• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home Uncategorized

भगवान श्री परशुराम जन्मोत्सव २०२६ : जळगावात भव्य आयोजनाची जय्यत तयारी अंतिम टप्प्यात

पत्र परिषदेत अध्यक्ष ऍड . ओम त्रिवेदी, श्रीकांत खटोड , आर्किटेक नितीन पारगावकर यांनी दिली माहिती

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
April 9, 2026
in Uncategorized
भगवान श्री परशुराम जन्मोत्सव २०२६ : जळगावात भव्य आयोजनाची जय्यत तयारी अंतिम टप्प्यात
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

जळगाव, दि. ८ : सकल ब्राह्मण समाजाच्या एकजुटीचे प्रतीक ठरणाऱ्या भगवान श्री परशुराम जन्मोत्सवाच्या २०२६ च्या भव्य आयोजनाची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. बहुभाषिक ब्राह्मण संघाच्या वतीने यंदा सलग १७ व्या वर्षी हा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात आणि विविध उपक्रमांसह साजरा केला जाणार आहे.

 

समाज एकत्र आणण्याच्या उद्देशाने सुरू झालेल्या या उपक्रमाला वर्षागणिक व्यापक प्रतिसाद मिळत असून, जळगावातून सुरू झालेली ही चळवळ आता संपूर्ण महाराष्ट्रभर विस्तारली आहे. शाखा, भाषा आणि भेद बाजूला ठेवून वर्षातून एकदा एकाच ठिकाणी एकत्र येण्याचा संदेश या जन्मोत्सवातून दिला जातो.

 

 

यंदाच्या आयोजनासाठी ४०० हून अधिक स्वयंसेवक श्रमदान करत असून, दानशूर व्यक्तींच्या आर्थिक सहकार्यामुळे कार्यक्रमाची व्याप्ती अधिक वाढली आहे. जन्मोत्सवाची सुरुवात ५ एप्रिल रोजी रक्तदान शिबिराने झाली.

 

वातावरण निर्मितीसाठी रविवार, दि. १२ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता महाबळ चौकातून विराट मोटारसायकल रॅली काढण्यात येणार आहे. ही रॅली काव्यरत्नावली चौक, रिंगरोड, शास्त्री टॉवर, सुभाष चौक, पांडे डेअरी चौक, वीर सावरकर पुतळा मार्गे पोलिस मल्टीपरपज हॉल येथे समाप्त होईल. त्यानंतर सायंकाळी ७ वाजता दानदाते व श्रमदाते गौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

मुख्य कार्यक्रम रविवार, दि. १९ एप्रिल रोजी पार पडणार आहे. सकाळी ९ वाजता ग्रामदैवत श्री राम मंदिर येथे परशुराम पूजन होईल. दुपारी ४.३० वाजता सुभाष चौकातून भव्य शोभायात्रेला प्रारंभ होणार आहे. या शोभायात्रेत आकर्षक भगवान परशुराम रथ, ढोल-ताशा, लेझीम, दांडिया पथके तसेच महिलांचे तलवारबाजी आणि दांडपट्टा प्रात्यक्षिके हे विशेष आकर्षण ठरणार आहेत. हजारोंच्या संख्येने सहभागी होणाऱ्या या शोभायात्रेचे समापन शिवतीर्थावर होणार आहे.

दरवर्षी नावीन्यपूर्ण उपक्रम राबवणाऱ्या संघटनेने यंदा निमंत्रण पत्रिकेऐवजी २८ पानी मराठी नववर्ष दिनदर्शिका प्रकाशित केली आहे. शास्त्रशुद्ध तिथींसह विविध ब्राह्मण कुळांची माहिती आणि समाजोपयोगी माहितीचा समावेश असलेली ही दिनदर्शिका प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचवली जात आहे.

“स्वतः परशुराम दूत बना आणि हजारोंच्या संख्येने शोभायात्रेत सहभागी व्हा,” असे आवाहन अध्यक्ष अॅड. ओम त्रिवेदी यांनी केले. ते गोलानी मार्केट दक्षिणमुखी हनुमान मंदिर येथे आयोजित पत्र परिषदेत ते बोलत होते. यावेळी  श्रीकांत खटोड, आर्किटेक नितीन पारगावकर  आधी उपस्थित होते.तसेच वर्षभर विविध व्याख्याने व स्नेहसंमेलनांचे आयोजन छत्रपती संभाजी महाराज नाट्यगृह आणि गंधे सभागृह येथे करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

या आयोजनासाठी पदाधिकारी, सभासद व कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, सर्वजण जोमाने तयारीला लागले आहेत.

बातमी शेअर करा !
Previous Post

आता कुठे जगायला खरी सुरवात – डॉ. उल्हास पाटील

Next Post

जैन इरिगेशनमध्ये ‘विश्व नवकार महामंत्र दिवस’ उत्साहात संपन्न

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
जैन इरिगेशनमध्ये ‘विश्व नवकार महामंत्र दिवस’ उत्साहात संपन्न

जैन इरिगेशनमध्ये ‘विश्व नवकार महामंत्र दिवस’ उत्साहात संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोविंदाच्या थरांनी सागर पार्क दणाणणार !

गोविंदाच्या थरांनी सागर पार्क दणाणणार !

September 5, 2026
युवतींच्या दहीहंडीचा आज शिवतीर्थावर थरार

युवतींच्या दहीहंडीचा आज शिवतीर्थावर थरार

September 5, 2026
प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

September 3, 2026
जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

September 3, 2026
भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

September 3, 2026

राखीचा धागा मायेचा; ‘विशेष’ भगिनींना GPS परिवाराने दिला आपुलकीचा आधार

September 2, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif