• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

महापौरांच्या संकल्पनेखाली महानगरपालिकेचा अभिनव उपक्रम

‘मिशन ग्रीन जळगाव सिटी’ अंतर्गत तब्बल १ लाख वृक्षारोपणाचा धडाका !

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
August 5, 2026
in जळगाव, महापालिका
महापौरांच्या संकल्पनेखाली महानगरपालिकेचा अभिनव उपक्रम
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हरित महाराष्ट्र मिशन अंतर्गत जळगाव शहर महानगरपालिका प्रशासनाने एक अत्यंत महत्त्वपूर्ण व भव्य पाऊल उचलले आहे. ‘मिशन ग्रीन जळगाव सिटी’ या विशेष मोहिमेअंतर्गत शहरात तब्बल १ लाख वृक्षारोपण करण्याचे भव्य नियोजन करण्यात आले आहे. सोमवारी दि. १० रोजी राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीशभाऊ महाजन, पालकमंत्री गुलाबभाऊ पाटील, खा. स्मिताताई वाघ, आ. राजूमामा भोळे यांच्या उपस्थितीत मोहिमेला सुरुवात होणार आहे.

 

जळगाव शहराला हिरवाईची शाल पांघरण्यासाठी व जळगावला प्रदूषणमुक्त आणि नयनरम्य बनवण्यासाठी ही मोहीम एक लोकचळवळ ठरणार आहे.

असे असेल वृक्षारोपणाचे नियोजन

रस्त्यांचे सुशोभीकरण : शहरातील मुख्य रस्ते, गल्लीबोळ आणि महामार्गाच्या दोन्ही दुतर्फा (डिव्हायडर व बाजूला) मोठ्या प्रमाणावर सावली देणाऱ्या झाडांची लागवड केली जाईल.

ओपन स्पेसचा वापर : महापालिकेच्या मालकीच्या सर्व मोकळ्या जागा आणि सार्वजनिक भूखंडांवर हिरवाई फुलवली जाणार आहे.

हेमू कलानी उद्यानात ‘मियावाकी जंगल’ : जळगाव शहरातील प्रसिद्ध हेमू कलानी उद्यानात जपानी तंत्रज्ञानावर आधारित *’मियावाकी पद्धती’*ने अवघ्या काही काळात घनदाट जंगल उभारले जाईल. येथे तब्बल १५,००० रोपांची विशेष लागवड केली जाणार आहे.

केवळ लागवड नाही, तर संगोपनाचीही पूर्ण जबाबदारी!

झाडे लावून ती जगवणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. यासाठी महापालिका प्रशासनाने झाडांच्या नियमित पाण्यासह, ट्री-गार्ड (संरक्षक जाळ्या) आणि देखभालीची सक्षम यंत्रणा उभारली आहे. स्थानिक नागरिकांनीही आपापल्या भागातील झाडांचे पालकत्व घ्यावे, असे आवाहन महापौर दीपमाला काळे, आयुक्त आदित्य जीवने यांनी केले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हरित महाराष्ट्र मिशन अंतर्गत महापौर दीपमाला काळे यांच्या संकल्पनेतून महानगरपालिका, सामाजिक संस्था व नागरिकांच्या सहयोगाने साकारलेल्या या हरित मोहिमेत केवळ प्रशासनच नाही, तर शहरातील विविध स्वयंसेवी संस्था, सामाजिक संघटना, पर्यावरणप्रेमी आणि नागरिक मोठ्या संख्येने एकत्र येणार आहेत. सोमवारी दि. १० रोजी मान्यवरांच्या हस्ते मोहिमेला सुरुवात होणार आहे.

“जळगावचे तापमान आणि वाढते प्रदूषण लक्षात घेता, शहराला ‘ग्रीन कॉरिडॉर’ बनवणे ही काळाची गरज आहे. या १ लाख वृक्षारोपणाच्या मोहिमेत प्रत्येक जळगावकराने किमान एक झाड लावून ते जगवण्याचा संकल्प करावा.चला, आपण सर्वजण मिळून या ‘मिशन ग्रीन जळगाव’मध्ये सहभागी होऊया आणि आपल्या जळगावला अधिक सुंदर, हिरवेगार नि समृद्ध बनवूया!”

                                 -दीपमाला काळे (महापौर, जळगाव)

बातमी शेअर करा !
Tags: गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगगोदावरी फाउंडेशनजळगावजागतिक स्तनपान सप्ताहमातृ आरोग्यस्तनपान
Previous Post

कर्तत्वनिष्ठ अधिकारी कर्मचारी हेच महसूल विभागाची खरी ताकद

Next Post

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महाराष्ट्रात भाजप रुजविणाऱ्यांमध्ये प्रमोद महाजन, एकनाथ खडसे यांचे योगदान महत्त्वाचे – शरद पवार

महाराष्ट्रात भाजप रुजविणाऱ्यांमध्ये प्रमोद महाजन, एकनाथ खडसे यांचे योगदान महत्त्वाचे – शरद पवार

August 30, 2026
खाऊ गल्लीतील हॉकर्सच्या प्रश्नांवर सकारात्मक चर्चा; मनपा प्रशासनाकडून तोडगा काढण्याचे आश्वासन

खाऊ गल्लीतील हॉकर्सच्या प्रश्नांवर सकारात्मक चर्चा; मनपा प्रशासनाकडून तोडगा काढण्याचे आश्वासन

August 30, 2026
शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

August 30, 2026
रुपेश पाटील यांच्या पालकांच्या हस्ते ध्वजारोहण; कुटुंबीयांना पाच लाखांचा विमा धनादेश

रुपेश पाटील यांच्या पालकांच्या हस्ते ध्वजारोहण; कुटुंबीयांना पाच लाखांचा विमा धनादेश

August 28, 2026
टाकरखेडा येथील कुटुंबातील चौघांची रेल्वे खाली आत्महत्या

टाकरखेडा येथील कुटुंबातील चौघांची रेल्वे खाली आत्महत्या

August 27, 2026
धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई!

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई!

August 27, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif