• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

आता कुठे जगायला खरी सुरवात – डॉ. उल्हास पाटील

वासुदेव जेष्ठ नागरिक संघाचा १० वा वर्धापन दिन साजरा

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
April 9, 2026
in जळगाव, सामाजिक
आता कुठे जगायला खरी सुरवात – डॉ. उल्हास पाटील
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

 

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

भुसावळ : लहान पण कसं गेलं कळलं नाही,तारूण्य शिक्षणात गेलं नंतर नोकरी,लग्न,संसार स्थिर करण्यात आयुष्य गेलं आता कुठे सेवानिवृत्त झाल्यावर जीवन जगण्याची खरी सुरुवात झाली.त्यामुळे वासुदेव जेष्ठ नागरिक संघ हा आनंदाची खाण आहे,असे प्रतिपादन संघाच्या वर्धपान दिनानिमित्ताने गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष तथा माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांनी आज केले.

 

शहरातील रिंग रोडवरील रामकृष्ण योग केंद्रामध्ये वासुदेव ज्येष्ठ नागरिक संघाचा दहावा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.यावेळी व्यासपीठावर माजी अध्यक्ष धनराज पाटील उपाध्यक्ष प्रभाकर झांबरे, सचिव विश्वनाथ वाणी, तसेच नवीन निर्वाचित अध्यक्ष प्रकाश पाटील, सतीश जंगले, भानुदास पाटील, संयोजक डॉ. नितु पाटील हे उपस्थित होते. डॉ. उल्हास पाटील पुढे म्हणाले की उतार वयामध्ये नातवंडे सोबत विरंगुळा होतोच पण स्वतःचं उरलेले जीवन हे स्वतः जगण्यासाठी,आपले आनंद, छंद जोपासण्यासाठी असे ज्येष्ठ नागरिक संघ निश्चितच उपयोगी पडतात.

 

डॉ. नितु पाटील यांना मी तब्बल सोळा वर्षापासून ओळखत असून त्यांच्या विविध सामाजिक उपक्रमांची मला जाणीव आहे. वासुदेव ज्येष्ठ नागरिक संघामार्फत त्यांनी केलेले जेष्ठ नागरिकांचा संघटन हे निश्चितच कौतुकास्पद आहे. आरोग्य, अध्यात्म आत्मज्ञान ते आनंद या चतुरसूत्रीवर संघ उभा असून हे चार स्तंभ निश्चितच तुम्हाला जगण्याची नवीन दिशा देणारे असल्याचे त्यांनी सांगितले.

 

ज्येष्ठ नागरीक भूषण पुरस्कार प्रदान 

संघातील ज्या सभासदांनी वयाची ८० वर्ष पार केले. त्यांना ज्येष्ठ भूषण पुरस्कार या सन्मानाने डॉ. उल्हास पाटील यांच्या हस्ते ट्रॉफी, गुलाब पुष्प देत सन्मानित करण्यात आले. रमण शंकर भोगे, श्रीमती इंदुबाई चावदस सपकाळे, प्रभाकर उखर्डू झांबरे, मधुकर नामदेव बेंडाळे, सुरेश वामन नेहेते, सुरेश बेलसरे, रमेश चौधरी यांचा यात सत्कार करण्यात आला. यावेळी ललिता टोके यांनी वर्धापनदिन निमित्ताने स्वरचित कविता सादर करत वाह वाह मिळवली.

विशेष सत्कार

श्रीमद् भगवद्गीता गीताचे अठरा पैकी बारा पाठ कंठस्थ केल्याबद्दल गीत परिवार तर्फे नूतन अध्यक्ष प्रकाश पाटील यांना’गीता पथिक प्रमाणपत्र देत सन्मानित करण्यात आले, त्याबद्दल डॉ. उल्हास पाटील यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.

सामाजिक समरसता २०२६ चे दिनदर्शिका वाटप

सामाजिक समरसता, नवचैतन्याचा शंखनाद या संकल्पना नुसार गुडीपाडवा निमित्ताने वस्त्रोद्योग मंत्री ना.संजय सावकारे यांनी तयार केलेले दिनदर्शिका वाटप सर्व सभासदांना करण्यात आले. यावेळी जुन्या कार्यकारणीला निरोप देण्यात आला व नवीन कार्यकारिणी चे स्वागत करण्यात आले. यावेळी माजी अध्यक्ष धनराज पाटील यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन सतीश जंगले, प्रस्तावना नवनिर्वाचित अध्यक्ष प्रकाश पाटील, तर डॉ. नितु पाटील,मागील १० वर्षाचा आढावा सादर करत आगामी वर्षाच्या कार्यक्रमाची रूपरेषा मांडली.

 

यांची होती उपस्थिती

यावेळी रमेश चौधरी, पुंजो भारंबे,हेमंत बोंडे, प्रभाकर झांबरे भरत जंगले, लता चौधरी, जनार्दन राणे,दिलीपसिंग चौधरी ,जनार्धन राणे, ,पुंजो भारंबे, रमण भोगे, प्रमोद बोरोले ,विजया भारंबे, ज्योती चौधरी ,राजाराम चौधरी, मोतीराम चौधरी, चंद्रकांत चौधरी, दिलीप चौधरी, प्रमिला चौधरी, प्रतिभा चौधरी, सोपान चर्हाटे ,लोटू फिरके, अलका इंगळे, सोपान नेमाडे, अशोक नेहेते ,विजया पाटील, वैशाली तुकाराम पाटील, ज्ञानदेव पाटील ,रमेश पाटील,दिवाकर गुळवे, रूपचंद्र पाटील,अनिल पाटील, सुलोचना पाटील, प्रकाश पंडित पाटील ,ज्ञानेश्वर पाटील ,इंदू पाटील, विकास राणे, गणेश सरोदे, इंदुबाई सपकाळे ,रजनी तळेले ,यशवंत वारके ,विश्वनाथ वाणी, छबुताई झांबरे, अरुण धांडे आदी जेष्ठ नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यांनी घेतले परिश्रम 

यशस्वीतेसाठी प्रकाश पाटील,संजय चौधरी, प्रभाकर झांबरे, अशोक नेहेते, धनराज पाटील, भास्कर खाचणे,भानुदास पाटील, सुनील सूर्यवंशी यांनी सहकार्य केले. विश्व कल्याण साधणारी प्रार्थना होऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.आभार प्रदर्शन भानुदास पाटील यांनी मानले.

एक तरी ओवी अनुभवावी,डॉ. नितु पाटील

वासुदेव जेष्ठ नागरिक संघ दरवर्षी एक थीम ठरवून त्यावर वर्षभर कार्यक्रम राबवते. यावर्षी एक तरी ओवी अनुभवावी या अंतर्गत धार्मिक सहल,प्रवचन,निरूपण, कीर्तन,भारुड असे विविध धार्मिक उपक्रम राबवण्यात येणार आहेत .

डॉ.नितु पाटील, संयोजक वासुदेव ज्येष्ठ नागरिक संघ भुसावळ.

 

बातमी शेअर करा !
Previous Post

धीरज सोनी यांना पत्नी शोक!

Next Post

भगवान श्री परशुराम जन्मोत्सव २०२६ : जळगावात भव्य आयोजनाची जय्यत तयारी अंतिम टप्प्यात

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
भगवान श्री परशुराम जन्मोत्सव २०२६ : जळगावात भव्य आयोजनाची जय्यत तयारी अंतिम टप्प्यात

भगवान श्री परशुराम जन्मोत्सव २०२६ : जळगावात भव्य आयोजनाची जय्यत तयारी अंतिम टप्प्यात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

July 22, 2026
४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

July 21, 2026
जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

July 21, 2026

केंद्रीय राज्य क्रीडा मंत्र्यांच्या जिल्ह्यात खेळाडूंवर अन्याय 15 ऑगस्ट रोजी आत्मदहनाचा इशारा

July 20, 2026
हातात माती… मनात निसर्ग!            सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

July 20, 2026
ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे  अरविंद लाठी कालवश!

ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे अरविंद लाठी कालवश!

July 19, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif