• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

न्यायासाठी ८०० जणांची धाव! कायदेविषयक शिबिराला राज्यभरातून प्रतिसाद

ॲड. अनिकेत निकम यांच्या नेतृत्वाखाली आयोजित शिबिराला राज्यभरातून प्रतिसाद; कौटुंबिक वाद, जमीन-मालमत्ता, चेक बाउन्स, सायबर गुन्हे यांसह विविध कायदेशीर समस्यांवर तज्ज्ञांचे मोफत मार्गदर्शन

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
August 23, 2026
in जळगाव, Uncategorized, सामाजिक
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव  : सर्वसामान्य नागरिकांना कायदेशीर बाबींचे सोप्या भाषेत आणि मोफत मार्गदर्शन मिळावे या हेतूने ‘न्याय विश्वास फाउंडेशन’तर्फे साईबाबा मंदिर मेहरूण जळगाव येथे आज पार पडलेल्या तिसऱ्या मोफत कायदेविषयक सल्ला व मार्गदर्शन शिबिराला राज्यभरातून तुफान प्रतिसाद मिळाला. ॲड. अनिकेत उज्ज्वल निकम यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या शिबिराचा लाभ घेण्यासाठी जळगाव जिल्ह्यासह महाराष्ट्राच्या विविध भागांतून तब्बल ८०० पेक्षा जास्त नागरिकांनी हजेरी लावली होती.

यापूर्वी पार पडलेल्या दोन शिबिरांमध्ये ६०० हून अधिक नागरिकांनी कायदेशीर सल्ला घेतला होता. जळगावकरांच्या याच विश्वासातून आयोजित करण्यात आलेल्या या तिसऱ्या शिबिराची व्याप्ती यंदा राज्यभर पसरलेली पाहायला मिळाली. जळगाव शहरासह मुंबई, अहिल्यानगर, मालेगाव, शिर्डी, शनिशिंगणापूर, छत्रपती संभाजीनगर, बीड, धुळे, बुलढाणा, सावदा, मुक्ताईनगर, जालना आणि नाशिक अशा विविध शहरांमधून नागरिक आपल्या प्रलंबित कायदेशीर समस्या घेऊन या ठिकाणी उपस्थित झाले होते.मेहरून भागातील साई बाबा मंदिर परिसरात सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत पार पडलेल्या या शिबिर दरम्यान नागरिकांना कायदेशीर प्रश्नांवर तज्ज्ञ वकिलांच्या पॅनेलद्वारे मोफत व सखोल मार्गदर्शन करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने कौटुंबिक वाद, पती-पत्नीमधील तंटे, दिवाणी प्रकरणे, जमीन व मालमत्तेचे वाद, शेतीशी संबंधित तंटे आणि ७/१२ उताऱ्यावरील अडचणी यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. याशिवाय फायनान्स, आर्थिक फसवणूक, प्रॉव्हिडंट फंड, सर्व्हिस मॅटर आणि कलम १३८ खालील चेक बाउंसच्या केसेसवरही नागरिकांना कायदेशीर मार्ग दाखवण्यात आला.

सध्याच्या काळात वाढणाऱ्या पोलीस तक्रारी, एफआयआर, प्रलंबित न्यायालयीन प्रकरणे, फौजदारी गुन्हे आणि ऑनलाईन आर्थिक फसवणुकीसह सायबर गुन्ह्यांशी संबंधित प्रकरणांवर तज्ज्ञांनी नागरिकांना मोलाचा सल्ला दिला. तसेच महिला, बालके आणि ज्येष्ठ नागरिकांचे कायदेशीर अधिकार आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी शासकीय स्तरावर मिळणाऱ्या मोफत कायदेशीर मदतीची सविस्तर माहिती यावेळी देण्यात आली.या शिबिरास राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक प्रमुख मान्यवरांनी उपस्थित राहून आयोजकांच्या उपक्रमाचे कौतुक केले. कार्यक्रमास आमदार राजूमामा भोळे, पणन महासंघाचे अध्यक्ष रोहित निकम, माजी महापौर सदाशिव ढेकळे, माजी महापौर तथा नगरसेविका जयश्री सुनील महाजन, माजी स्थायी समिती सभापती तथा नगरसेवक राजेंद्र घुगे पाटील, माजी नगरसेवक प्रशांत नाईक, परीट समाजाचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश गोविंदा ठाकरे, ज्येष्ठ समाजसेवक उत्तमराव पांडुरंग नेरकर, ज्येष्ठ समाजसेवक नामदेव वसंत वंजारी, मेहरूण ज्येष्ठ नागरिक संघाचे दिलीप पुंडलिक लाडवंजारी, ज्येष्ठ पत्रकार दिलीप तिवारी यांची प्रमुख उपस्थिती होती.

न्याय विश्वास फाउंडेशनचे अध्यक्ष ॲड. अनिकेत निकम यांनी उपक्रमाची भूमिका मांडताना सांगितले की, सर्वसामान्यांना कायद्याची योग्य माहिती मिळून त्यांचा न्यायावर विश्वास अधिक दृढ व्हावा हाच या शिबिराचा मुख्य उद्देश आहे. नागरिकांनी आपल्या मूळ कागदपत्रांसह उपस्थित राहून शंकांचे निरसन करून घेतले. या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थितांनी न्याय विश्वास फाउंडेशनचे आभार मानले

बातमी शेअर करा !
Tags: अनिकेत निकमकायदेविषयक शिबिरजळगावन्याय विश्वास फाउंडेशनमेहरूनमोफत कायदेशीर मार्गदर्शन
Previous Post

महापालिका प्रशासनाची स्वच्छता मोहिम, व्यापाऱ्यांना शिस्त लावण्याचे आवाहन!

Next Post

‘स्वच्छता’ संस्कारांची शाळा ठरली परिवर्तनाची प्रयोगशाळा! आदर्श गुरुकुल राज्यात प्रथम

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
‘स्वच्छता’ संस्कारांची शाळा ठरली परिवर्तनाची प्रयोगशाळा! आदर्श गुरुकुल राज्यात प्रथम

‘स्वच्छता’ संस्कारांची शाळा ठरली परिवर्तनाची प्रयोगशाळा! आदर्श गुरुकुल राज्यात प्रथम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेच्या प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख, तर जिल्हा उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर पाटील यांची निवड

October 14, 2026
रस्ता सुरक्षा ही प्रत्येकाची जबाबदारी ; श्री समर्थ विद्यालयात वाहतुकीच्या नियमांवर दिले विद्यार्थ्यांना धडे!

रस्ता सुरक्षा ही प्रत्येकाची जबाबदारी ; श्री समर्थ विद्यालयात वाहतुकीच्या नियमांवर दिले विद्यार्थ्यांना धडे!

October 14, 2026
बायपास बंदमुळे सात जणांचा बळी; नुकसानभरपाईची जबाबदारी कोणाची?

बायपास बंदमुळे सात जणांचा बळी; नुकसानभरपाईची जबाबदारी कोणाची?

October 13, 2026
नव्या वास्तूत ‘हाऊस ऑफ ज्वेल्स बाय बाफनाज्’ची वर्षपूर्ती!

नव्या वास्तूत ‘हाऊस ऑफ ज्वेल्स बाय बाफनाज्’ची वर्षपूर्ती!

October 12, 2026
जैन इरिगेशनला आयएसएई चा ‘इंडस्ट्री एक्सलन्स अवॉर्ड’

जैन इरिगेशनला आयएसएई चा ‘इंडस्ट्री एक्सलन्स अवॉर्ड’

October 11, 2026
घरफोडीतील ३२ लाखांचा मुद्देमाल महिलेला परत!

घरफोडीतील ३२ लाखांचा मुद्देमाल महिलेला परत!

October 12, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif