• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

महासभेत सर्व नगरसेवकांना संधी द्या; संवेदनशील विषयांसाठी स्वतंत्र वेळ द्या – विशाल भोळे यांची मागणी

सदस्यांनी बाक वाजून दिली. सदस्य विशाल भोळे यांना दाद.

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
March 31, 2026
in जळगाव, महासभा
महासभेत सर्व नगरसेवकांना संधी द्या; संवेदनशील विषयांसाठी स्वतंत्र वेळ द्या – विशाल भोळे यांची मागणी
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

 

जळगाव – (योगेश सुने चीफ एडिटर नवराज्य Live )

जळगाव शहर महानगरपालिकेची अडीच वर्षांनंतर पार पडलेली पहिली महासभा विविध चर्चांमुळे गाजली. या महासभेत नगरसेवक तथा स्थायी समिती सदस्य विशाल भोळे यांनी सभागृहात महत्त्वपूर्ण मुद्दे उपस्थित करत आगामी महासभांच्या कामकाजाबाबत सूचना मांडल्या.

महापौर दीपमाला काळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत भोळे यांनी सांगितले की, पुढील महासभांमध्ये संवेदनशील व गंभीर विषयांसाठी किमान २० मिनिटांचा स्वतंत्र वेळ दिला पाहिजे. अन्यथा शहर विकासाशी संबंधित अनेक महत्त्वाचे मुद्दे दुर्लक्षित राहण्याची शक्यता आहे.

तसेच, प्रत्येक प्रभागातील नगरसेवकांना आपले प्रश्न मांडण्यासाठी किमान १० ते १५ मिनिटांचा वेळ देण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली. सर्व नगरसेवकांना समान संधी मिळाल्यास स्थानिक समस्यांवर प्रभावी चर्चा होऊ शकते, असे त्यांनी नमूद केले.

यासोबतच, संबंधित विषयांवर चर्चा होत असताना त्या-त्या विभागाचे अधिकारी उपस्थित राहणे अत्यावश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. विशेषतः विद्युत, अतिक्रमण, पाणीपुरवठा यांसारख्या महत्त्वाच्या विभागांचे अधिकारी व त्यांची संपूर्ण टीम सभागृहात उपस्थित असावी, जेणेकरून प्रश्नांना तत्काळ उत्तरे मिळू शकतील.

शेवटी, या सर्व सूचनांची अंमलबजावणी पुढील महासभेत करण्यात यावी, अशी विनंती विशाल भोळे यांनी अध्यक्षांकडे केली. त्यांच्या या मांडणीला सभागृहातील सदस्यांकडून टाळ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

बातमी शेअर करा !
Tags: जळगाव न्यूजजळगाव महापालिकाजळगाव शहरमहापौरमहासभाविशाल भोळेशहर विकासशहराचा विकास
Previous Post

ख्वाजामिया झोपडपट्टीच्या जागेवर २०० कोटींचा घोटाळा?

Next Post

प्रेस फोटोग्राफर संघ ठरला पत्रकार प्रीमियर लीग पर्व-२ चा विजेता!

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
प्रेस फोटोग्राफर संघ ठरला पत्रकार प्रीमियर लीग पर्व-२ चा विजेता!

प्रेस फोटोग्राफर संघ ठरला पत्रकार प्रीमियर लीग पर्व-२ चा विजेता!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावात गिरीश महाजनांची शिष्टाई फेल शिंदेसेनेची बंडखोरी ; चौरंगी लढत!

जळगावात गिरीश महाजनांची शिष्टाई फेल शिंदेसेनेची बंडखोरी ; चौरंगी लढत!

June 4, 2026

जैन इरिगेशनकडून जगातील सर्वात मोठ्या बायोचार रिअ‍ॅक्टर्सचे उद्घाटन

June 4, 2026
एआयच्या प्रभावी वापराने कृषी क्षेत्रात परिवर्तन – अनिल जैन

एआयच्या प्रभावी वापराने कृषी क्षेत्रात परिवर्तन – अनिल जैन

June 2, 2026
व्हेंटीलेटरवर असलेल्या तीन महिन्यांच्या शिशुचे वाचले प्राण!

व्हेंटीलेटरवर असलेल्या तीन महिन्यांच्या शिशुचे वाचले प्राण!

June 2, 2026
“माणसातला देव माणूस म्हणजे गुलाबराव पाटील; समाजसेवेचा वारसा जपणे हीच खरी संतसेवा” – साध्वी सोनाली दीदी करपे 

“माणसातला देव माणूस म्हणजे गुलाबराव पाटील; समाजसेवेचा वारसा जपणे हीच खरी संतसेवा” – साध्वी सोनाली दीदी करपे 

June 2, 2026
विधान परिषदेसाठी भाजपकडून नंदू महाजन यांना उमेदवारी निश्चित!

विधान परिषदेसाठी भाजपकडून नंदू महाजन यांना उमेदवारी निश्चित!

May 31, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif