सकल लेवा युवती, महिलांचे २५ रोजी राज्यस्तरीय अधिवेशन
समाजातील वाढते घटस्फोट, ग्रामीण भागातील महिलांचे साक्षर व सक्षमीकरण. : डी एन सी कॉलेज जळगाव येथे आयोजन.
नवराज्य Live न्यूज नेटवर्क
जळगाव – महिलांना साक्षर करणे, कौटुंबिक समस्या दूर करणे, महिलांना सायबर सततेविषयी प्रबोधन करणे यांसह समाजातील ज्वलंत प्रश्नांवर चर्चा करून मार्गदर्शन करण्यासाठी सकल लेवा युवती व महिलांचे राज्यस्तरीय अधिवेशन जळगावात आयोजित करण्यात आले आहे. हे अधिवेशन २५ जानेवारी रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ यावेळेत धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनी, लोकसेवक माननीय मधुकरराव चौधरी महाविद्यालय जुना खेडीरोड येथे होणार असल्याची माहिती लेवा पाटीदार महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.
अधिवेशनाला खान्देश, विदर्भ, पुणे, मुंबई व परिसर, मराठवाडा, नाशिक, गुजरात, मध्य प्रदेश अशा एकूण ८ विभागातील युवती व महिला सहभागी होणार आहे.७०० ते ८०० महिला उपस्थित राहणार आहे.
कोणतीही भाषणबाजी न करता सर्व महिला पाहुण्यांच्या प्रमुख उपस्थितीत हे अधिवेशन होणार आहे. यात ९० टक्के महिला वक्त्या असून, ७०० ते ८०० महिला उपस्थित राहणार आहे त्या समाजातील महिलांना सक्षम करण्याच्या उद्देशाने मार्गदर्शन करणार आहे. अधिवेशनात ठरवलेल्या विषयांवर वर्षभर काम केले जाणार आहे. विशेष म्हणजे हे राज्यातील पहिले महिला अधिवेशन असून, यापुढे दरवर्षी घेण्याचा निर्धार करण्यात आला आहे. बाहेरगावाहून आलेल्या महिलांसाठी याठिकाणी मोफत निवासाची व भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. समाजातील व्यक्तींनी एकत्र येत लोकवर्गणीतून हे अधिवेशन घेण्यात येत आहे. जळगावातील राज्यस्तरीय अधिकाधिक महिलांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले. पत्रकार परिषदेस लेवा पाटीदार समाजातील पदाधिकारी व महिला सदस्या उपस्थित होत्या. अधिवेशनात
पत्रपरिषदेत यांनी दिली माहिती.
भाजप उदयोग आघाडीचे माजी अध्यक्ष डॉ अरुण बोरोले, माजी नगराध्यक्ष बंडू काळे, माजी विरोधीपक्षनेता चंद्रकांत बेंडाळे, कोषध्यक्ष डॉ मिलिंद पाटील, संयोजक प्रकाश वराडे, सकल लेवा महिला युवती उपाध्यक्ष समन्वयक नीता वराडे, डॉ ज्योती महाजन,संयोजक, निलिमा राणे,महिला सल्लागार डॉ. प्रा. सुनीता चौधरी, सल्लगार डॉ ज्योती भोळे, विधी सल्लागार ऍड भरती ढाके, लेवा भरारी सल्लागार सविता भोळे
प्रमुख पाहुण्यांचे उपस्थिती.
प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय क्रीडा मंत्री मा. रक्षाताई खडसे, मंदाताई एकनाथराव खडसे, अरुणाताई शिरीष चौधरी, जळगावच्या माजी नगराध्यक्ष सीमाताई भोळे, जयश्री ताई महाजन, गोदावरी फाउंडेशनच्या सचिव डॉ वर्षाताई उल्हास पाटील, ॲड रोहिणी ताई खडसे खेवलकर, डॉ केतकी ताई पाटील, जयश्री अमोल जावळे, सुरेखा भागवत भंगाळे, नगरसेविका दीपमाला काळे, नगरसेविका उज्वला बेंडाळे, नगरसेविका गायत्री राणे, माजी महापौर आशाताई कोल्हे, सिंधुताई कोल्हे आदी अनेक मान्यवर युवती व महिला पाहुणे







