• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

ओमच्या धाडसाने वाचले चौघांचे प्राण ; जैन इरिगेशन समूहाचा मदतीचा हात 

ओम आणि त्याच्या भावाच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च जैन फाऊंडेशन करणार

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
March 27, 2026
in जळगाव, विशेष बातमी
ओमच्या धाडसाने वाचले चौघांचे प्राण ; जैन इरिगेशन समूहाचा मदतीचा हात 
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

 

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव, दि.२५ (प्रतिनिधी) :* पोहता येत नसतानाही अनेर नदीत आंघोळीसाठी उतरलेल्या चौघासाठी उमेश उर्फ ओम रवींद्र पाटील (वय 14 ) हा देवदूत ठरला आहे. ओम याच्या धाडसामुळे चौघांचे प्राण वाचले. ओम याच्या या धाडसाची दखल घेत जैन इरिगेशन सिस्टिम लिमिटेड व भवरलाल अँड कांताबाई जैन फाऊंडेशनच्या वतीने त्याच्या शिक्षणाचा सर्व खर्च करण्याचा निर्णय जाहीर केला होता. आज (२५ मार्च) ओम पाटील याचा व त्याचा परिवाराचा जैन इरिगेशन सिस्टिम लिमिटेडचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यावेळी ओम याच्या भावाचाही शैक्षणिक खर्च उचलण्याचा निर्णय अशोक जैन यांनी जाहीर केला.

 

अनेर नदीत गणपूर ( चोपडा ) येथील चार अल्पवयीन मुले ( वय 16 ) आंघोळीसाठी उतरले होते. त्यांना पोहता येत नसल्याने ते बुडू लागले. मुलांची आरडाओरड ऐकताच जवळच असलेल्या ८ वीत शिकणाऱ्या ओमने क्षणाचाही विलंब न लावता नदीत उडी घेतली. आपल्या जिगरबाज वृत्तीने त्याने एकामागून एक अशा चौघांनाही सुखरूप बाहेर काढले. त्याच्या या अचाट धैर्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. जैन इरिगेशनच्या भवरलाल अँड कांताबाई जैन फाऊंडेशनने ओम याचा सर्व शैक्षणिक खर्च करण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यानंतर २५ मार्च रोजी त्याला जैन हिल्स येथे बोलवून त्याचा व आई-वडिलांचा सत्कार केला. यावेळी सोबत परिवारातील सदस्य व अ‍ॅड. बाळकृष्ण पाटील ही होते. अशोक जैन यांनी ओम याच्या पालकांशी संवाद साधत त्याच्या धाडसाचे कौतूक केले. ओम याचा भाऊ दिवेश हा अकरावीत शिक्षण घेत आहे, त्याचाही शैक्षणिक खर्च करण्याचा निर्णय जाहीर केला. ” ओमचे धाडस अफाट आहेच, पण त्याच्यावर झालेले संस्कार त्याहून मोठे आहेत,” अशा शब्दांत अशोक जैन यांनी त्याचे कौतुक केले.

ओम आठवीच्या वर्गात शिकत आहे. ओमचे वडील रवींद्र पाटील आणि आई सरलाबाई हे शेतमजुरी करतात. त्याची परिस्थिती साधारण आहे. आर्थिक परिस्थितीमुळे मुलांच्या शिक्षणाची त्यांना चिंता होती. परंतु भवरलाल अँड कांताबाई जैन फाऊंडेशनच्या वतीने दोन्ही मुलांच्या शिक्षणाचा खर्च करण्याचा निर्णय घेतल्या गेल्यामुळे पाटील दाम्पत्यांनी समाधान व्यक्त केले.

फोटो ओळी-ओम पाटील याचा सत्कार करताना अशोक जैन, सोबत अ‍ॅड. बाळकृष्ण पाटील, स्वरुप लुंकड, रवींद्र पाटील, सरला पाटील व इतर.

बातमी शेअर करा !
Tags: ओम पाटीलजळगावजेनेरिगेशनजैन इरिगेशनदेवदूतपोहूनमदतीचा हातवाचवले प्राण
Previous Post

जळगावात रामनवमीचा अभूतपूर्व उत्साह !

Next Post

केसीई इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेन्ट स्वायत्त महाविद्यालयांत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात       

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
केसीई इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेन्ट स्वायत्त महाविद्यालयांत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात       

केसीई इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेन्ट स्वायत्त महाविद्यालयांत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात       

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आर्ट गॅलरीत विद्यार्थ्यांनी साकारले कलाविष्कार 

आर्ट गॅलरीत विद्यार्थ्यांनी साकारले कलाविष्कार 

April 14, 2026
पिवळसर पाण्यावरून सभापतींचा अधिकाऱ्यांना जाब

पिवळसर पाण्यावरून सभापतींचा अधिकाऱ्यांना जाब

April 14, 2026
महापालिकेने कठोर पावलं उचलून मोबाईल टावर कडील थकबाकी वसूल करावी!

महापालिकेने कठोर पावलं उचलून मोबाईल टावर कडील थकबाकी वसूल करावी!

April 13, 2026
व्यसनाधीनता देशासमोरील गंभीर समस्या – नगराध्यक्षा संगीता महाजन

व्यसनाधीनता देशासमोरील गंभीर समस्या – नगराध्यक्षा संगीता महाजन

April 13, 2026
महानगरपालिकेतर्फे महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन!

महानगरपालिकेतर्फे महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन!

April 13, 2026
अस्पृश्यता, जातिभेद आणि अन्यायाविरुद्ध दिलेला लढा आजही प्रेरणादायी-मा खा. डॉ उल्हास पाटील

अस्पृश्यता, जातिभेद आणि अन्यायाविरुद्ध दिलेला लढा आजही प्रेरणादायी-मा खा. डॉ उल्हास पाटील

April 13, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif