• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home कारवाई

महसूल विभागाचा वाळू माफियांना दणका!

वडनगरीत प्रांताधिकाऱ्यांची थेट नदीपात्रात उतरून कारवाई.

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
February 25, 2026
in कारवाई, जळगाव ग्रामीण
महसूल विभागाचा वाळू माफियांना दणका!
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

 

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव, दि.२४ – अवैध वाळू उपशाविरुद्ध प्रशासनाने आता आक्रमक पाऊल उचलले असून, जळगावचे प्रांताधिकारी विनय गोसावी यांनी स्वतः नदीपात्रात उतरून अवैध वाळू उपसा उधळून लावला. जळगाव तालुक्यातील वडनगरी येथे आज दुपारी कारवाई करण्यात आली.

 

प्रांताधिकारी विनय गोसावी यांना वडनगरी परिसरात अवैध वाळू उपसा होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी महसूल पथकाने सकाळपासूनच परिसरात पाळत ठेवली होती. संधी मिळताच प्रांताधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनानुसार पथकासह थेट नदीपात्रात धाव घेतली. सुमारे ३ तास चाललेल्या या मोहिमेत वाळू काढण्यासाठी वापरण्यात येणारी यंत्रसामग्री, जाळी आणि दोरखंड शोधून काढून नष्ट करण्यात आले.

 

या मोहिमेत प्रांताधिकारी विनय गोसावी यांच्यासोबत मंडळ अधिकारी छाया कोळी, ग्राम महसूल अधिकारी.बडगुजर, महसूल सहाय्यक तेजस सपकाळे, वडनगरीचे पोलीस पाटील व स्थानिक महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश होता.

 

कारवाई दरम्यान जप्त केलेली सर्व यंत्रसामग्री प्रांताधिकाऱ्यांनी स्वतःच्या शासकीय वाहनातून जळगाव येथील प्रशासकीय इमारतीत जमा केली आहे. तसेच, गावातील तरुण आणि पोलीस पाटील यांना अवैध वाहतुकीवर लक्ष ठेवण्याच्या व संशयास्पद हालचाली दिसताच तात्काळ कळवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या धडक कारवाईमुळे परिसरातील अवैध वाळू उपसा करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून, प्रशासनाच्या या भूमिकेचे सर्वत्र कौतुक होत आहे

बातमी शेअर करा !
Tags: Jalgaonअवैध वाळू उपसाकारवाईजळगाव अवैध वाळू उपसामहसूल विभागवडनगरी वाळू कारवाईवाळू माफिया
Previous Post

६६ व्या वाढदिवसानिमित्त ६६ जणांना मिळाली नवी दृष्टी!

Next Post

‘अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली!

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
‘अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली!

'अनुभूती'च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

July 21, 2026
जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

July 21, 2026

केंद्रीय राज्य क्रीडा मंत्र्यांच्या जिल्ह्यात खेळाडूंवर अन्याय 15 ऑगस्ट रोजी आत्मदहनाचा इशारा

July 20, 2026
हातात माती… मनात निसर्ग!            सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

July 20, 2026
ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे  अरविंद लाठी कालवश!

ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे अरविंद लाठी कालवश!

July 19, 2026

डॉ. आलोक कुमार यादव यांना पीएच.डी. पदवी प्रदान

July 19, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif