• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home क्रिकेट स्पर्धा

JCL सामन्यात जामनेर सातपुडा हिरोज, जळगाव कोगटा किंग्स, अमळनेर सुहांस जायंट्स विजयी

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
April 21, 2026
in क्रिकेट स्पर्धा, जळगाव
JCL सामन्यात जामनेर सातपुडा हिरोज, जळगाव कोगटा किंग्स, अमळनेर सुहांस जायंट्स विजयी
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव दि.21 (प्रतिनिधी):जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स प्रायोजित व अलरीक इलेक्ट्रीकल्स सहप्रायोजकत्वाखाली जळगाव क्रिकेट लिग लिग-२०२६, JCL T-20 चा रोमांच शिगेला पोहचला आहे. मंगळवारी झालेल्या पहिल्या दोन सामन्यांत जळगाव कोगटा किंग्स आणि जामनेर सातपुडा हिरोज हा संघ विजयी झाला. त्यापूर्वी सोमवारी रात्री झालेल्या सामन्यात अमळनेर सुहांस जायंट्स संघाने विजय मिळवला होता. उपांत्यफेरी गाठवण्यासाठी आता जेसीएलच्या सर्व संघामध्ये चुरस निर्माण झाली आहे.

मंगळवारी दुपारी जामनेर सातपुडा हिरोज आणि अमळनेर सुहांस जायंट्स या संघामध्ये लढत झाली. जामनेर सातपुडा हिरोज संघाने नाणेफेक जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. संघाचा हा निर्णय गोलदांजांनी यशस्वी ठरवला. अमळनेर संघाचा पहिला फलंदाज केवळ २ धावांवर बाद झाला. त्यानंतर ठराविक क्रमाने फलंदाज बाद होत गेले. त्यामुळे १०२ धावांवर सात फलंदाज तंबूत परतले होते. परंतु शुभम शर्माने एक बाजू लावून धरली होती. त्याने ४७ चेंडूत धुवांधार ६० धावा केल्या. रोहित भोईने १५ चेंडूत ३२ तर यशवंत शिंदे याने १६ चेंडूत २२ धावा करत संघाची धावसंख्या १५० च्या पुढे नेली. अमळनेर संघाचे सर्व फलंदाज १९.५ षटकांत १५२ धावांवर बाद झाले.
विजयासाठी १५३ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या जामनेर संघाची सुरूवात जोरदार झाली. केवळ ५.२ षटकांत एक गडी गमावत ५१ धावा केल्या. सामनावीर ठरलेल्या प्रद्युम महाजन याने अमळनेरच्या गोलंदाजांना फोडून काढले. त्याने ४२ चेंडूत ६९ धावांची धुवांधार खेळी केली. त्यामुळे जामनेरचा विजयाचा पाया पक्का झाला. ललित पाटील १७ धावा केल्या. रवींद्र आणि क्रिषी यांनी नाबाद पार्टनशीप करत संघाला विजय मिळवून दिला. रवीद्र याने २९ चेंडूत ३१ तर क्रिषी याने केवळ १६ चेंडूत ३० धावा केल्या. जामनेरने केवळ १७.४ षटकांत विजयी लक्ष्य गाठत ८ गडी राखून दणदणीत विजय मिळवला. अमळनेरच्या शुभम शर्मा आणि सतीश चतुर्वेदी यांनी एक-एक फलंदाजाला बाद केले.

जळगाव कोगटा किंगचा पुन्हा एक विजय

मंगळवारी पहिला सामना जळगाव कोगटा किंग विरुद्ध रावेर रॉयल्स यांच्यात झाला. या सामन्याची नाणेफेक जेसीएल समिती सदस्य प्रशांत वीरकर यांच्या हस्ते झाली. या सामन्यात रावेर रॉयल्सची सुरुवात निराशाजनक झाली. यश नहर (9), तौसीफ मिर्झा (0) आणि संदेश (9) लवकर बाद झाल्याने संघावर दबाव आला. त्यानंतर मोहम्मद आणि आदित्यही बाद झाल्यामुळे 67 धावांत पाच गडी बाद अशी बिकट अवस्थार रावेर रॉयल्सची झाली होती. मात्र, अशपाक शेख आणि प्रज्वल राजपूत यांनी डाव सावरला. अशपाकने 36 चेंडूत 45 धावा केल्या. तर प्रज्वलने 11 चेंडूत 17 धावा केल्या. त्यामुळे रावेर रॉयलने 20 षटकांत 143 धावांपर्यंत मजल मारली. जळगाव कोकटा किंग्सकडून राज बेलदार, मनिष चव्हाण आणि सागर भावसार यांनी एक-एक गडी बाद केला. कर्णधार जगदीश झोपे याने प्रभावी गोलंदाजी करत 15 धावा देत 2 बळी घेतले. बिपिन चावरे यांनीही 2 गडी बाद केले. 144 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या जळगाव कोगटा किंग्स संघाने 15.1 षटकांत 3 गडी बाद करत 146 धावा केल्या. ओम भोसले याने 46 चेंडूत 64 धावांची नाबाद खेळी केली. बिपिन चांगरे याने 25 चेंडूत 52 धावा करत संघाचा रनरेट वेगाने वाढवला. तोच सामनावीर ठरला.

