाळा क्रमांक १२ ची संरक्षण भिंत तुटलेली असून तेथे काही नागरिक भंगार गोळा करत असल्याचे निदर्शनास आले. परिसराचा मोठा भाग वापरविना पडल्याचे पाहून महापौरांनी शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकाऱ्यांना धारेवर धरत त्यांच्याकडून तातडीने लेखी स्पष्टीकरण मागितले.

अतिक्रमण आणि स्वच्छता मोहीम तीव्र

शाहूनगर मार्केटमधील दुकानदारांना दुकानासमोर डस्टबिन ठेवण्याची सक्ती करण्यात आली असून ट्रॅफिक गार्डन परिसरात कचरा टाकल्यास दंडाची तंबी देण्यात आली. तसेच, रस्त्यावर धूळ खात बंद पडलेल्या रिक्षा आणि बॉम्बे बिर्याणीसह इतरांचे बेकायदेशीर अतिक्रमण तात्काळ हटवून भंगार म्हणून जप्त करण्याचे आदेश अतिक्रमण विभागाला देण्यात आले असून परिसरातील गटारी मोकळ्या करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले.

यावेळी स्थानिक नगरसेवक दीपक सूर्यवंशी, ॲड. शुचिता हाडा, अर्शीनबानो खाटीक यांच्यासह शहर अभियंता आर. टी. पाटील, आरोग्य विभागाचे प्रमुख समीर बोरोले यांच्यासह आरोग्य विभागातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

बातमी शेअर करा !
Tags: जळगावजळगाव महानगरपालिकाट्रॅफिक गार्डनदीपमाला काळेमहापौर स्वच्छता संकल्प अभियानशाहूनगर
Previous Post

जळगावात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची सुरक्षा वाऱ्यावर !

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावात महापौर दीपमाला काळेंची अचानक पाहणी; स्वच्छता, अतिक्रमणावर कडक कारवाईचे आदेश

October 23, 2026
जळगावात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची सुरक्षा वाऱ्यावर !

जळगावात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची सुरक्षा वाऱ्यावर !

October 23, 2026

कानळदा येथे विद्यार्थ्यांना स्वसंरक्षणाचे धडे

October 23, 2026
खाऊ गल्लीतील स्वच्छता करण्याचे अन् दंडात्मक कारवाईचे निर्देश

खाऊ गल्लीतील स्वच्छता करण्याचे अन् दंडात्मक कारवाईचे निर्देश

October 22, 2026
माऊली नगरातील खून प्रकरणाचा छडा; संशयित आरोपी २४ तासांत जेरबंद

माऊली नगरातील खून प्रकरणाचा छडा; संशयित आरोपी २४ तासांत जेरबंद

October 22, 2026
‘ती आणि मी’ पुस्तकासाठी ज्ञानेश्वर शेंडे यांना ‘वाचन प्रेरणा सन्मान’

‘ती आणि मी’ पुस्तकासाठी ज्ञानेश्वर शेंडे यांना ‘वाचन प्रेरणा सन्मान’

October 22, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif