नवराज्य Live न्यूज नेटवर्क
जळगाव- के.सी.ई. सोसायटी संचलित व्ही.पी होले कॉलेज ऑफ एज्युकेशन अँड फिजिकल एज्युकेशन (स्वायत्त) जळगाव येथे प्रतिबिंब वार्षिक स्नेहसंमेलन व गुणगौरव समारंभ उत्साहात साजरा करण्यात आला.या स्नेहसंमेलनाच्या उदघाटन प्रसंगी अध्यक्ष महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्या डॉ.रंजना सोनवणे होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणुन साहित्यिक श्री अशोक कोळी उपस्थित होते.
व्यवस्थापन परिषदेचे सदस्य व माजी प्राचार्य डॉ.अशोक राणे यांची प्रमुख उपस्थिती होती. शारीरिक शिक्षण विभागाचे विभाग प्रमुख प्रा.प्रणव बेलोरकर अध्यापक विद्यालयाचे प्रमुख प्रा. शालिनी तायडे विद्यार्थी प्रतिनिधी तेजस्विनी वांकावाला व्यासपीठावर उपस्थित होते सुरुवातीला सरस्वती देवीच्या प्रतिमेचे सर्व मान्यवरांनी प्रतिमा पूजन केले. त्यानंतर विद्यार्थिनी राजेश्वरी बुंदे हिने स्वागत गीत सादर केले , उपप्राचार्य डॉ. केतन चौधरी यांनी मान्यवरांचे परिचय करून दिले.उदघाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे साहित्यिक अशोक कोळी यांनी वाढलेल्या स्क्रीन टाईम कमी करण्यासाठी देशी खेळांना प्रोत्साहन दिले पाहिजे असे प्रतिपादित केले,तसेच आपल्या ‘पंचाईत’ या स्वलिखित कविता सादर करून विद्यार्थ्यांची मने जिंकली.उद्घाटक डॉ.अशोक राणे यांनी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या कोणत्याही कार्यक्रमात स्वतःसाठी सहभाग घ्यायला हवे असे सांगितले. आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलताना प्राचार्या डॉ. रंजना सोनवणे यांनी होणाऱ्या भावी शिक्षकांना स्नेहसंमेलनाचे महत्त्व सांगितले. सांस्कृतिक कार्यक्रमात नृत्य, नाटक, एकपात्री नाटक, आणि पाश्चिमात्य गायनाच्या सहभाग होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समन्वयिका प्रा.नयन पाटील यानी केले, सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी स्वाती पाटील व हर्षाली ताडे यांनी केले तर आभार प्रा. संगीता पाटील यांनी मानले. कार्यक्रमाला सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
दुसऱ्या दिवशी गुणगौरव समारंभ आयोजन करण्यात आले होते. समारंभाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या डॉ. रंजना सोनवणे होत्या तर प्रमुख पाहुणे म्ह्णून कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे अंतरविद्या शाखा अभ्यास विभागाचे अधिष्ठाता डॉ.साहेबराव भुकन होते. प्रमुख उपस्थिती संस्थेच्या सदस्या डॉ. शिल्पा बेंडाळे यांची होती. सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी प्रार्थना व स्वागत गीत सादर केले. सर्व मान्यवरांनी दीपप्रज्वलन केले. उपप्राचार्य डॉ. केतन चौधरी यांनी सर्व मान्यवरांचे परिचय करून दिले. कार्यक्रमाची प्रस्तावना कार्यक्रम समन्वयिका डॉ. सुनिता नेमाडे यांनी मांडली.

प्रा. शालिनी तायडे यांनी अध्यापक विभागाच्या अहवाल, डॉ पुनम जमदाडे यांनी शिक्षणशास्त्र विभागाच्या अहवाल व प्रा. आकाश बिवाल यांनी शारीरिक शिक्षणशास्त्र विभागाच्या अहवाल सादर केला. अध्यापक विभाग,शिक्षणशास्त्र विभाग, आणि शारीरिक शिक्षण शास्त्र विभागातील प्रथम द्वितीय व तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांचे सत्कार व अभिनंदन करण्यात आले. विविध खेळात प्राविण्य प्राप्त खेळाडू, विविध स्पर्धेत व कार्यक्रमात यश संपादन केलेले व सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले. डॉ. शिल्पा बेंडाळे यांनी विद्यार्थी शिक्षकांना स्मार्ट शिक्षक बना असे आव्हान केले तर प्रमुख पाहुणे डॉ. भुकन यांनी शिक्षक हा सामाजिक अभियंता आहे, शिक्षक हा समाज घडवण्याचे काम करतो असे सांगितले. आपले अध्यक्षीय भाषणातून प्राचार्या डॉ रंजना सोनवणे यांनी टेक्नॉलॉजी कितीही पुढे गेली तरी आपली परंपरा संस्कृती गुरु शिष्याची आहे आणि ते टिकून ठेवणे भविष्यातील शिक्षकांचे आद्य कर्तव्य आहे असे प्रतिपादित केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजश्री बुंदे, भाग्यश्री चौधरी. यांनी केले तर आभार संगीता पाटील यांनी मानले. कार्यक्रमास सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.