अमळनेरचा रावेरवर दणदणीत विजय

अमळनेर सुहांस जायंट्स आणि रावेर रॉयल्स यांच्यात २० एप्रिल रोजी रात्री सामना झाला. या सामन्यात अमळनेर संघाने 20 षटकांत 7 बाद 201 धावांचा डोंगर उभारला. रणजीत निकमने 55, मानव टीब्रेवाला 54 आणि ऋषी यादवने 37 धावांची उपयुक्त खेळी करत संघाला भक्कम सुरुवात दिली. प्रत्युत्तरात रावेर रॉयल्सचा डाव 20 षटकांत 7 बाद 164 धावांवर थांबला. संदेश सुरवाडेने 47 आणि तुषार चोरडियाने 46 धावांची झुंज दिली. गोलंदाजीत मोहंमद सैफने अचूक मारा करत 2 बळी घेतले आणि विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. या सामन्यामध्ये सामनावीराचा पुरस्कार रणजीत निकम याला प्रदान करण्यात आला. त्याने 55 धावा करत एक बळी घेतला.

*आजचे सामने (22 एप्रिल)*
सकाळी ८.३० वाजता: रावेर रॉयल्स x पाचोरा एसकेटी योद्धाज.
दुपारी ३ वाजता : अमळनेर सुहांस जायंट्स xचाळीसगाव एसपीसीसी चॅलेन्जर्स.
सायंकाळी ७.३० वाजता : जळगाव कोगटा किंग x जामनेर सातपुडा हिरोज.

 

 

गुणतालिका

 

 

संघ
सामने
विजयी
पराभूत
गुण

जामनेर सातपुडा हिरोज
4
3
1
6

जळगाव कोगटा किंग
4
3
1
6

अमळनेर सुहांस जायंट्स
3
1
2
2

चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंन्जर्स
2
1
1
2

पाचोरा एसकेटी योद्धाज
2
1
1
2

रावेर रॉयल्स
3
0
3
0

रात्री ८ पर्यंत

बातमी शेअर करा !
Tags: Jalgaon Cricket LeagueJamner Satpuda HeroesJCL T20 2026Raver Royalsजळगाव क्रिकेट लीग
Previous Post

डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात व्हीडीओ एन्डोस्कोपीची अत्याधुनिक सुविधा

Next Post

महाराष्ट्र भाजपची नवी जबाबदारी जाहीर; नाशिकचे लक्ष्मण सावजी, अजित चव्हाण प्रवक्ते, गोविंद बोरसे माध्यम प्रमुखघोषणा

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
महाराष्ट्र भाजपची नवी जबाबदारी जाहीर; नाशिकचे लक्ष्मण सावजी, अजित चव्हाण प्रवक्ते, गोविंद बोरसे माध्यम प्रमुखघोषणा

महाराष्ट्र भाजपची नवी जबाबदारी जाहीर; नाशिकचे लक्ष्मण सावजी, अजित चव्हाण प्रवक्ते, गोविंद बोरसे माध्यम प्रमुखघोषणा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मनभावन कॅराओके क्लबचे उत्साहात उद्घाटन!

मनभावन कॅराओके क्लबचे उत्साहात उद्घाटन!

June 6, 2026
हातात पुस्तकांऐवजी आली मद्याची बाटली

हातात पुस्तकांऐवजी आली मद्याची बाटली

June 6, 2026
संकटमोचकांच्या गडाला हादरा! गिरीश महाजन यांच्या कट्टर समर्थकांचा शिंदे गटात प्रवेश!

संकटमोचकांच्या गडाला हादरा! गिरीश महाजन यांच्या कट्टर समर्थकांचा शिंदे गटात प्रवेश!

June 6, 2026
गोदावरी अभियांत्रिकीचे प्राध्यापक डॉ. देवेंद्र मराठे यांना पीएच.डी. पदवी प्राप्त

गोदावरी अभियांत्रिकीचे प्राध्यापक डॉ. देवेंद्र मराठे यांना पीएच.डी. पदवी प्राप्त

June 6, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
मुलुख मैदान तोफ ते विकासपुरुष “पालकमंत्री गुलाबरावजी पाटील”

मुलुख मैदान तोफ ते विकासपुरुष “पालकमंत्री गुलाबरावजी पाटील”

June 5, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif