नवराज्य Live न्यूज नेटवर्क
शेरी (ता. धरणगाव) येथे प्राचीन १२ व्या शतकातील सती अनुसया मातेचा यात्रा महोत्सव चैत्र वद्य पाडवा या तिथीनुसार मोठ्या उत्साहात पार पडला. या यात्रेला परिसरातील भाविकांची मोठी उपस्थिती लाभली होती.
यावेळी पारंपरिक बारागाडा ओढण्याचा मान युवराज गायकवाड यांना मिळाला. त्यांच्यासोबत राहुल पाटील सर व विक्की बेलदार यांनीही उत्साहाने सहभाग नोंदवला.
यात्रेनिमित्त वहन बजरंगबल्ली ध्वज मिरवणूक बँडच्या ठेक्यात दिमाखात काढण्यात आली, ज्यामुळे संपूर्ण गावात भक्तिमय व उत्साही वातावरण निर्माण झाले.
तसेच, क्रांतीभाऊ सोनवणे (दोनगावकर) यांच्या लोकनाट्य तमाशा मंडळाचे आकर्षक आयोजन करण्यात आले होते, ज्याला ग्रामस्थांनी मोठा प्रतिसाद दिला.
सर्व ग्रामस्थ मंडळी, शेरी यांच्या सहकार्याने हा यात्रोत्सव अत्यंत यशस्वी व उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.







