• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

केसीई इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेन्ट स्वायत्त महाविद्यालयांत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात       

विविध सांस्कृतिक स्पर्धा, नृत्य-संगीत आणि विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट कामगिरीचा गौरव; केसीई महाविद्यालयात रंगला स्नेहसंमेलन सोहळा

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
March 27, 2026
in जळगाव, वार्षिक स्नेहसंमेलन
केसीई इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेन्ट स्वायत्त महाविद्यालयांत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात       
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

 

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव – खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेन्ट स्वायत्त महाविद्यालयांत वार्षिक स्नेहसंमेलनात अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन विभागातील विद्यार्थ्यांचा उत्साह दिसून आला .

 

व्यासपीठावर उपस्थित प्रमुख पाहुणे केसीई संस्थेच्या संचालिका डॉ .शिल्पा बेंडाळे ,एस एस मणियार विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी वाय रेड्डी ,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय सुगंधी ,अकॅडमिक डीन प्रा. राहुलकुमार पटेल , आय क्यू ए सी समन्वयक प्रा कल्पेश महाजन , ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डीन प्रा .गणेश पाटील , पॉलीटेकनीक चे समन्वयक प्रा. बी जे लाठी , ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभाग प्रमुख प्रा मनीष महाले ,वार्षिक स्नेहसंमेलनाचे समन्वयक प्रा रेवती पाटील व सह समन्वयक प्रा सचिन नाथ ,सर्व विभाग प्रमुख ,विद्यापीठ प्रतिनिधी ,महाविद्यालयीन सांस्कृतिक विद्यार्थी प्रतिनिधी यांचे उपस्थितीत दीप्रज्वलन व सरस्वतीपूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली .

 

व्यासपीठावर उपस्थित प्रमुख पाहुणे व मान्यवरांचा सत्कार महाविद्यालयतर्फे करण्यात आला..व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांचे हस्ते अंतरंग ,प्राध्यापकांचे संशोधन पेपर ,तसेच ट्रेनिंग अँड प्लेसमेंट चे कार्यक्षम अश्या विविध स्मरणिकांचे प्रकाशन करण्यात आले .हे स्नेहसंमेलन विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी आणि अभ्यासाव्यतिरिक्त कलागुणांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी आयोजित करण्यात आले होते .

 

महाविद्यालयाचा वार्षिक अहवाल सादर करून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातील प्रगतीचा आढावा घेतला. आठवडाभर सुरु असलेल्या स्नेहसंमेलनात मेहंदी ,रांगोळी ,अंताक्षरी ,शाही संस्कृती ,साडी व टाय डे ,ट्रॅडिशनल डे ,सोलो डान्स ,ग्रुप डान्स ,रॅम्प वॉक ,फॅशन शो ,फूड स्टाल अश्या विविध प्रकारचे स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नृत्याने कार्यक्रमाची रंगत वाढवली.

 

महाराष्ट्राच्या लोककलांवर आधारित नृत्य, देशभक्तीपर समूहगीत आणि सामाजिक संदेश देणाऱ्या लघू नाटीका (Skits) मुख्य आकर्षण ठरल्या. विद्यार्थ्यांनी पाश्चात्य आणि पारंपरिक नृत्याचा सुंदर मिलाफ सादर केला. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात, वर्षभरातील विविध क्रीडा स्पर्धा, वक्तृत्व, वादविवाद आणि शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बक्षिसे आणि प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले. पाहुण्यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक केले आणि कला व शिक्षण यांमधील समतोल साधण्यावर भर दिला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सुमित भगत ,सेजल काबरा ,वेदिका चितारे यांनी केले .

बातमी शेअर करा !
Tags: इंजीनियरिंग कॉलेजके सी ई सोसायटीजळगावमॅनेजमेन्ट स्वायत्तमेजवानीवार्षिक स्नेहसंमेलनसांस्कृतिक
Previous Post

ओमच्या धाडसाने वाचले चौघांचे प्राण ; जैन इरिगेशन समूहाचा मदतीचा हात 

Next Post

मालमत्ता करावरील ‘शास्ती माफी’ ३१ मार्च शेवटची मुदत 

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
मालमत्ता करावरील ‘शास्ती माफी’ ३१ मार्च शेवटची मुदत 

मालमत्ता करावरील 'शास्ती माफी' ३१ मार्च शेवटची मुदत 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

युवतींच्या दहीहंडीचा आज शिवतीर्थावर थरार

युवतींच्या दहीहंडीचा आज शिवतीर्थावर थरार

September 5, 2026
प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

September 3, 2026
जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

September 3, 2026
भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

September 3, 2026

राखीचा धागा मायेचा; ‘विशेष’ भगिनींना GPS परिवाराने दिला आपुलकीचा आधार

September 2, 2026
पाळधी बायपास अपघातप्रकरणी ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा!

पाळधी बायपास अपघातप्रकरणी ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा!

September 1, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif