• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

आशाताईंच्या सुरांमध्ये निसर्गाची कोमलता !

अशोक भाऊ जैन यांनी दिल्या आशा भोसले यांच्या आठवणींना उजाळा!

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
April 12, 2026
in जळगाव, श्रद्धांजली
आशाताईंच्या सुरांमध्ये निसर्गाची कोमलता !
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

आशाताईंच्या सुरांमध्ये निसर्गाची कोमलता

 

भारतीय संगीताच्या आकाशातील अजरामर स्वरकन्या आशा भोसले यांच्या निधनाची बातमी मनाला चटका लावून गेली. त्यांच्या सुरांनी अनेक पिढ्यांचे आयुष्य समृद्ध केले, तर त्यांच्या गाण्यांमध्ये निसर्गाची कोमलता, मातीचा सुगंध आणि जीवनातील ओलावा कायम जाणवत राहिला. कविवर्य ना. धों. महानोर यांच्या काव्यातील मातीशी असलेली नाळ जशी जिवंत आहे, तशीच ती आशाताईंच्या स्वरांतूनही अनुभवायला मिळाली.

 

त्यांच्या काही गाण्यांतून शेती, निसर्ग आणि मातीतल्या भावविश्वाचा सुगंध दरवळत राहिला, जणू काळजाशी जपलेली आपल्या भूमीची ओळखच. श्रद्धेय भवरलाल जैन यांच्या कार्यातून जसे जल, जमीन आणि शेतकऱ्यांशी नाते जपले गेले, तसेच आशाताईंच्या सुरांतूनही जीवनाशी असलेले नाते अधिक दृढ झाले. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या पहिल्या पदवी प्रदान सोहळा दि. ७ सप्टेंबर १९९३ ला झाला होता. त्यावेळी आशाताई भोसले व ज्येष्ठ साहित्यीक भालचंद्र नेमाडेदादा यांना डिलीट पदवी प्रदान करण्यात आले होते.

 

त्यावेळी जैन हिल्स येथे त्यांच्या भेटीचा तो प्रसंग आजही मनात ताजा आहे, साधेपणाने, प्रेमाने आणि आत्मीयतेने झालेला संवाद आजही स्मरणात कोरलेला आहे. त्यांच्या सुरांनी निसर्गाला आवाज दिला, मातीला अर्थ दिला आणि मनाला शांती दिली. अशी स्वरसम्राज्ञी आता आपल्यात नसली तरी त्यांचे गीतरूपी अस्तित्व सदैव जिवंत राहील.

अशोक भवरलाल जैन,

अध्यक्ष, जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.

– स्वरसम्राज्ञी आशाताई भोसले यांच्यासमवेत श्रद्धेय भवरलालजी जैन, कविवर्य ना. धों. महानोर व मान्यवर (संग्रहित छायाचित्र दि. 07/09/1993)

बातमी शेअर करा !
Tags: अशोक जैनआशाभोसलेचाहतेजळगावजैन इरिगेशन
Previous Post

एआय बेस स्मार्ट व्होटींग सिस्टीम,एआय न्युज अॅप्लीकेशन आणि एआय बेस रिझुम स्क्रिनिंग सिस्टीम 

Next Post

अस्पृश्यता, जातिभेद आणि अन्यायाविरुद्ध दिलेला लढा आजही प्रेरणादायी-मा खा. डॉ उल्हास पाटील

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
अस्पृश्यता, जातिभेद आणि अन्यायाविरुद्ध दिलेला लढा आजही प्रेरणादायी-मा खा. डॉ उल्हास पाटील

अस्पृश्यता, जातिभेद आणि अन्यायाविरुद्ध दिलेला लढा आजही प्रेरणादायी-मा खा. डॉ उल्हास पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावात गिरीश महाजनांची शिष्टाई फेल शिंदेसेनेची बंडखोरी ; चौरंगी लढत!

जळगावात गिरीश महाजनांची शिष्टाई फेल शिंदेसेनेची बंडखोरी ; चौरंगी लढत!

June 4, 2026

जैन इरिगेशनकडून जगातील सर्वात मोठ्या बायोचार रिअ‍ॅक्टर्सचे उद्घाटन

June 4, 2026
एआयच्या प्रभावी वापराने कृषी क्षेत्रात परिवर्तन – अनिल जैन

एआयच्या प्रभावी वापराने कृषी क्षेत्रात परिवर्तन – अनिल जैन

June 2, 2026
व्हेंटीलेटरवर असलेल्या तीन महिन्यांच्या शिशुचे वाचले प्राण!

व्हेंटीलेटरवर असलेल्या तीन महिन्यांच्या शिशुचे वाचले प्राण!

June 2, 2026
“माणसातला देव माणूस म्हणजे गुलाबराव पाटील; समाजसेवेचा वारसा जपणे हीच खरी संतसेवा” – साध्वी सोनाली दीदी करपे 

“माणसातला देव माणूस म्हणजे गुलाबराव पाटील; समाजसेवेचा वारसा जपणे हीच खरी संतसेवा” – साध्वी सोनाली दीदी करपे 

June 2, 2026
विधान परिषदेसाठी भाजपकडून नंदू महाजन यांना उमेदवारी निश्चित!

विधान परिषदेसाठी भाजपकडून नंदू महाजन यांना उमेदवारी निश्चित!

May 31, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif