• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

जळगावमध्ये ‘खान्देश महोत्सव २०२६’चे आयोजन!

स्थानिक महिला उद्योजकांना मिळणार व्यासपीठ: महापौर दीपमाला काळे यांनी दिली माहिती.

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
February 20, 2026
in जळगाव, वाणिज्य वार्ता
जळगावमध्ये ‘खान्देश महोत्सव २०२६’चे आयोजन!
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

जळगावमध्ये ‘खान्देश महोत्सव २०२६’चे आयोजन; स्थानिक महिला उद्योजकांना मिळणार व्यासपीठ

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव : स्थानिक महिला बचत गट, स्वयंसहाय्यता गट व लघुउद्योजकांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने जळगाव शहर महानगरपालिका आणि महिला व बालकल्याण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘खान्देश महोत्सव २०२६’ आयोजित करण्यात आला आहे. ‘व्होकल फॉर लोकल’ या संकल्पनेवर आधारित हा महोत्सव २६ फेब्रुवारी ते २ मार्च २०२६ या कालावधीत जळगावातील सागर पार्क परिसरात रंगणार आहे.

हा महोत्सव यंदा सहाव्या वर्षात पदार्पण करत असून, याबाबतची माहिती दीपमाला काळे यांनी दिली.

 

त्या महानगरपालिकेतील१७ व्या मजल्यावर महापौर कक्ष येथे आयोजित पत्र परिषदेत त्या बोलत होत्या यावेळी उपमहापौर मनोज चौधरी, शहर अभियान व्यवस्थापक गायत्री पाटील , आदी उपस्थित होते.

१८० स्टॉल्समधून खान्देशी संस्कृतीचे दर्शन

महोत्सवात एकूण १८० स्टॉल्स उभारण्यात येणार असून, त्यामध्ये महिला बचत गटांनी तयार केलेल्या हस्तकला वस्तू, गृहउपयोगी साहित्य, किचन व होम अप्लायन्सेस, इलेक्ट्रॉनिक दागिने, सौंदर्यप्रसाधने, ऑफिस व घरगुती सजावटीच्या वस्तू उपलब्ध असतील. तसेच खान्देशी पारंपरिक शाकाहारी व मांसाहारी खाद्यपदार्थांची खास मेजवानी नागरिकांना अनुभवता येणार आहे.

मनोरंजन, बक्षिसे आणि स्पर्धांचा रंग

खरेदीसोबतच नागरिकांच्या मनोरंजनासाठी सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. २८ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध अभिनेता ओम यादव यांच्या उपस्थितीत महिलांसाठी विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असून, त्यात पैठणी, राणीहार व आकर्षक भेटवस्तू जिंकण्याची संधी मिळणार आहे.

याशिवाय गायन, समूह नृत्य, स्थानिक कलाकारांचे सादरीकरण, लहान मुलांसाठी गेम झोन तसेच जादूगाराचे प्रयोग ठेवण्यात आले आहेत. उत्कृष्ट स्टॉल धारकांचा तसेच उपयुक्त वस्तूंच्या स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.

प्लास्टिकमुक्त महोत्सवाची संकल्पना

महोत्सव प्लास्टिकमुक्त ठेवण्यावर भर देण्यात आला असून, नागरिकांना कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात येणार आहे, अशी माहिती मनोज चौधरी यांनी दिली.

नागरिकांना आवाहन

महापौर दीपमाला काळे यांनी जळगावकरांना कुटुंबासह महोत्सवाला भेट देण्याचे व स्थानिक महिला उद्योजकांच्या उत्पादनांना खरेदीद्वारे प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले आहे.

बातमी शेअर करा !
Tags: 26 फेब्रुवारीखानदेश महोत्सवखानदेशी खाद्य पदार्थजळगाव महापालिकामहिला बचत गटमहोत्सवाचे आयोजन
Previous Post

मातृभाषेचा पेपरने दहावीच्या परीक्षेला सुरुवात !

Next Post

‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर यांना जळगावमध्ये अभिवादन

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर यांना जळगावमध्ये अभिवादन

'दर्पण'कार बाळशास्त्री जांभेकर यांना जळगावमध्ये अभिवादन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

युवतींच्या दहीहंडीचा आज शिवतीर्थावर थरार

September 4, 2026
प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

September 3, 2026
जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

September 3, 2026
भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

September 3, 2026

राखीचा धागा मायेचा; ‘विशेष’ भगिनींना GPS परिवाराने दिला आपुलकीचा आधार

September 2, 2026
पाळधी बायपास अपघातप्रकरणी ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा!

पाळधी बायपास अपघातप्रकरणी ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा!

September 1, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif