• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home Uncategorized

अटलांटा कंपनीविरुद्ध फसवणुकीची तक्रार; 41 कोटींचा अपहार केल्याचा आरोप!

जळगाव महापालिकेच्या कंत्राटात अनियमितता; नगरसेवकांकडून संचालकांविरुद्ध फौजदारी कारवाईची मागणी

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
April 22, 2026
in Uncategorized, क्राईम
अटलांटा कंपनीविरुद्ध फसवणुकीची तक्रार; 41 कोटींचा अपहार केल्याचा आरोप!
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव महानगरपालिकेच्या प्रभाग क्र. १५ मधील नगरसेवक अरविंद देशमुख यांनी अटलांटा कन्स्ट्रक्शन कंपनी (इंडिया) लि.च्या संचालकांविरुद्ध गंभीर फौजदारी तक्रार दाखल केली आहे. ही तक्रार जळगाव शहर पोलीस ठाण्यात देण्यात आली असून, कंपनीवर फसवणूक, विश्वासघात आणि आर्थिक अपहाराचे आरोप करण्यात आले आहेत.

तक्रारीनुसार, Atlanta Construction Company (India) Ltd. यांना सन १९९७ मध्ये जळगाव नगर परिषदेकडून रस्ते डांबरीकरणाचे कंत्राट देण्यात आले होते. मात्र, कंत्राट मिळविताना कंपनीने भ्रामक माहिती देत काम पूर्ण करण्याची क्षमता नसतानाही कंत्राट मिळवल्याचा आरोप करण्यात आला आहे.

कंपनीने कंत्राटानुसार काम वेळेत पूर्ण केले नाही, तसेच वारंवार मुदतवाढ घेऊनही प्रकल्प अपूर्ण ठेवला. याशिवाय कंपनीला देण्यात आलेल्या सुमारे १०.३५ कोटी रुपयांच्या मोबिलायझेशन अॅडव्हान्सचा गैरवापर केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. आवश्यक बँक गॅरंटी न देणे हेही गंभीर अनियमिततेचे लक्षण असल्याचे तक्रारीत नमूद आहे.

तसेच, कंपनीकडे महापालिकेची सुमारे ४.७१ कोटी रुपयांची थकीत रक्कम असून, त्यावर गेल्या २४ वर्षांपासून चक्रवाढ व्याज लावल्यास एकूण नुकसान सुमारे ४१.३४ कोटी रुपयांपर्यंत पोहोचल्याचा दावा करण्यात आला आहे. ही रक्कम जाणीवपूर्वक न भरता कंपनीने महापालिका व जनतेची आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप आहे.

या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३१८(४), ३१६(२) आणि ६१(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच संबंधितांवर कठोर कारवाई करून नुकसानभरपाई वसूल करावी आणि आवश्यक असल्यास मालमत्ता जप्त करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

या तक्रारीमुळे जळगावमध्ये मोठी खळबळ उडाली असून, पोलीस प्रशासन पुढील कारवाई काय करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बातमी शेअर करा !
Tags: अटलांटा कन्स्ट्रक्शन कंपनीआर्थिक अपहारकंत्राटजळगावफसवणूक प्रकरणमहानगरपालिका
Previous Post

पिंप्राळ्यात सव्वा लाखांचा गुटखा जप्त; एक जण अटकेत

Next Post

मेहरूण स्मशानभूमीचा चेहरामोहरा बदलणार; महापौरांनी दिली प्रत्यक्ष भेट

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post

मेहरूण स्मशानभूमीचा चेहरामोहरा बदलणार; महापौरांनी दिली प्रत्यक्ष भेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मनभावन कॅराओके क्लबचे उत्साहात उद्घाटन!

मनभावन कॅराओके क्लबचे उत्साहात उद्घाटन!

June 6, 2026
हातात पुस्तकांऐवजी आली मद्याची बाटली

हातात पुस्तकांऐवजी आली मद्याची बाटली

June 6, 2026
संकटमोचकांच्या गडाला हादरा! गिरीश महाजन यांच्या कट्टर समर्थकांचा शिंदे गटात प्रवेश!

संकटमोचकांच्या गडाला हादरा! गिरीश महाजन यांच्या कट्टर समर्थकांचा शिंदे गटात प्रवेश!

June 6, 2026
गोदावरी अभियांत्रिकीचे प्राध्यापक डॉ. देवेंद्र मराठे यांना पीएच.डी. पदवी प्राप्त

गोदावरी अभियांत्रिकीचे प्राध्यापक डॉ. देवेंद्र मराठे यांना पीएच.डी. पदवी प्राप्त

June 6, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
मुलुख मैदान तोफ ते विकासपुरुष “पालकमंत्री गुलाबरावजी पाटील”

मुलुख मैदान तोफ ते विकासपुरुष “पालकमंत्री गुलाबरावजी पाटील”

June 5, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif