• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home क्राईम

दारुड्या पतीचा त्रास नाही झाला सहन; म्हणून पत्नीने गळा आवळून केला त्याचा खून!

शहरातील के सी पार्क येथील घटना शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल.!!

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
May 7, 2026
in क्राईम, जळगाव
दारुड्या पतीचा त्रास नाही झाला सहन; म्हणून पत्नीने गळा आवळून केला त्याचा खून!
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरातील कानळदा रोड परिसरात कौटुंबिक वादातून एका महिलेने पतीचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दारूच्या नशेत वारंवार त्रास देणाऱ्या पतीला संतापाच्या भरात पत्नीने संपविल्याची कबुली पोलिस चौकशीत समोर आली. या प्रकरणामुळे केसी पार्क परिसरात खळबळ उडाली आहे.

 

मृत व्यक्तीचे नाव भरत नामदेव पाटील (वय ५८) असे असून ते पत्नी आणि दोन मुलांसह केसी पार्क भागात वास्तव्यास होते. पत्नी मनिषा पाटील या खासगी कापड दुकानात काम करत होत्या, तर दोन्ही मुले एमआयडीसी परिसरातील कंपनीत नोकरीला आहेत. भरत पाटील यांना दारूचे व्यसन असल्याने घरातील वातावरण नेहमी तणावपूर्ण असायचे, अशी माहिती परिसरातून समोर आली आहे.

मंगळवारी रात्री मनिषा पाटील या कामावरून घरी परतल्यानंतर भरत पाटील दारूच्या नशेत असल्याने दोघांमध्ये जोरदार वाद झाला. वाद विकोपाला गेल्यानंतर संतापाच्या भरात मनिषा पाटील यांनी दोरीच्या सहाय्याने पतीचा गळा आवळल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. गळा आवळल्यानंतर भरत पाटील हे खाली कोसळल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.

घटनेनंतर परिसरातील नागरिकांच्या मदतीने भरत पाटील यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणीदरम्यान त्यांच्या मानेवर संशयास्पद खुणा आढळल्याने पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यानंतर शवविच्छेदन अहवालात गळा आवळल्याने श्वास गुदमरून मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.

प्राथमिक नोंद अकस्मात मृत्यूची करण्यात आली होती. मात्र वैद्यकीय अहवाल आणि चौकशीनंतर शहर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी संशयित पत्नी मनिषा पाटील यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.

या घटनेचा पुढील तपास शहर पोलीस करत आहेत.

बातमी शेअर करा !
Tags: आरोपीक्राईमगुन्हातपासपतीचा खूनपत्नी गुन्हेगारपोलीस स्टेशन
Previous Post

अ‍ॅन्टी रॅगींग कमिटीचा चक्क मेसमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद !

Next Post

आंब्यांच्या ‘मॅंगो फिएस्टा’ प्रदर्शनाचे अशोक जैन यांच्या हस्ते उद्घाटन!

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
आंब्यांच्या ‘मॅंगो फिएस्टा’ प्रदर्शनाचे अशोक जैन यांच्या हस्ते उद्घाटन!

आंब्यांच्या ‘मॅंगो फिएस्टा’ प्रदर्शनाचे अशोक जैन यांच्या हस्ते उद्घाटन!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

July 22, 2026
४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

July 21, 2026
जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

July 21, 2026

केंद्रीय राज्य क्रीडा मंत्र्यांच्या जिल्ह्यात खेळाडूंवर अन्याय 15 ऑगस्ट रोजी आत्मदहनाचा इशारा

July 20, 2026
हातात माती… मनात निसर्ग!            सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

July 20, 2026
ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे  अरविंद लाठी कालवश!

ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे अरविंद लाठी कालवश!

July 19, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif