ए. टी.झांबरे माध्यमिक विद्यालयात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा
नवराज्य Live डिजिटल न्यूज नेटवर्क
जळगाव– भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने झांबरे विद्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेचे मुख्याध्यापिका प्रणिता झांबरे आणि पर्यवेक्षक नरेंद्र पालवे यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्या अर्पण करण्यात आले.
त्यानंतर शाळेच्या शिक्षिका मनीषा जयकर यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन कार्य, संविधानाची माहिती विद्यार्थ्यांना दिली.
त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन केले. कार्यक्रमासाठी बिपिन झोपे, निराशा सोनवणे, ज्योती पाच पांडे, हेमलता भोळे ,अनिल शिवदे यांनी सहकार्य केले.







