• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home शैक्षणिक

समन्वय २०२६चा जल्लोषात समारोप!

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात आठवडाभर रंगले सांस्कृतिक कार्यक्रम; विद्यार्थ्यांच्या कलाविष्कारांनी प्रेक्षक मंत्रमुग्ध

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
April 21, 2026
in शैक्षणिक
समन्वय २०२६चा जल्लोषात समारोप!
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव : येथील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या आग्नेय बॅचतर्फे दि. १२ ते १८ एप्रिल दरम्यान आयोजित ‘समन्वय २०२६’ सप्ताहाचा समारोप उत्साहात संपन्न झाला.या आठवडाभर चाललेल्या उपक्रमात विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कलाविष्कार सादर करून उपस्थितांची मनं जिंकली.दि. १२ एप्रिल रोजी आर्ट गॅलरीच्या उद्घाटनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. दि. १४ एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली. तसेच टीचर डे, प्रोमो आणि डीजे नाईटसारखे विविध कार्यक्रमही पार पडले.समारोप समारंभ प्रसंगी माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, डॉ. वर्षा पाटील, डॉ. वैभव पाटील, अनिल पाटील, किवा पाटील, सारा पाटील, वैद्यकीय संचालक डॉ. एन. एस. आर्विकर, वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. प्रशांत सोळंके, वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रेमचंद पंडित तसेच रजिस्ट्रार प्रमोद भिरूड आदी मान्यवर उपस्थित होते.

त्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यानंतर धन्वंतरी पूजन व स्व. गोदावरी आजी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.कार्यक्रमात भरतनाट्यम, कथ्थक, पंजाबी, राजस्थानी, दक्षिण भारतीय तसेच लावणी, हिप-हॉप, फ्यूजन आणि बॉलिवूड नृत्यप्रकार सादर करण्यात आले. याशिवाय गायन, जॅमिंग सेशन, रेट्रो बॉलिवूड सादरीकरण, स्किट्स आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगत आणली. स्पोर्ट्स ट्रॉफी वितरणही यावेळी करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तल्हा जमादार, राजनंदिनी पाटील, अंजली महाजन व साक्षी पिसे यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी वैष्णवी वानखेडे, ओंकार शेलार, कल्याणी चौधरी, अपूर्व पाटील, मुस्कान सिद्दीकी, रुत्विक भुजबळ, वेदांत काकडे, अंजली गुप्ता, चेतन माळी, विराज पाटील व सृष्टी माहुलकर यांनी विशेष परिश्रम घेतले.

बातमी शेअर करा !
Tags: एमबीबीएस बॅचजळगाव बातम्यामेडिकल कॉलेज इव्हेंटविद्यार्थी उपक्रमसमन्वय २०२६सांस्कृतिक कार्यक्रम
Previous Post

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

Next Post

नवनियुक्त पोलीस अधीक्षकांसमोर कायदा व सुव्यवस्थेचे मोठे आव्हान!

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
नवनियुक्त पोलीस अधीक्षकांसमोर  कायदा व सुव्यवस्थेचे मोठे आव्हान!

नवनियुक्त पोलीस अधीक्षकांसमोर कायदा व सुव्यवस्थेचे मोठे आव्हान!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोविंदाच्या थरांनी सागर पार्क दणाणणार !

गोविंदाच्या थरांनी सागर पार्क दणाणणार !

September 5, 2026
युवतींच्या दहीहंडीचा आज शिवतीर्थावर थरार

युवतींच्या दहीहंडीचा आज शिवतीर्थावर थरार

September 5, 2026
प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

September 3, 2026
जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

September 3, 2026
भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

September 3, 2026

राखीचा धागा मायेचा; ‘विशेष’ भगिनींना GPS परिवाराने दिला आपुलकीचा आधार

September 2, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif