• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home आंदोलन

शिरसोली नेहरे तलावाचा ठेका रद्द करून स्थानिक संस्थेला न्याय द्या; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

शिरसोली नेहरे तलावाचा ठेका परगावातील संस्थेला दिल्याचा आरोप; स्थानिक मच्छिमार संस्थेची जिल्हाधिकाऱ्यांकडे तातडीची धाव

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
May 22, 2026
in आंदोलन, जळगाव ग्रामीण
शिरसोली नेहरे तलावाचा ठेका रद्द करून स्थानिक संस्थेला न्याय द्या; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव तालुक्यातील शिरसोली नेहरे (३५ हेक्टर) या तलावाच्या कार्यक्षेत्रात येणारे पाझर तलावाचा ठेका नियमबाह्य पद्धतीने परगावातील संस्थेला दिल्याचा आरोप करत, हा ठेका तात्काळ रद्द करण्याची मागणी ग्रामीण पाणीपुरवठा सिंचन मच्छिमार सहकारी संस्था मर्यादित, शिरसोली यांनी केली आहे. संस्थेच्या वतीने आज जळगावचे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांना यासंदर्भात अत्यंत तातडीचे निवेदन देण्यात आले.

नेमके प्रकरण काय?

शिरसोली येथील ग्रामीण पाणीपुरवठा सिंचन मच्छिमार सहकारी संस्था ही २००३ पासून नोंदणीकृत असून, शिरसोली नेहरे तलाव हे तिचे हक्काचे कार्यक्षेत्र आहे. निवेदनात नमूद केल्यानुसार, कोरोना कालावधीत निर्माण झालेल्या आर्थिक अडचणींमुळे ही संस्था ठेक्याची रक्कम वेळेत भरू शकली नव्हती. मात्र, शासनाचे ‘नरमाईचे धोरण’ असतानाही संबंधित विभागाने या संस्थेला २८/१२/२०२१ ते २७/१२/२०२७ या सहा वर्षांच्या कालावधीसाठी बेकायदेशीरपणे काळ्या यादीत (Blacklist) टाकले.

बाहेरील संस्थेला ठेका दिल्याचा आरोप

संस्थेचे सचिव आनंदा दगडू भोई यांनी निवेदनात म्हटले आहे की, स्थानिक संस्थेवर अन्याय करून या तलावाचा ठेका जळगाव तालुक्याबाहेरील भुसावळ येथील ‘साळशिंगी मच्छिमार सहकारी उत्पादक सोसायटी’ला देण्यात आला आहे. प्रत्यक्षात ही संस्था तेथे कार्यरत नसून, यामुळे स्थानिक आदिवासी, भिल्ल आणि कष्टकरी मजुरांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

निवेदनातील प्रमुख मागण्या :

• शिरसोली संस्थेला बेकायदेशीरपणे टाकलेले ‘काळ्या यादी’तून १५ दिवसांत बाहेर काढावे.

• बाहेरील संस्थेला दिलेला नियमबाह्य ठेका तात्काळ रद्द करावा.

• तलावाचा ताबा मूळ स्थानिक संस्थेला द्यावा; संस्था नियमानुसार ठेक्याची सर्व रक्कम भरण्यास तयार आहे.

• या प्रकरणी १५ दिवसांत लेखी उत्तर न मिळाल्यास कायदेशीर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.

मंत्र्यांसह विविध विभागाला दिले निवेदन

ग्रामीण पाणीपुरवठा सिंचन मच्छिमार सहकारी संस्था मर्यादित, शिरसोली यांच्यातर्फे आज जळगाव जिल्हाधिकारी रोहन घुगे यांना निवेदन देण्यात आले आहे. याप्रसंगी मच्छिमार संघटनेचे बाळासाहेब सैंदाने, आनंदा भोई, भिकन भोई, लक्ष्मण भोई, शांताराम भिल, आशाबाई बारी, विनोद भोई, मनोज परदेशी, पिंटू भोई, सय्यदा खाटीक, आनंदा कोळी, प्रेमचंद यशवंत भिल, छगन भोई, जगन भिल, दगडू खलसे, संजय भिल, बाबलाल यशवंत भिल, बाबलाल भिल, संतोष भोई, दामू भोई, शकुंतला भिल, भगवान कोळी, भरत परदेशी, शत्रुघ्न सपकाळे, वना भोई, चतर भोई आदींसह इतर सदस्य उपस्थित होते. दरम्यान, हे निवेदन राज्याचे पदुम विभाग मंत्री नितेश राणे (पदुम विभाग), मुख्य सचिव, उपसचिव, मुख्याधिकारी जळगाव जिल्हा परिषद आणि मत्स्यव्यवसाय सहाय्यक आयुक्त यांच्यासह इतर संबंधित विभागांनाही माहितीसाठी पाठवण्यात आले आहे.

बातमी शेअर करा !
Tags: जळगाव बातम्याजिल्हाधिकारी जळगावतलाव ठेका वादमच्छिमार सहकारी संस्थारोहन घुगेशिरसोली नेहरे तलाव
Previous Post

‘नो व्हेईकल डे’ निमित्त महापौर दीपमाला काळे सायकलवरून कार्यालयात!

Next Post

आईच्या कुशीत पुन्हा उमलले दोन जीव!

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
आईच्या कुशीत पुन्हा उमलले दोन जीव!

आईच्या कुशीत पुन्हा उमलले दोन जीव!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

July 22, 2026
४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

July 21, 2026
जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

July 21, 2026

केंद्रीय राज्य क्रीडा मंत्र्यांच्या जिल्ह्यात खेळाडूंवर अन्याय 15 ऑगस्ट रोजी आत्मदहनाचा इशारा

July 20, 2026
हातात माती… मनात निसर्ग!            सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

July 20, 2026
ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे  अरविंद लाठी कालवश!

ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे अरविंद लाठी कालवश!

July 19, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif