गणपती ॲडचे संचालक ज्ञानेश्वर पाटील यांना पितृशोक
जळगाव – मूळचे शेरी (ता. जामनेर) येथील रहिवासी तसेच सध्या अयोध्या नगर, लक्ष्मीनारायण नगर, जळगाव येथे वास्तव्यास असलेले हरि किसन पाटील (शेरीकर), वय ६९ यांचे बुधवारी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
स्वर्गीय हरि किसन पाटील हे गणपती ॲडव्हरटायझिंगचे संचालक ज्ञानेश्वर पाटील यांचे वडील होत. मनमिळावू स्वभाव, कुटुंबवत्सल व्यक्तिमत्त्व आणि सामाजिक जाणीव यामुळे ते परिचितांमध्ये आदराने ओळखले जात होते.
त्यांची अंत्ययात्रा गुरुवारी सकाळी १० वाजता अयोध्या नगर, लक्ष्मीनारायण नगर येथील राहत्या घरापासून निघणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, सून, जावई व नातवंडे असा परिवार आहे. पाटील कुटुंबावर कोसळलेल्या या दुःखद प्रसंगामुळे वृत्तपत्र, मीडिया, जाहिरात, डिजिटल मीडिया क्षेत्रातील व त्यांच्या प्रियजणांनी शोक व्यक्त केला आहे.







