• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

जळगावात मनपा भूखंडावर अतिक्रमणाचा डाव ; रेड क्रॉस सोसायटीविरोधात तक्रार

रात्रीतून कंपाउंड भिंत तोडून जागेचा वापर केल्याचा आरोप; ॲड. पियुष पाटील यांची महापौरांसह प्रशासनाकडे लेखी तक्रार

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
April 24, 2026
in जळगाव, ब्रेकिंग, विशेष बातमी
जळगावात मनपा भूखंडावर अतिक्रमणाचा डाव ; रेड क्रॉस सोसायटीविरोधात तक्रार
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव (प्रतिनिधी) – शहरातील मनपा मालकीच्या खुल्या भूखंडावर अनधिकृत हस्तक्षेप झाल्याचा आरोप समोर आला असून, या प्रकरणी इंडियन रेड क्रॉस सोसायटीविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. सामाजिक कार्यकर्ते ॲड. पियुष नरेंद्र पाटील यांनी महापौर, उपमहापौर, सभापती, आयुक्त आणि उपायुक्त यांच्याकडे लेखी निवेदन देत कारवाईची मागणी केली आहे.

तक्रारीनुसार, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि इंडियन रेड क्रॉस सोसायटीच्या शेजारी मनपाचा एक मोठा आरक्षित खुला भूखंड आहे. महाविद्यालयाच्या बांधकामादरम्यान संबंधित जागेत मलबा टाकण्यासाठी काही प्रमाणात कंपाउंड भिंत तोडण्यात आली होती. मात्र बांधकाम पूर्ण होत आले तरी भिंत पुन्हा उभारण्यात आलेली नव्हती.

या परिस्थितीचा फायदा घेत इंडियन रेड क्रॉस सोसायटीकडून रात्रीतून सुमारे 15 ते 20 फूट कंपाउंड भिंत पाडून जेसीबीच्या सहाय्याने जागेचे सपाटीकरण करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर या ठिकाणी संस्थेची वाहने पार्किंगसाठी ठेवण्यात आल्याचेही नमूद करण्यात आले आहे.

यापूर्वी देखील संबंधित जागेवर संस्थेचे गेट उभारण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप असून, सामाजिक कार्यकर्त्यांच्या आक्षेपामुळे तो प्रयत्न थांबवण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

ॲड. पाटील यांनी प्रश्न उपस्थित करत म्हटले आहे की, कोट्यवधींच्या ठेवी असलेल्या मोठ्या संस्थेला मनपा मालकीच्या जागेची गरज का भासावी? तसेच या प्रकरणाचा सखोल तपास करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

दरम्यान, या प्रकरणामुळे शहरात चर्चा रंगली असून, मनपा प्रशासन काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बातमी शेअर करा !
Tags: अतिक्रमणकारवाईजळगावतक्रारभूखंडमहानगरपालिकारेड क्रॉस सोसायटी
Previous Post

जळगावच्या औद्योगिक विस्तारासाठी आ. राजूमामा भोळे सरसावले

Next Post

२४२ धावांचा डोंगर सर करत अमळनेर सुहांस जायंटसची जळगाव क्रिकेट लिगच्या फायनलमध्ये धडक

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
२४२ धावांचा डोंगर सर करत अमळनेर सुहांस जायंटसची जळगाव क्रिकेट लिगच्या फायनलमध्ये धडक

२४२ धावांचा डोंगर सर करत अमळनेर सुहांस जायंटसची जळगाव क्रिकेट लिगच्या फायनलमध्ये धडक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावात गिरीश महाजनांची शिष्टाई फेल शिंदेसेनेची बंडखोरी ; चौरंगी लढत!

जळगावात गिरीश महाजनांची शिष्टाई फेल शिंदेसेनेची बंडखोरी ; चौरंगी लढत!

June 4, 2026

जैन इरिगेशनकडून जगातील सर्वात मोठ्या बायोचार रिअ‍ॅक्टर्सचे उद्घाटन

June 4, 2026
एआयच्या प्रभावी वापराने कृषी क्षेत्रात परिवर्तन – अनिल जैन

एआयच्या प्रभावी वापराने कृषी क्षेत्रात परिवर्तन – अनिल जैन

June 2, 2026
व्हेंटीलेटरवर असलेल्या तीन महिन्यांच्या शिशुचे वाचले प्राण!

व्हेंटीलेटरवर असलेल्या तीन महिन्यांच्या शिशुचे वाचले प्राण!

June 2, 2026
“माणसातला देव माणूस म्हणजे गुलाबराव पाटील; समाजसेवेचा वारसा जपणे हीच खरी संतसेवा” – साध्वी सोनाली दीदी करपे 

“माणसातला देव माणूस म्हणजे गुलाबराव पाटील; समाजसेवेचा वारसा जपणे हीच खरी संतसेवा” – साध्वी सोनाली दीदी करपे 

June 2, 2026
विधान परिषदेसाठी भाजपकडून नंदू महाजन यांना उमेदवारी निश्चित!

विधान परिषदेसाठी भाजपकडून नंदू महाजन यांना उमेदवारी निश्चित!

May 31, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif