• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

प्रेस फोटोग्राफर संघ ठरला पत्रकार प्रीमियर लीग पर्व-२ चा विजेता!

जळगाव प्रिंट मिडिया संघ उपविजेता तर प्रेस एडिटर संघ तृतीय, मान्यवरांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण 

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
March 31, 2026
in जळगाव, स्पर्धा
प्रेस फोटोग्राफर संघ ठरला पत्रकार प्रीमियर लीग पर्व-२ चा विजेता!
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव, दि.३० – पत्रकारांनी पत्रकारांसाठी आयोजित केलेली महाराष्ट्रातील एकमेव स्पर्धा ‘पत्रकार प्रिमियर लीग’ पर्व-२ चा समारोप दि.२९ मार्च रोजी दिमाखात पार पडला. जळगाव प्रिंट मीडिया विरुद्ध जळगाव प्रेस फोटोग्राफर संघात खेळल्या गेलेल्या उपांत्य सामन्यात प्रेस फोटोग्राफर संघाने बाजी मारली. तृतीय क्रमांक प्रेस एडिटर संघाने पटकावला. सर्व संघांना आणि खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले.

 

समाजाचा चौथा आधारस्तंभ असलेले पत्रकार नेहमीच जीवाची बाजी लावत, ऊन, वारा, पाऊस, थंडी सहन करीत दिवसरात्र धावपळ करीत असतात. राज्यात विविध धर्म, जात, शासकीय, निम शासकीय कार्यालयातर्फे क्रिकेटसह इतर स्पर्धा आयोजित केल्या जातात. सर्वच आपआपला विचार करतात मात्र पत्रकारांचा कुणीही विचार करत नाही. पत्रकारांच्या आरोग्य, मनोरंजनासाठी हाती घेतलेल्या पत्रकार प्रीमियर लीगचे दुसरे पर्व दि.२६ ते २९ मार्च दरम्यान सागर पार्क मैदान याठिकाणी पार पडले.

 

२४ संघांचा सहभाग, चुरशीचे सामने

जिल्हाभरातील पत्रकारांना एकत्र करून, सर्व पत्रकार संघटनेच्या पाठींब्याने खेळल्या गेलेल्या स्पर्धेत जिल्ह्यातील पत्रकारांचे तालुकानिहाय १४, जळगाव शहरातील संघ, संपादक, लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, डॉक्टर, पोलीस प्रशासन संघ असे २४ संघ सहभागी झाले होते. चार दिवसात अनेक चुरशीचे सामने पहावयास मिळाले. ६ षटकांच्या सामन्यात ९९ सर्वोच्च धावसंख्या तर २० सर्वात कमी धावसंख्या देखील प्रेक्षकांनी अनुभवली.

 

खेळाडू, प्रेक्षक, कुटुंबासाठी उत्तम व्यवस्था

चार दिवसीय स्पर्धेत जवळपास ५०० पेक्षा अधिक पत्रकारांनी सहभाग नोंदवला. खेळाडू पत्रकारांसाठी चार दिवस जेवणाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. तसेच खेळाडू, कुटुंबीय आणि प्रेक्षकांसाठी सरबत, पाणी आणि लाईव्ह प्रक्षेपणाची देखील व्यवस्था आयोजकांनी केली होती. स्पर्धेसाठी किशोर पाटील, वाल्मिक जोशी, प्रवीण सपकाळे, चेतन वाणी, जकी अहमद, भगवान सोनार, वसीम खान, सचिन गोसावी, राकेश वाणी, यामिनी कुलकर्णी यांच्यासह सर्व पत्रकार मित्रांनी परिश्रम घेतले.

 

मान्यवरांनी वाढवले प्रोत्साहन

चार दिवसीय स्पर्धेचे उद्घाटन पालकमंत्री गुलाबराव पाटील, मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धेत चार दिवसात टॉस करण्यासाठी आणि खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, मंत्री गिरीश महाजन, खासदार स्मिता वाघ, आ.राजुमामा भोळे, आ.किशोर पाटील, महापौर दीपमाला काळे, धरणगाव नगराध्यक्षा लीलाबाई चौधरी, उपमहापौर मनोज चौधरी, स्थायी समिती सभापती डॉ.चंद्रशेखर पाटील, जिल्हा दूध संघ संचालिका भैरवी वाघ-पलांडे, जिल्हाधिकारी डॉ.रोहन घुगे, पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, प्रांताधिकारी विनय गोसावी, उद्योजिका शीतल बाक्षे, जिल्हा माहिती अधिकारी रविंद्र ठाकूर यांच्यासह संपादक आणि जेष्ठ पत्रकारांनी हजेरी लावली. सर्वच लोकप्रतिनिधी, मान्यवरांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.

 

मुख्य चषक आणि सन्मानचिन्हांचे आकर्षण

स्पर्धेत उपउपांत्य फेरीत गतविजेता चाळीसगाव संघ, जळगाव प्रिंट मिडिया, जळगाव एडिटर, प्रेस फोटोग्राफर संघ पोहचले होते. अंतीम सामना जळगाव प्रिंट मीडिया विरुद्ध जळगाव प्रेस फोटोग्राफर संघात खेळला गेला. प्रेस फोटोग्राफर संघ द्वितीय पर्वाचा विजेता ठरला. तृतीय क्रमांक प्रेस एडिटर संघाने पटकावला. स्पर्धेत सहभागी सर्व संघाना, प्रत्येक सामन्यातील सलामीवीर, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण, मालिकावीर यासह प्रथम, द्वितीय, तृतीय विजेत्या संघाला आकर्षक चषक आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

 

मैत्रीपूर्ण सामन्यांनी वाढवली रंगत

शेवटच्या दिवशी सकाळच्या सत्रात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी विरुद्ध जिल्हाधिकारी कार्यालय असा सामना रंगला. प्रांताधिकारी विनय गोसावी यांच्या नेतृत्वात संघाने विजय मिळवला. त्यांनतर जिल्हाधिकारी कार्यालय विरुद्ध पोलीस अधीक्षक कार्यालय सामन्यात पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांच्या नेतृत्वात संघाने विजय मिळविला. आयोजन समिती विरुद्ध पोलीस अधीक्षक कार्यालय सामन्यात पोलीस अधीक्षक संघाने विजय मिळवला. अधिकारी, कर्मचारी खेळत असल्याने सामन्यात चांगलीच रंगत पाहायला मिळाली.

बातमी शेअर करा !
Tags: कलेक्टरक्रिकेट स्पर्धाजळगावजिल्हाधिकारीपत्रकार प्रीमियर लीगपी पी एलरोहन घुगेसागर पार्क
Previous Post

महासभेत सर्व नगरसेवकांना संधी द्या; संवेदनशील विषयांसाठी स्वतंत्र वेळ द्या – विशाल भोळे यांची मागणी

Next Post

जळगाव महापालिकेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा भावपूर्ण सन्मान

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
जळगाव महापालिकेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा भावपूर्ण सन्मान

जळगाव महापालिकेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा भावपूर्ण सन्मान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

July 22, 2026
४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

July 21, 2026
जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

July 21, 2026

केंद्रीय राज्य क्रीडा मंत्र्यांच्या जिल्ह्यात खेळाडूंवर अन्याय 15 ऑगस्ट रोजी आत्मदहनाचा इशारा

July 20, 2026
हातात माती… मनात निसर्ग!            सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

July 20, 2026
ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे  अरविंद लाठी कालवश!

ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे अरविंद लाठी कालवश!

July 19, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif