नवराज्य Live न्यूज नेटवर्क
जळगाव – जळगाव शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पुष्ठभूमीवर युती की महायुती वरून अखेर पडदा उठला आहे नेत्यांनी अखेर शेवटच्या क्षणी महायुती करत 46 23 व 6 असा फॉर्मुला तयार करून आज एबी अभी फॉर्म या ठिकाणी त्यांचे एबी फॉर्म महापालिकेत जमा केले तर काहींना वाटप केले आहे.
अनेक निष्ठावंताना डावल्याने बंडखोरी होणार हे मात्र निश्चित आहे. आज उमेदवारी अर्ज भरण्यासाठी महापालिकेत सकाळपासून रांगा लावल्या होत्या मुख्य गेटच्या बाहेर व आत देखील रांगा लागल्या होत्या. सर गेटवर देखील चोख बंदोबस्त होता. त्यानंतर तीन वाजेची वेळ पूर्ण होत आल्याने पोलीस प्रशासनाने मुख्य गेट व बंद केले. महापालिकेत गर्दीत झाली असल्याने नंतर कोणालाही प्रवेश देणे बंद करण्यात आले.






