• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव ग्रामीण

इम्पिरियल इंटरनॅशनल स्कूलमध्ये राष्ट्रीय डॉक्टर दिन उत्साहात साजरा

डॉक्टरांचा सन्मान, वृक्षारोपण आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; समाजसेवेचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवला

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
July 6, 2026
in जळगाव ग्रामीण, Uncategorized, शैक्षणिक
इम्पिरियल इंटरनॅशनल स्कूलमध्ये राष्ट्रीय डॉक्टर दिन उत्साहात साजरा
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

पाळधी: इम्पिरियल इंटरनॅशनल स्कूल, पाळधी येथे १ जुलै रोजी राष्ट्रीय डॉक्टर दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. समाजातील डॉक्टरांचे अनमोल योगदान अधोरेखित करणे आणि त्यांच्या निःस्वार्थ सेवेसाठी कृतज्ञता व्यक्त करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि प्रास्ताविकाने झाली. यावेळी विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय डॉक्टर दिनाचे महत्त्व, डॉक्टरांची निःस्वार्थ सेवा तसेच आरोग्य क्षेत्रातील त्यांच्या योगदानावर प्रभावी भाषणे सादर करून उपस्थितांची मने जिंकली.

यावेळी शाळेचे चेअरमन इंजी. श्री. नरेश चौधरी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉक्टर हे समाजाचे खरे जीवनरक्षक असून त्यांच्या अथक परिश्रमामुळे लाखो नागरिकांना नवजीवन मिळते, असे सांगितले. प्रत्येकाने डॉक्टरांचा सन्मान राखून त्यांच्या सेवेसाठी सदैव कृतज्ञ राहावे, असा संदेश त्यांनी दिला.

कार्यक्रमाला शहरातील मान्यवर डॉ. योगेश पाटील, डॉ. धनंजय जाधव, डॉ. सुधीर पाटील, डॉ. प्रमोद पाटील आणि डॉ. सुयोग पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली. शाळेचे प्राचार्य आर. एल. माळी यांनी विद्यार्थ्यांना आरोग्य, सेवा आणि सामाजिक जबाबदारी याविषयी अनमोल मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने मान्यवरांच्या हस्ते शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. तसेच शैक्षणिक वर्ष २०२५–२६ मध्ये आपल्या वर्गात प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी संचालक गजानन पाटील, प्राचार्या शारदा पाटील आणि मनीषा पाटील यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी डॉक्टरांप्रती आदर व्यक्त करत त्यांच्या उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि निरंतर सेवाकार्यासाठी शुभेच्छा दिल्या. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये डॉक्टरांविषयी आदर, कृतज्ञता आणि समाजसेवेची भावना अधिक दृढ झाल्याचे दिसून आले.

बातमी शेअर करा !
Tags: आरोग्य सेवाइम्पिरियल इंटरनॅशनल स्कूलडॉक्टर दिन २०२५डॉक्टरांचा सन्मानपाळधीराष्ट्रीय डॉक्टर दिन
Previous Post

डॉ.मिलिंद जोशी यांची ’सोसायटी ऑफ पेडियाट्रिक युरोलॉजी’च्या चेअरमनपदी निवड!

Next Post

भाजपाचा कार्यकर्ता हा 365 दिवस कार्य करणारा – आ. सुरेश भोळे

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
भाजपाचा कार्यकर्ता हा 365 दिवस कार्य करणारा – आ. सुरेश भोळे

भाजपाचा कार्यकर्ता हा 365 दिवस कार्य करणारा – आ. सुरेश भोळे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

युवतींच्या दहीहंडीचा आज शिवतीर्थावर थरार

September 4, 2026
प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

September 3, 2026
जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

September 3, 2026
भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

September 3, 2026

राखीचा धागा मायेचा; ‘विशेष’ भगिनींना GPS परिवाराने दिला आपुलकीचा आधार

September 2, 2026
पाळधी बायपास अपघातप्रकरणी ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा!

पाळधी बायपास अपघातप्रकरणी ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा!

September 1, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif