• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

जळगाव कॅरम लीग स्पर्धेला सुरवात..

मकरा चॅलेंजर्स, आप्पासाहेब लिजेंड्स, साईनाथ टायटन्स, लीजर स्पोर्ट्स स्टार्स संघांची विजयी सुरवात

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
June 28, 2026
in जळगाव, क्रीडा
जळगाव कॅरम लीग स्पर्धेला सुरवात..
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव  –जळगाव जिल्हा कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने तसेच जैन स्पोर्ट्स अकॅडमी चे विद्यमाने आयोजित व जैन इरिगेशन सिस्टम्स लिमिटेड पुरस्कृत जळगाव कॅरम लीग- पर्व २ ही स्पर्धची शानदार सुरवात झाली.पहिल्या सामन्यांमध्ये मकरा चॅलेंजर्स, आप्पासाहेब लिजेंड्स, साईनाथ टायटन्स, लीजर स्पोर्टस स्टार्स संघांनी विजयी सुरवात केली आहे. आजपासून सुरू झालेल्या स्पर्धा २८ जून पर्यंत कांताई सभागृह येथे होईल. या स्पर्धेचे उद्घाटन आमदार सुरेश भोळे यांच्या प्रमुख उपस्थितीत यूसुफभाई मकरा, अरविंद देशपांडे, अॅड. रविंद्र कुलकर्णी, मंजूर खान, रंगनाथ पाटील, आरीश शेख, आमीर शेख, रेहान सालार, आसीफ खान,अशफाक शेख यांच्यासह आयोजन समितीचे प्रमुख सय्यद मोहसीन, हमिद भुसावली, रविंद्र धर्माधिकारी, हबीब शेख, फजल मोहम्मद, फिरोज खान, शेख अजीज, अताउल्लाह खान यांची उपस्थीती होती.

 

आठ संघामध्ये होणाऱ्या स्पर्धेत जळगाव जिल्ह्यातील उत्कृष्ट असे ४८ व महाराष्ट्र राज्यातील इतर जिल्ह्यांमधील जैन इरिगेशनचे व महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व केलेले ८ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विजेते खेळाडूंनी सहभाग घेतला. ही स्पर्धा प्रथम लीग पद्धतीने व नंतर बाद पद्धतीने खेळविली जात आहे. स्पर्धेत पहिल्या चार क्रमांकाच्या संघांना रोख पारितोषिके आणि चषक अशा एकूण ६५ हजारांचे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येईल. त्याचप्रमाणे स्पर्धेतील सहभागी सर्व खेळाडूंना मेडल सुद्धा दिली जाईल. स्पर्धा सिस्का कंपनीच्या बुलेट शॉट ह्या कॅरम बोर्ड व सोंगट्यांसह खेळविण्यात येत आहे. गणेश लोडते यांनी सुत्रसंचालन केले. जळगाव जिल्ह्यातील सर्व कॅरम व क्रीडाप्रेमींनी सदर स्पर्धेत येऊन कॅरमचा आनंद घ्यावा, असे आवाहन जळगाव जिल्हा कॅरम असोसिएशनचे अध्यक्ष राधेश्याम कोगटा, सरकार्यवाह नितीन बरडे यांच्यासह आयोजकांनी केले आहे.

 

पहिल्या फेरीमध्ये आप्पासाहेब लिजेंडस संघाने सालार किंग्ज संघाचा २-१, मकरा चॅलेंजर्स संघाने अरिश लॉयन्स संघाचा ३-० ने, साईनाथ टायटन्स संघाने स्पोर्ट हाऊस स्ट्रायकर संघाच २-१ ने आणि लिजर स्पोर्ट स्टार्स संघाने श्रीउत्तम हर्बल रायडर्स संघाचा ३-० ने पराभव करुन विजयी सुरवात केली.

बातमी शेअर करा !
Tags: कॅरम स्पर्धाक्रीडाजळगावजळगाव कॅरम लीगजैन स्पोर्ट्स अकॅडमीमहाराष्ट्र कॅरम
Previous Post

जळगावला स्वतंत्र “उत्तर महाराष्ट्र कृषी विद्यापीठ” स्थापन करा!

Next Post

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई - पालकमंत्री गुलाबराव पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

युवतींच्या दहीहंडीचा आज शिवतीर्थावर थरार

September 4, 2026
प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

September 3, 2026
जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

September 3, 2026
भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

September 3, 2026

राखीचा धागा मायेचा; ‘विशेष’ भगिनींना GPS परिवाराने दिला आपुलकीचा आधार

September 2, 2026
पाळधी बायपास अपघातप्रकरणी ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा!

पाळधी बायपास अपघातप्रकरणी ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा!

September 1, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif